समुपदेशन-आजची खरी गरज

This blog explains why we need counseling in our life

समुपदेशन:- आजची खरी गरज

"अरे अक्षय "Many Congratulations! 
तुझे यश बघून खूप आनंद होतोय बघ!"

"काहीही म्हणा पण अक्षय इतका बदलेल आणि यशाचे शिखर गाठेल वाटलं नव्हतं!"

"आमच्या अक्षय ने सार्थक केले बघा आयुष्याचे!"

सगळेच लोक अक्षय च्या यशाचेच कौतुक करत होते पण खरं तर त्यांना आश्चर्य जास्ती वाटत होते कारण अक्षय खूप साधा मुलगा होता त्यामुळे तो निग्लेक्ट केला जात होता.

अक्षय मात्र दोन्ही हात जोडून एका व्यक्तीचे आभार मानत होता आणि तो व्यक्ती त्याला म्हणत होता " याचा शिल्पकार तू आहेस मी नाही! मी कायम तुझ्या आणि तुझ्यासारख्या सद्गुणी लोकांच्या पाठीशी कायम आहे पण त्याला जोड ही तुमच्या प्रयत्नांची हवी, त्याच्या सातत्याची हवी मग सगळे भरभरून मिळेल याची खात्री असावी!" 

काही दिवसांपूर्वी अक्षय अभ्यासात खूप काही विशेष करेल असे वाटले नव्हते पण अचानक अक्षय च्या आयुष्यात एका सुयोग्य माणसाचा प्रवेश झाला आणि त्याने अक्षय चे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले आणि तेही सकारात्मक रित्या! 

अक्षय ने जे यश मिळवले होते ते सगळ्यांनाच आश्चर्य चकित करणारे होते..कारण बोलणारे खूप जण असतात पण करणारे खूप कमी.
अक्षयने मात्र त्याच्या अगदी विरुद्ध करून दाखवले होते!
आणि यात त्या माणसाचा सक्रिय सहभाग खूप जास्त होता...
ही व्यक्ती म्हणजे अक्षय चा समुपदेशक!

जन्माला येताना प्रत्येक जण हा नशीब घेऊन येतो म्हणतात पण ते कसे फुलवायचे हे त्याच्या कर्तृत्वावर अवलंबून आहे. त्यासाठी लागते ती जिद्द! ईच्छाशक्ती! आणि सातत्य!

तर जिद्द म्हणजे काय?
काही करण्याची प्रबळ ईच्छा!
काही मिळवण्यासाठी केलेले अथक प्रयत्न.
लहान मुलं आपण हट्टी म्हणतो पण ते त्यांचे केलेले प्रयत्नच आहेत की जे हवे ते लगेच मिळावे याकरिता.
मग तेच लहानपण आपण अंगीकारून आपल्याला जे हवे ते मिळवण्यासाठी आपण प्रयत्न केले तर काय वाईट?

देणारा देतो मग आपण जर आपले घेतानाची झोळी लहान ठेवली तर तो आपला दोष!
 म्हणून झोळी ही मोठी ठेऊन जर मागितले तर मिळणार ते ही मोठेच  असेल.
"If there is a will their is a way"
असे उगीच म्हणत नाहीत, म्हणून विचार मोठे करा. प्रयत्न त्याहून मोठे आणि मग जे मिळेल ते यश हे गगनाला भिडणारे असेल हे नक्की!

जिद्द आणि ईच्छाशक्ती हे अजब समीकरण आहे. 
 दोन्ही एकत्र आले तर कोणीही तुम्हाला थांबवू शकणार नाही.
आपल्याला कोणी थांबवत आले तर तो असतो आपला आळस! आपले विचार! आपली गमावण्याची भीती! 
पण जर गमावण्यासारखे खरंच इतके आपल्याकडे असेल तर मिळवायचे ते काय? 
म्हणून नीट विचार करून आपण खरंच कशात अडकलो आहोत का याचा नीट विचार करावा. 
यासाठी सगळ्यात महत्त्वाची भूमिका निभावेल तो तुमचा गुरू, तुमचा हितचिंतक नाहीतर एक समुपदेशक!

आपल्याकडे समुपदेशन म्हणजे counseling हे फार वेगळ्या अर्थाने पाहिले जाते पण ती आजची खरी गरज आहे.
या समुपदेशनाला म्हणता येईल योग्य मार्गदर्शन!

चांगला समुपदेशक हा एक असा व्यक्ती असतो जो आपल्याला आपलीच खरी ओळख करवून देतो आणि काय योग्य-काय अयोग्य आणि आपली वैयक्तिक कुवत याची योग्य जाणीव करून देतो.

तर मित्रांनो तुमची ईच्छा, तुमची जिद्द आणि योग्य मार्गदर्शन ही तुमच्या खऱ्या यशाची गुरुकिल्ली असते हा विश्वास बाळगा  आणि सक्षमपणे पुढे जा..सामर्थ्यवान आयुष्य जगायला !

©®अमित मेढेकर