समुद्री मिशन (भाग -७)

Finding the mystery of deep sea and islands.

समुद्री मिशन (भाग -७)

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहे. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
डॉ. रवींच्या क्लिनिक मधून ती भराभर बाहेर पडली आणि रिक्षा करून ऑफिस मध्ये आली.... 

"बरं झालं मॅडम तुम्ही आलात! काहीतरी नक्कीच वेगळं घडतंय..." निधी काळजीत म्हणाली. 

"काय झालंय नक्की?" रुचिरा ने विचारलं. 

"मॅडम! दुपारी....." निधी ने जे घडलं होतं ते सगळं सांगितलं. 

"बघू कोणता व्हिडिओ आहे?" रुचिरा म्हणाली. 

निधी ने त्या पेन ड्राईव्ह मधला तो व्हिडिओ रुचिरा ला दाखवला. त्या व्हिडिओ मधून नक्की कोणीतरी सतत दोघांवर नजर ठेवून आहे हे स्पष्ट झालं होतं! 

"हे बघ निधी! आपण अश्या धमक्यांना घाबरायचं नाही. आता तुला आणि अक्षय ला समजलच आहे तर मी सांगते, आम्ही दोघं गेलो होतो तिथे.... आता पुन्हा त्याच मिशन वर जाण्यासाठी आम्ही इथे येत नाहीये... यावेळी पूर्ण तयारी करून आम्ही तिथे जाणार आहे... इथली सगळी भिस्त आता तुझ्यावर आहे... तिथे खूप काहीतरी चुकीचं घडत असणार याचे पुरावे च हे धमक्या देणारे लोक देतायत! आपलं काम आहे अशी रहस्य सोडवायची, काही चुकीचं घडत असेल तर ते थांबवायचं! या अश्या धमक्या येणं साहजिक आहे... तू नको काळजी करुस! आम्हाला काही नाही होणार..." निधीचा काळजीत असलेला चेहरा पाहून रुचिरा ने तिला समजावलं.  

"मॅडम! पण, तुमच्यावर खरंच कोणीतरी पाळत ठेवून असेल आणि त्या लोकांनी काही केलं तर? आपण पोलिसांची मदत घेऊया ना या सगळ्यात...." निधी काळजीने म्हणाली. 

"नाही! आत्ताच यात पोलिसांची मदत घेऊन चालणार नाहीये.... आपल्या हातात ठोस पुरावे नाहीयेत! कोणी जर पाळत ठेवत असेल तर त्याला आपली पुढची काय पावलं आहेत हे लगेच समजेल... म्हणून थोडा धीर धर..." रुचिरा म्हणाली. 

रुचिरा ने काहीतरी विचार केला... आता या प्लॅन मध्ये नक्कीच काहीतरी ट्विस्ट द्यावा लागणार! जो कोणी पाळत ठेवत असेल त्याच्या डोळ्यात धूळ झोकून च पुढे काय करायचं हे ठरवावं लागणार होतं!

"निधी! मी केबिन मध्ये आहे... ५ मिनिटांनी आत ये... मी काहीतरी ठरवलं आहे...." रुचिरा म्हणाली आणि आत गेली. 
*************************
"आपला निशाणा बरोबर लागला आहे... मी त्या रुचिरा च्या ऑफिस बाहेर च आहे.... ते सगळे खूप टेंशन मधे दिसतायत! आता तर ते लोक तिकडे येण्याचा विचार सोडून च देतील..." त्या पत्रकाराने "त्या" व्यक्तीला फोन करून सांगितलं. 

"दुष्मन ला कधी कमजोर समजू नये... आधी खात्री करून घ्या ते लोक तिथे जाणार नाहीत याची आणि मग पाळत ठेवणं बंद करा... त्या रुचिरा च्या ऑफिस मधल्या कोणी ओळखलं किंवा चुकून जरी कोणाला सुगावा लागला तुम्ही खरे पत्रकार नाही तर आपल्या एवढ्या प्लॅन वर पाणी फिरेल..." ती व्यक्ती म्हणाली. 

"हो! मी काळजी घेतोय..." तो म्हणाला आणि फोन ठेवला. 
************************
इथे डॉ. रवी अजून संकेत च्या काही टेस्ट करत होते... त्यांना कसला तरी अंदाज आला होता त्याची खात्री करून घेणं महत्वाचं होतं! सगळ्या टेस्ट झाल्या आणि ते दोघं पुन्हा गिरीश आणि रुचिरा थांबले होते त्या केबिन मध्ये आले. 

"रुची कुठे गेली?" संकेत ने तिथे गिरीश ला एकट्याला पाहून विचारलं. 

"तिला ऑफिस मधून अर्जंट फोन आला होता म्हणून ती गेली आहे... थोड्यावेळात येईल..." गिरीश ने रुचिरा चा निरोप दिला. 

"अचानक काय झालं? काही सांगितलं का तिने?" संकेत ने विचारलं. 

"नाही... तिलाच काही नीट माहित नव्हतं... तू काळजी करू नकोस... होईल ती आपल्याला जॉईन..." गिरीश म्हणाला. 

संकेत ने मान डोलावली आणि तो त्यांच्या बाजूच्या खुर्चीवर बसला. 

"काय झालं आहे संकेत ला? झाल्या का सगळ्या टेस्ट?" गिरीश ने डॉ. रवी ना विचारलं. 

"हो! टेस्ट झाल्या आहेत... आता १ वाजत आला आहे... मला काही खात्री करून घ्यायची आहे तर तुम्ही इथेच थांबा! १:३७ ला नक्की हा कसा रिऍक्ट करतोय हे बघून मी काय ते सांगतो..." डॉ. रवी म्हणाले. 

"ओके... सर, एक सांगायचं राहिलं! काल रात्री मला हा त्रास होऊ नये म्हणून मी माझ्या मित्राला विचारून एक गोळी घेतली होती... त्यामुळे मला जाग तर आली नाही पण, रुचिरा म्हणाली होती मी त्या वेळेत एकदम शांत असा झोपलो नव्हतो... मला सुद्धा वाटतंय मी काहीतरी स्वप्न बघत होतो पण आठवत नाहीये..." संकेत ने सांगितलं. 

"कोणती गोळी घेतली होतीस?" डॉ. रविंनी विचारलं. 

संकेत ने ते गोळीचं पाकीट त्यांना दाखवलं. 

"ही गोळी झोपेच्या गोळी सारखं काम करते. आपण झोपल्यावर सतत जे विचार मनात सुरू असतात त्यामुळे मेंदूतून एक विशिष्ट रसायन स्त्रवत असतं! त्यामुळे स्वप्न पडतात... काही जणांमध्ये याचं प्रमाण जास्त असतं! भीती दायक स्वप्न असतील तर जाग येते आणि आरोग्य बिघडतं म्हणून ही गोळी घेतली जाते. ठीक आहे! आता या गोळी ची तुला गरज नाही पडणार.... आजच तुझी सगळी ट्रीटमेंट होऊन जाईल." डॉ. रवी म्हणाले. 
**************************
रुचिरा केबिन मध्ये आली आणि काहीतरी विचार करून तिने फोन लावला! 

"हॅलो! शंतनु कदम?" तिने विचारलं. 

"हो... आपण?" शंतनु ने विचारलं. 

"अरे शंतनु! मी रुचिरा.... ओळखलं का?" तिने आनंदात सांगितलं. 

"रुची तू! अगं कॉलेज नंतर आपली भेट सुद्धा नाही.... कशी आहेस? संकेत आणि तू अर्किओलोजी करता ना?" त्याने एकदम प्रश्नांचा भडिमार सुरू केला. 

"अरे हो हो... मला बोलायला तरी दे..." रुचिरा त्याला थांबवत म्हणाली. 

"सॉरी सॉरी... बोल..." तो म्हणाला. 

रुचिरा आणि त्याच्या गप्पा झाल्या. त्यानंतर तिने आज आलेल्या त्या धमकी सदृश व्हिडिओ बद्दल सांगितलं. 

"ओके.. आपण बोलू... तुझ्या म्हणण्या प्रमाणे जर कोणी तुम्हा दोघांवर नजर ठेवून असेल तर त्याला या बद्दल समजेल... मला वाटतंय तू आणि संकेत घरी गेलात की व्हिडिओ कॉल कर... आपण तेव्हाच सगळं डिटेल मध्ये बोलू." त्याने सांगितलं. 

"ओके... चल मग बाय.. बोलू संध्याकाळी." ती म्हणाली. आणि फोन ठेवला. 

"मे आय कम इन?" निधी ने दारावर नॉक करून विचारलं. 

"ये निधी..." रुचिरा म्हणाली. 

"मॅडम! तुम्ही काय ठरवलं आहे?" तिने विचारलं. 

"बघ, आपल्याला धमकी आली म्हणून घाबरून जायचं नाही हे मी तुला मगाशी सुद्धा सांगितलं. आत्ता सुद्धा तेच सांगतेय... आम्ही दोघं त्या मिशन वर जाणार आहोत! मी आत्ता माझ्या एका मित्राला फोन केला होता... शंतनु! तो प्रायव्हेट डिटेक्टिव आहे! या प्रकरणात तो आपली मदत करणार आहे.... आज संध्याकाळी मी आणि संकेत त्याच्याशी बोलून घेऊ... याबद्दल कोणालाही कळता कामा नये. मी तुला त्याचा कॉन्टॅक्ट नंबर देऊन ठेवेन... काय ठरतंय ते मी उद्या ऑफिस मध्ये येऊन तुला सांगेन... पण, आम्ही दोघं तिथे जाणार हे निश्चित!" रुचिरा म्हणाली. 

"ओके.... तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे! आपण अश्या धमक्यांना भीक न घालता या प्रकरणाचा छडा लावलाच पाहिजे!" निधी सुद्धा आता रिलॅक्स झाली होती. तिच्या बोलण्यात कॉन्फिडन्स आला होता. 

"हम्म! गुड! चल आता मी निघते... उद्या सांगते सगळं." रुचिरा म्हणाली आणि तिथून निघाली. रस्त्याने जाता जाता तिने गिरीश ला फोन लावून ती त्यांना जॉईन होतेय म्हणून सांगितलं. 
*************************
इथे डॉ. रविंनी सगळ्यांसाठी जेवण ऑर्डर केलं होतं! आता सगळे रुचिरा ची आणि १:३७ ची वाट बघत होते.... थोड्याच वेळात ती तिथे पोहोचली आणि त्यांची ऑर्डर सुद्धा! सगळ्यांचं जेवण होई पर्यंत १:३० वाजला! सात मिनिटात आता संकेत ला नक्की काय होतंय हे समजणार होतं! जसे १:३७ झाले तसा संकेत अचानक खुर्चीतून उठला! कोणाशी तरी तो बोलतोय असं असंच भासत होतं! रुचिरा त्याला हाक मारणार एवढ्यात डॉ. रविंनी तिला अडवलं. काही सेकंद अशीच गेली आणि तो कुठेतरी चालू लागला... तेव्हा डॉ. रविंनी त्याला अडवलं! मागच्या वेळ सारखंच झोपेतून जागं झाल्यासारखं संकेत ला वाटत होतं! 

"तुला आत्ता काय दिसलं? तू कोणाशी बोलत होतास आठवतंय का?" डॉ. रविंनी विचारलं. 

"नाही... मला काही आठवत नाहीये... पण, डोकं खूप जड झालंय.... चक्कर आल्या सारखं होतंय..." संकेत ने सांगितलं. 

डॉ. रविंनी लगेच त्याला तिथे झोपवलं. आधीच एनर्जी ड्रिंक सुद्धा मागवून ठेवलं होतं ते त्याला हळू हळू पाजलं... थोड्याच वेळात संकेत ला बरं वाटलं! 

"डॉ. काय झालंय संकेत ला? का त्याला असा त्रास होतोय?" रुचिरा ने काळजीने विचारलं. 

"माझा संशय खरा ठरला! त्याच्या माईंड सोबत कोणीतरी खेळायचा प्रयत्न करतंय.... कोणीतरी त्याला संमोहित केलं आहे... त्याचा ट्रिगर बरोबर १:३७ ला होतो! म्हणून, त्याला रात्री आणि दुपारी दोन्ही वेळा असे भास, स्वप्न हा त्रास होतोय..." डॉ. रविंनी सगळं सांगितलं. 

"असं कोणी केलं असेल? आणि हे संमोहन किती वेळा पर्यंत टिकतं?" रुचिरा ने विचारलं. 

"हे नक्कीच कोणीतरी प्रोफेशनल करू शकतो... मला वाटतंय, तुम्ही ज्या ठिकाणी गेला होतात तिथे बेशुद्ध झाल्यावर हा प्रयोग करण्यात आला असावा...." डॉ. रवी म्हणाले. 

क्रमशः......
****************************
संकेत ला कोणी संमोहित केलं असेल? कोणी त्याच्या मेंदूशी खेळ खेळला असेल? शंतनु या दोघांची कशी मदत करेल? पाहूया पुढच्या भागात... तोपर्यंत तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. 

🎭 Series Post

View all