समुद्री मिशन (भाग -६)

Finding the mystery of deep sea and islands.

समुद्री मिशन (भाग -६)

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहे. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
तो पत्रकार थोडं अंतर ठेवूनच होता. सगळे डॉ. रवींच्या क्लिनिक बाहेर पोहोचले.... त्या पत्रकाराने त्या सगळ्यांचे क्लिनिक मध्ये जाताना फोटो काढले आणि ते "त्या" व्यक्तीला सेंड केले... 

"ये... ये.. गिरीश..." डॉ. रवी गिरीश ला बघून म्हणाले. 

सगळे आत गेले... ओळख आणि थोड्या गप्पा झाल्या आणि कामाला सुरुवात झाली. 

"बोल आज कशी आठवण काढलीस?" डॉ. रविंनी विचारलं. 

"तुला निशांत ची केस आठवते का? त्याला जे भास होत होते, स्वप्न पडत होती त्या बद्दल जरा माहिती हवी होती... आणि संकेत ला सुद्धा काही दिवसांपासून तसचं होतंय तर त्याचं सुद्धा चेकप करायचं आहे..." गिरीश ने सांगितलं. 

"हो.. साधारण चार पाच वर्षांपूर्वी तुम्ही दोघं कोणत्या बेटावर का कुठे गेला होतात तेव्हा पासून त्याला त्रास सुरू झाला तेच ना?" डॉ. रवींनी विचारलं. 

"हो..." गिरीश म्हणाला. 

"ओके... बरं संकेत, रुचिरा! तुम्ही दोघं सुद्धा तिकडेच गेला होतात का?" डॉ. रविंनि विचारलं. 

संकेत आणि रुचिरा एकत्र "हो" म्हणाले. 

"बरं! संकेत मला सांग, तू या आधी पण बऱ्याच ठिकाणी गेला आहेस... तू आणि रुचिरा मिळून जे काम करताय त्यामुळे शहरात लहान मुलं सुद्धा तुम्हाला ओळखतात! या आधी असं कधी जाणवलं होतं का? कधी असे भास झाले होते?" डॉ. रवींनि विचारलं. 

"नाही! हे पहिल्यांदाच काहीतरी होतंय... का कोणास ठाऊक पण, सतत असं वाटत राहतं स्वतःच्या मेंदुवरचं नियंत्रण सुटतय! सतत काहीतरी दिसतं! काहीवेळा आठवतं तर काही वेळा आपण काय बघितलं हे आठवत सुद्धा नाही. हा! या सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मला दुपारी १:३७ आणि रात्री १:३७ या वेळातच असं होतं!" संकेत ने सगळं सांगितलं. 

"ओके! आत्ता पर्यंत तुला काय दिसलं आहे जे तुझ्या लक्षात आहे ते सांग..." डॉ. रवी म्हणाले. 

"एवढं नीट आठवत नाहीये... पण, मला जेव्हा झोपेतून जाग येते तेव्हा स्वप्नात सतत ते बेट दिसत असतं! असं वाटतं कोणीतरी तिकडे बोलवून घेतंय... दुपारचं एवढं आठवत नाही पण हा! त्या दिवशी मी एका गावात गेलो होतो तेव्हा मला कोणीतरी माणूस दिसत होता, तो माझ्याशी बोलला आणि कुठेतरी मला घेऊन जात होता पण, माझ्या पायाला ठेच लागली तेव्हा मला एकदम झोपेतून जागं झाल्यासारखं वाटलं आणि समोर कोणीच नव्हतं! थोड्याच वेळात मी बेशुद्ध पडलो! मध्यंतरी काय झालं काही आठवत नाही... तिथल्या लोकांनी मला घरी नेलं. मंग्या म्हणून एकाच्या घरी मी होतो... त्यांनी मला सांगितलं मी एकटाच बडबडत कुठेतरी चालत गेलो! तेव्हा मला समजलं मला भास झाला..." संकेत ने सगळं डिटेल मध्ये सांगितलं. 

"ओके... मी तुझ्या काही बेसिक टेस्ट करून घेतो. त्याआधी रुचिरा मला सांग तुला असं काही जाणवलं आहे का?" डॉ. रविंनी विचारलं.

"नाही... आम्ही तिकडून परतल्यावर काही दिवस तिथली स्वप्न पडत होती... मला वाटलं आम्ही सतत त्या बद्दल बोलत होतो, तिथे गेलो होतो म्हणून असेल...." रुचिरा ने सांगितलं. 

"हम्म! तुझं बरोबर आहे... आपण सतत ज्याचा विचार करत असतो ते आपला मेंदू आपल्याला दाखवतो! पण, संकेत च्या बाबतीत हे नक्की काहीतरी वेगळं आहे... मी बघतो... तुम्ही बसा... संकेत तू ये माझ्या बरोबर." डॉ. रवी त्याला त्यांच्या सोबत टेस्ट करायला घेऊन गेले.
**************************
"तुम्ही आत्ता जो फोटो पाठवला आहे तो डॉ. रविंच्या क्लिनिक चा आहे.... ते सगळे तिकडे का गेलेत याची काही माहिती मिळते का बघा... त्यात तो गिरीश का त्यांना सामील झालाय हे पण बघा...." पत्रकाराने पाठवलेला फोटो बघून "त्या" व्यक्तीने फोन केला. 

"ओके... त्या सगळ्यांना तिकडे न जाऊ देण्यासाठी आपण जो प्लॅन केला होता तो आता शेवटच्या टप्प्यात आहे.. लवकरच त्यांना एक झटका बसणार आहे.... तुम्ही म्हणत असाल तर आजच धमाका करू का?" पत्रकार म्हणाला. 

"हो! नेकी और पूछ पूछ... ठीक आहे.... असंच नीट काम करत रहा खुश राहाल..." ती व्यक्ती म्हणाली. 

पत्रकाराने हसत हसत फोन कट केला. 

"हॅलो! आजच धमाका करा...." त्याने कोणाला तरी फोन करून सांगितलं. 
*************************
रुचिरा आणि संकेत च्या ऑफिस बाहेर बरीच गर्दी जमली होती.... खूप रिपोर्ट्स तिथे आले होते... कॅमेरा चे फ्लॅश उडत होते... सगळीकडे एकच गोंधळ सुरू होता! 

"एक मिनिट! हे सगळं काय चाललंय? का एवढा गोंधळ करताय सगळे?" निधी ने विचारलं. 

"तुम्ही आधी तुमच्या मॅडम आणि सरांना बोलवा..." एक रिपोर्टर म्हणाला. 

"ते नाहीयेत इथे... कामानिमित्त बाहेर गेलेत.. काय झालंय?" निधी म्हणाली. 

"हो! जाणारच ना... आता मीडिया ला उत्तरं द्यावी लागतील तर पळणारच!" त्यातली एक रिपोर्टर म्हणाली. 

"एक मिनिट! सर आणि मॅडम असं काही चुकीचं करत नाहीत की मीडिया समोर येऊ शकत नाहीत... नक्कीच तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल..." निधी ने सगळ्यांना शांत करत सांगितलं. 

"मग? आहेत कुठे तुमचे सर आणि मॅडम? आहे उत्तर? तुम्ही सगळे काय सांगणार म्हणा! तुमचे चेहरे बघूनच समजतंय तुम्हाला काही म्हीत नाहीये..." पुन्हा तीच म्हणाली. 

"आमच्या कामाच्या गोष्टी आम्ही अश्या जगजाहीर नाही करू शकत.... आम्हाला कोणाला माहीत असेल किंवा नसेल त्याच्याशी तुमचं काही घेणं देणं नाही... काम काय आहे सांगा! नाहीतर दरवाजा तिथे आहे...." निधी ने सगळ्यांना बरोब्बर उत्तरं दिली. 

"आमचा स्वभाव आहे पुराव्याशिवाय बोलायचं नाही... मागच्या वेळी तुमच्या मॅडम नी काय सांगितलं होतं? ते मिशन वर जाऊ च शकले नाहीत... पण, याचा आम्ही छडा लावलाय... ते दोघं तिथे गेले होते... असं ऐकलं आहे तिकडे खूप संपत्ती आहे... याची माहिती सामान्य जनता आणि सरकार ला दिली तर एवढी गडगंज संपत्ती हातातून निसटून जाईल म्हणून काही न बोलता दोघं पळून गेले आता..." ती म्हणाली. 

"तुम्ही काय बोलताय कळतंय? आमचे सर आणि मॅडम असे नाहीयेत.... तुम्हाला चांगलंच माहितेय, दरवेळी प्रेस कॉनफरन्स होते! सगळी माहिती आणि जे काही हाती लागलं असेल ते सरकारच्या स्वाधीन होतं, मग या वेळी तरी असं का करतील ते? आणि पुरावा काय त्यांनी हे केलं याचा?" निधी म्हणाली. 

"पुरावा हवा ना एक मिनिट! हे घ्या... हे रेकॉर्डिंग बघा.... पुढच्या काही मिनिटात जर ते दोघं इथे आले नाहीत तर ही बातमी आम्ही पूर्ण देशभर करू... मग विचार करा काय कराल ते..." ती पत्रकार निधीच्या हातात एक पेन ड्राईव्ह देत म्हणाली. 

निधी ने ते पेन ड्राईव्ह अक्षय ला दिलं. तो ते लॅपटॉप ला लावणार एवढ्यात तो रुचिरा आणि संकेत वर लक्ष ठेवणारा पत्रकार तिथे आला... 

"एक मिनिट! रुचिरा मॅडम आणि संकेत सरांबद्दल कोणीतरी अफवा पसरवली आहे... तो व्हिडिओ एडिट केलेला आहे..." तो म्हणाला आणि काहीतरी इशारा केला तसे सगळे सॉरी बोलून तिथून निघून गेले. 

निधी त्याला काही विचारणार एवढ्यात तो सुद्धा तिथून गायब झाला होता. 

"निधी! आपण हा पेन ड्राईव्ह बघूया तरी यात नक्की असं काय होतं म्हणून हे सगळे इथे आले..." अक्षय म्हणाला. 

त्याने त्यातली व्हिडिओ फाईल ओपन केली. 

"हा... हा... हा... कसा वाटला हा ट्रेलर? तुमच्या त्या संकेत आणि रुचिरा ला सांगा पुन्हा त्या बेटावर जायचं नाही... मागच्यावेळी जिवंत तरी राहिले.... यावेळी आत्मा पण तिथून बाहेर पडू शकणार नाही...." व्हिडिओत फक्त सावली दिसत होती... त्यातली व्यक्ती कार्टून चा आवाज काढत बोलत होती... 

"हे सगळं नक्की काय आहे?" अक्षय ने विचारलं. 

"थांब! मी मॅडम ना फोन करून विचारते नक्की काय आहे हे? त्यांना जमल्यास त्या येऊन पण जातील..." निधी म्हणाली आणि रुचिरा ला फोन करायला गेली. 
**************************
इथे क्लिनिक मध्ये डॉ. रवी संकेत च्या टेस्ट करत होते... काही साधे प्रश्न विचारून, त्याला संमोहित करून काही टेस्ट सुरू होत्या. गिरीश आणि रुचिरा त्यांची वाट बघत तिथेच बसले होते. तेवढ्यात रुचिरा चा फोन वाजला. 

"बोल निधी... काय झालं?" रुचिरा फोन उचलून म्हणाली. 

"मॅडम! प्रकरण थोडं गंभीर आहे... फोनवर नाही बोलता येणार... तुम्ही आणि संकेत सर ऑफिस ला येऊन जाता का?" निधी ने सांगितलं. 

"अगं आम्ही जरा दुसऱ्या कामात आहोत... तू हॅण्डल कर ना... खूप सिरियस आहे का?" रुचिरा ने विचारलं. 

"मॅडम.... खरंतर तुमच्या दोघांच्या संदर्भातच आहे... तर या ना..." निधी म्हणाली. 

"ओके... तू टेंशन नको घेऊ... संकेत नाही येऊ शकणार मी येते... पोहोचते तासाभरात..." रुचिरा तिचा टेंशन मधला आवाज ऐकून म्हणाली. 

"ओके.. या... आम्ही वाट बघतोय..." निधी म्हणाली. 

रुचिरा ने फोन ठेवला. तिला सुद्धा आता टेंशन आलं होतं! नक्की काय झालं असेल या विचारात ती होती. 

"काय झालं? काही सिरियस आहे का?" गिरीश ने तिचा उतरलेला चेहरा पाहून विचारलं. 

"सर, मला आत्ता अर्जंट ऑफिस ला जावं लागेल... तुम्ही संकेत ला सांगाल का? काय झालंय मला पण माहीत नाहीये..." रुचिरा म्हणाली. 

"ओके... जा तू जाऊन ये... आणि मग पुन्हा आम्हाला जॉईन हो... मी आहे संकेत सोबत काळजी नको करू..." गिरीश म्हणाला. 

"हम्म! थँक्यू सर... मी पटकन येते... उशीर लागला तर संकेत च्याच घरी भेटू..." रुचिरा म्हणाली. 

क्रमशः.....
*************************
त्या पेन ड्राईव्ह मध्ये काय असेल? संकेत ला का असे भास होत असतील? आता हे सगळे त्या मिशन वर जाऊ शकतील का? आणि गेले तरी सुखरूप परततील? पाहूया पुढच्या भागात. 

🎭 Series Post

View all