समुद्र..४

करतीच आहेस सगळं ..फक्त अतीरेक होतोय याचा..तुझं सुख जिथे आहे ते अनुभवायचा अधिकार तुला आहे मनु आणि ती अपेक्षा तुझा जोडीदार करत असेल तर चुकीचं काहीच नाहीये यांत.. "
खूप उशीर झालाय आता निघायला हवंय ..एका तंद्रीत सौमित्र घरी पोहोचला..विचारांचे आवर्त थांबायला हवेत जे होईल जसं होईल स्विकारायच आहे ..
काकांना तितकी दगदग ही सोसली नव्हती.. शेवटी मृण्मयीनं आणि वकील काकांनी भेटायचं पुढे ढकललं.. सकाळी सौमित्रनं फोन केला तो ही काकांना..स्वतःच कर्तव्य अगदी व्यवस्थित पार पाडत होता..अगदी सहजता बोलण्यातली त्यामुळे काका ही खुश होते.. " मनु नशीब आहे तुझं ..इतका समजुतदार जोडीदार मिळालाय ..माझी काळजीच मिटलीय.."
" हं "मोठा उसासा भरला मृण्मयीनं.. "का ग काय झालं..? तू खुश नाहीयेस..? लव्ह मँरेज नं तुझं..काहीतरी बिनसलंय ..काल पासून पहातोय मनु.. तुटक वागता आहात एकमेकांशी .. मला असं वाटतंय तू सौमित्रला त्याचा वेळ देत नाहीयेस.. त्याची होणारी चिडचिड जाणवतीय.. अग हेच दिवस आहेत तुमचे एकमेकांना समजून घेण्याचे.. माझ्या साठी आहेत लोकं ..काळजी घेताहेत.."
काकांनी म्हटल असं आणि भरून आलं मृण्मयीला.. "माझ्यासाठी काय आहात तुम्ही सांगायला हवंय का तुम्हाला काका..?सर्वस्व आहात माझं..लहानपणा पासून स्वतःचं अस्तित्व विसरून सगळं केलंत आता तुमची काळजी घ्यायची वेळ माझीय पण तेवढं स्वातंत्र्य ही मला नसावं का..?" काकांचे दोन्ही हात हातांत घेऊन गुडघ्यावर बसली मृण्मयी आणि गदगदून रडायला लागली.. तीला शांतपणे थापटत काका म्हणाले " वेडी आहेस झालं.. करतीच आहेस सगळं ..फक्त अतीरेक होतोय याचा..तुझं सुख जिथे आहे ते अनुभवायचा अधिकार तुला आहे मनु आणि ती अपेक्षा तुझा जोडीदार करत असेल तर चुकीचं काहीच नाहीये यांत.. "
"शांतपणानं जरा विचार कर याचा ..या लुटुपुटीच्या लढाया तेवढ्या पुरत्याच असू देत..मनातल्या नीरगाठींना जागा देऊ नकोस.. उसवत जातील धागे असं वागू नकोस.."
"हो काका मी प्रयत्न करते .."
" माझी तब्येत बरी आहे आता.. सौमित्र ला आधी फोन कर..बोल त्याच्याशी ..तुला सरप्राईज देणार होता काहीतरी .."
"चहा घेऊया का परत एकदा हवा ही थंडय.. अद्रकवाली चाय ..
फ्रेंच टोस्ट करु..?"
" हो मी तेच म्हणणार होतो.. कर कर बरेच दिवस झालेत तुझ्या हातचं खाऊन.."
मृण्मयी झटक्यात उठली .. बेसिनपाशी येऊन पाण्याचे हबकारे मारले..एकदम फ्रेश वाटायला लागलं.. उत्साह संचारला .. चहा करायची तयारी करतीय तोपर्यंतच कुणाचा तरी कमरे भोवती विळखा पडला.. उष्ण अनिर्बंध होणारे श्वास मानेवर रेंगाळू लागले.. पिनअप केलेले केस कुणीतरी अलगद सोडले.. एक मोहरलेला श्वास बेधुंद करणारा.. मृण्मयीला काही कळायच्या आतच सौमित्रनं तीचा चेहेरा आपल्या कडे वळवला .."गुड माँर्निंग स्वीट हार्ट"
म्हणत तीच्या कपाळाचं हलकेच चुंबन घेतलं..
"कुछ और मीठा मिलता तो अच्छा होता "अस म्हणत डोळा मारला.. " अरे काय हे ..?कुणीतरी बघेल.."
" देखने दो ..जलने दो .. "
" हम डरनेवालों में से नहीं है "
" आप का अरमा आप का नाम मेरा तराना और नहीं
इन झुकती पलकों के सीवा दिल का ठिकाना और नहीं
जँचता ही नहीं आँखो में कोई..
दिल तुमको ही चाहे तो क्या किजिए..
ओ मेरे दिल के चैन , चैन आए मेरे दिल को दुवाँ किजिए..."
तीला तसंच डायनिंग हाँल मध्ये आणलं सौमित्रनं .. शांत बस जरा इथे .. मी काय सांगतोय ऐक..
काकांशी बोलण झालंय.. खरं तर त्यांनीच फोन केला होता काल मला..माहेर आणि सासर यातलं अंतर ओळखता यायला हवंय तुला मनु.. तू इथे येती आहेस यांवर आक्षेप नाहीच आहे माझा फक्त तुझ्या जबाबदाऱ्या बदलणार आहेत हे तू मान्य का करत नाहियेस..? काकांच्या बिजनेस ची काळजी अजिबात करु नकोस मी टेक ओव्हर करतोय कंपनी.. काका आहेत तो पर्यंत त्यांनीच पहायचंय नंतर मँनेजमेंट थोडी बदलु तो आत्ता विषयच नाहीये.. तुला संपुर्ण मोकळं केलंय त्यांनी..
आणि हा निर्णय तू ही मान्य करावास आनंदानं.. "
"मी ही एकलुता एक आहे ..बाबांनी स्वप्न पाहिली आहेत ..तू आता तीथली जबाबदारी घ्यावीस अस वाटणं साहजिक आहे.. त्यांना स्वतःची स्पेस हवीय आता..प्लीज समजून घे.. आम्ही ही कुणीतरी लागतो आहोत तुझे.."
"हो सौमित्र , चुकले मी फक्त माझाच विचार करत होते.. पण सत्य आणि वास्तव यांत जगता आलं पाहिजे समजलंय आता.. माफ कर मला .. If I have hurt you.."
"वेडा बाई कुठली .. तुझ्यावर रागावणं अशक्य आहे ..फक्त तो तुझा अबोला जीवघेणा ठरतोय . प्राँमीस कर हा वेडेपणा पुन्हा करणार नाहीस..."
\"हो रे ..\"
त्याच्या बाहुपाशांत स्वतःला झोकून देतांना कमालीची शांत झाली मृण्मयी..विश्वासानं ज्याचा आधार घ्यावा असा जोडीदार लाभणं खरंच भाग्यवान आहे मी..मृण्मयी चे भरुन आलेले डोळे..
अलगद त्या अश्रुंना टीपून घेतलं सौमित्रनं ...तीच्या गालांवर ओघळणारा तो एकेक अश्रू.. दोघांच्या निरागस आणि निष्पाप प्रेमाची साक्ष देत राहीला..
©®लीना राजीव.







🎭 Series Post

View all