समुद्री मिशन (भाग -९)

Finding the mystery of deep sea and islands.

समुद्री मिशन (भाग -९)

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहे. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
सगळ्यांनी पटापट व्हिडिओ कॉन्फरन्स ची तयारी केली! अगदी ऑफिस च्या मीटिंग ला जसं नोटपॅड, पेन सगळं घेऊन बसतात तसे सगळे बसले होते. पाच वाजले आणि त्यांची मीटिंग सुरू झाली! 

"हॅलो! गुड इविनिंग!" सगळ्यांनी एकमेकांना अभिवादन केलं. 

संकेत, रुचिरा आणि शंतनु ज्युनिअर कॉलेज मध्ये एकत्र होते त्या नंतर खूप वर्ष एकमेकांशी काही संपर्क झाला नव्हता! आज व्हिडिओ कॉल द्वारे भेट झाली तीही कामानिमित्त! काही क्षण असेच स्तब्ध गेले.... पाच एक मिनिटं संकेत आणि शंतनु एकमेकांशी बोलले आणि कामाला सुरुवात झाली! 

"रुचिरा! आधी मला तो धमकी चा व्हिडिओ दाखव..." शंतनु म्हणाला. 

संकेत आणि गिरीश ने सुद्धा तो व्हिडिओ बघितलेला नव्हताच! रुचिरा ने लगेच ते पेन ड्राईव्ह लॅपटॉप मध्ये इन्सर्ट करून सगळ्यांना तो व्हिडिओ दाखवला. 

"हा जो कोणी आहे तो पूर्णपणे मुरलेला आहे. संपूर्ण अंधार करून काहीही क्लू मागे न सोडता त्याने धमकी पाठवली आहे..." शंतनु व्हिडिओ बघून म्हणाला. 

"हो! हा जो कोणी आहे त्याला आम्ही कोणत्याही परिस्थितीत त्या बेटावर जायला नकोय... नक्कीच तिथे कसलातरी खूप मोठा डाव रचला जातोय..." गिरीश म्हणाला. 

"हम्म! पण नक्की काय हे आपल्याला शोधून काढावं लागेल... तुम्ही आज कोणती माहिती काढली आहे जरा सगळं डिटेल मध्ये सांगा." शंतनु म्हणाला. 

तिघांनी मिळून आज दिवस भरात जे काही घडलं ते शंतनु ला सांगितलं. 

"ओके! उद्या तुमच्यापैकी कोणीही डॉ. उर्मिलांना भेटायला जाऊ नका! जर अजूनही तुमच्यावर कोणी पाळत ठेवून असेल तर ते लोक सावध होतील... मी स्वतः जाऊन तुम्हाला हवी ती माहिती काढून आणून देतो..." शंतनु म्हणाला. 

सगळ्यांना त्याचं म्हणणं पटलं. गिरीश ने डॉ. उर्मिला चा फोन नंबर आणि लॅब चा पत्ता शंतनु ला दिला. 

"मग, आता आपण पुन्हा तिथे कधी जायचं?" संकेत ने विचारलं.

"उद्या रात्री जाऊया! नक्कीच तिथे काहीतरी वेगळं घडतंय ज्याचा सोक्ष मोक्ष लवकरात लवकर लावायला हवा...." गिरीश म्हणाला.

"हो! तुम्हा तिघांना ऑल द बेस्ट.... मी इथे राहून तुम्हाला जी काही मदत लागेल ती सगळी करतो.... रुची! मला ऑफिस मधल्या कोणाचा तरी कॉन्टॅक्ट नंबर देऊन ठेव!" शंतनु म्हणाला.

"हो! निधी चा देते.... मी तिला सुद्धा तुझे कॉन्टॅक्ट डिटेल्स दिले आहेत.... काही गरज पडली तर ती तुला कॉन्टॅक्ट करेलचं!" रुचिरा म्हणाली. 

तिने ऑफिस चा नंबर, निधी चा नंबर, पत्ता सगळं शंतनु ला दिलं. 
**************************
इथे त्या माणसाच्या फोनवरून सांगण्यानुसार तो पत्रकार बेटावर जायला निघाला होता. समुद्र किनारी येऊन त्याने बोटीची व्यवस्था करून ठेवली होती आणि तो कोणाचीतरी वाट बघत होता. थोड्याच वेळात कोणीतरी तिथे आलं!

"चला लवकर... ते स्पेशल गेस्ट कधी येतायत?" त्या व्यक्तीने विचारलं.

"परवा येतील... तुम्हाला आज सगळी तयारी दाखवतो... चला..." पत्रकार म्हणाला.

"ओके! ते दोघं, काय बरं नाव... हा! रुचिरा आणि संकेत त्यांचा विचार बदलला ना नक्की?" त्या व्यक्तीने विचारलं.

"हो! मी स्वतः पुन्हा खात्री करून आलो आहे... ते दोघं नाही येणार तिथे.... आलेच तरी आपली माणसं सावध आहेत! त्या दोघांचं काय करायचं आणि अजून फायदा कसा करून घ्यायचा हे ठरवून झालं आहे... चला आपण निघुया!" पत्रकार म्हणाला. 

दोघं बोटीत बसले आणि त्या बेटावर जायला निघाले....
***************************
रुचिरा, संकेत आणि शंतनु तिघांनी मिळून बरेच पॉइंट्स डिस्कस केले! मागच्या वेळी जे काही घडत गेलं त्यावरून शिकत शिकत आता कोणती तयारी करायची हे त्यांनी ठरवलं! 

"मला वाटतंय, मगाच्या वेळी त्या लोकांनी तुम्हाला सोडलं! पण, यावेळी तुम्ही त्यांना दिसणार नाही याची काळजी घ्या.... यावेळी आपण जसे सावध आहोत तसे ते लोक सुद्धा असणार...." शंतनु म्हणाला. 

"हो! आम्ही ती काळजी घेऊच..." गिरीश म्हणाला. 

"ओके.... अजून काही राहिलं आहे का सांगा... आपण तिथे जाताना कोणत्या तयारीनिशी जाणार आहोत त्याची यादी मी एकदा वाचून दाखवतो.. कुठला मुद्दा सुटला असेल किंवा काही राहिलं असेल तर एकदा क्रॉस चेक करुया..." संकेत म्हणाला. 

सगळ्यांनी स्वतःचे नोटपॅड हातात घेतले... 

"१. स्पाय कॅमेरा... जो आपल्या तिघांकडे असेल! शंतनु आपल्यावर त्यानुसार नजर ठेवून असेल.

२. ट्रॅकर.... आपलं लोकेशन सतत ट्रॅक व्हायला.

३. एक हिडन कॅमेरा ज्यात तिथले सगळे काळे धंदे रेकॉर्ड करून पुरावा मिळेल. 

४. सेफ्टी ग्लोज आणि बाकी सामान..." संकेत ने सगळं वाचून दाखवलं. 

"हो बरोबर! पण, मला अजुन काहीतरी कमी वाटतंय! मागच्यावेळी ती चूक झाली पण यावेळी तसं होऊन चालणार नाही..." रुचिरा म्हणाली. 

"काय?" संकेत ने विचारलं.

"मला वाटतंय आपण ऑक्सीजन टँक घेऊन जाऊया..... तिथे अचानक येणारं ते धुकं जर कोणत्या केमिकल मुळे असेल आणि त्यातच माणसाला बेशुद्ध करायची ताकद असेल तर आपली एवढी तयारी फोल जाईल..." गिरीश म्हणाला. 

"हो... बरोबर! मी उद्या तुम्हाला स्पाय कॅमेरा आणि बाकी सगळं आणून देतो... आता लवकरच तिथल्या त्या बेटाचं आणि त्या अक्राळ विक्राळ जिवाचं रहस्य जगासमोर येईल." शंतनु म्हणाला. 

सगळं नीट प्लॅनिंग झाल्यावर त्यांची व्हिडिओ कॉन्फरन्स संपली. आता सगळे उद्याच्या रात्रीची वाट बघत होते.... इतके वर्ष तिथे असं काय घडत असेल याचा आता लवकरच तपास लागणार होता! ते बेट अचानक येणं आणि मध्येच गायब होणं, नकाशावर त्याचा ठाव ठिकाणा नसणं हे सगळं नक्की कसं घडतंय हे सगळं आता लवकरच समजणार होतं! फक्त आजची रात्र तेवढी या सगळ्या रहस्यांवरून पडदा दूर करण्याच्या मध्ये होती! संकेत, रुचिरा आणि गिरीश च आता उद्याच्या मिशन वर लक्ष लागलं होतं! या विचारांमध्ये च ही रात्र कशी बशी सरली.... दुसऱ्या दिवशी रुचिरा सकाळी लवकर उठली! संकेत ला रात्री नक्की काही त्रास झाला नसेल ना हा विचार तिच्या मनात एकदम चमकुन गेला. तिने मोबाईल बघितला... साडे सहा झाले होते! 

"गुड मॉर्निंग! काल शांत झोप लागली ना? की पुन्हा स्वप्न पडलं?" तिने मेसेज केला. आणि ती तिचं आवरायला उठली. 

थोड्यावेळात येऊन तिने मोबाईल बघितला! 

"गुड मॉर्निंग! काल छान झोप लागली.... कसली स्वप्न पडली नाहीत... डोन्ट वरी... आता आपण कामावर फोकस करू.... तू आज ऑफिस मध्ये जाणार आहेस ना?" त्याचा रिप्लाय आला. 

"हो! निधी ला सगळी कल्पना द्यायची आहे..." तिने मेसेज केला. 

एव्हाना आता साडे आठ झाले होते.... निधी ला फोन करून तिने ऑफिस मध्ये थोडं लवकर यायला सांगितलं आणि ती सुद्धा हॉस्टेल वरून निघाली. 

"गुड मॉर्निंग मॅडम!" निधी ने रुचिरा ला ऑफिस मध्ये आलेलं पाहून म्हणलं. 

"गुड मॉर्निंग! चल माझ्या बरोबर... केबिन मध्ये बसून बोलू..." रुचिरा म्हणाली. 

दोघी केबिन मध्ये गेल्या. काल जे काही झालं होतं नक्की त्या बद्दल च मॅडम ना काहीतरी बोलायचं असणार याची कल्पना निधी ला आली होती. 

"निधी! आता मी जे काही सांगेन ते आपल्या दोघीत राहिलं पाहिजे...." रुचिरा एकदम गंभीर होत म्हणाली. 

"हो मॅडम! तुम्ही मला सकाळी लवकर बोलवून घेतलं तेव्हाच समजलं! मी तुमची पूर्ण मदत करेन... हे मिशन आता यशस्वी झालंच पाहिजे!" निधी म्हणाली. 

"हम्म! आम्ही तिथे जातोय हे कोणाच्याही तोंडून चुकूनही लीक व्हायला नकोय म्हणून फक्त तुला सांगतेय... तिथे गेल्यावर काही मदत लागली तर इथे कोणालातरी याबद्दल माहीत पाहिजे म्हणून." रुचिरा म्हणाली. 

क्रमशः.....
***************************
आता सगळे रात्री त्या बेटावर जायला निघणार आहेत! तिथे गेल्यावर काही संकट तर येणार नाही ना? तिथे असं काय असेल म्हणून ती व्यक्ती आणि तो बोगस पत्रकार तिकडे गेले आहेत? शंतनु ने जे काही ठरवलं आहे ते सगळं काम करेल का? त्या कॅमेराचा काही उपयोग होईल? पाहूया पुढच्या भागात... तोपर्यंत तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all