" काय रे हे ! भिजले पुरती मी ..घरी कशी जाऊ आता ...?आपल्या घरी चल ..नाहीतरी यायचच आहे पुढच्या महिन्यांत" ले,जाऐंगे ले जाऐंगे तेरी सोन मछरीया ले जाऐंगे ..,म्हणायची वेळ येणार नाही माझ्यावर ... चल जाऊ या पळून ..मेरी बाकी हिरनिया ,चल भाग जातें हैं ! "पागल हो गये हो तुम . " " वो जो लोग सयाने होतें हैं मोहब्बत नहीं करते और पागल होकर ही इश्क किया जाता है ,समझी आप ..!"
मृण्मयीला घरी सोडतांना सौमित्र हळवा झाला "महीना भर अवकाश आहे लग्नाला कसं व्हायचं माझं ..?"
"बाबांना भेटणार नाहीस ...?"
" ओय ,बच्चे की जान लेगी क्या ?खडूस आदमी के पास भेजती हो ..?"
"बाबांना काही म्हणायचं नाही हं ! "
"ए ,उद्याचं लक्षात आहे नं ..?"केंव्हा येऊ घ्यायला ...? पपांनी डायरेक्ट ऑफिसला या असं सांगितलंय ...मी किती वाजता येऊ ...?"
"अरे ,उद्या काकांचं check up आहे,मला जावं लागेल त्यांच्या बरोबर .."
"घरातलं कोणीतरी जाईल ना त्यांच्या बरोबर,तुझं काय काम आहे ...?"
"नाही सौमित्र ,मलाच जावं लागेल ..."
प्लिज समजून घे नं मला."
"तेच करत आलोय गं आजपर्यंत .. ठीक आहे तुला माझ्या पेक्षा तुझ्या काकां बरोबर असणं जास्त महत्वाचं आहे ... कळलं मला ..."
त्यानं झटक्यात काच वर केली गाडीची आणि त्याच वेगांत रिव्हर्स घेतली गाडी ..आणि क्षणांत दिसेनासा झाला .
मृण्मयी अगतिक आणि केविलवाणी ,त्राण नसल्या सारखी जाणाऱ्या सौमित्र कडे पहात राहीली ....
कुठे चुकतंय ,का चुकतंय हे समजण्या पलीकडचं ...काकांनी मुली सारखं वाढवलं . त्यांनी स्वप्न पाहीली माझ्या उत्तुंग भरारीची ...आजारपणानं खचलेलं नाही पाहिलं कधी पण जसजशी काळाची चाहूल लागतीय कासाविस होतात, माझं स्वप्न सत्यात आणलंस जप ते...तुझ्या भरंवशावर आहे सगळं ...त्याचं हळवं होणं सौमित्रला समजून घ्यायचंच नाहीये की पुरुषी अहंकारानं आंधळा झालाय तो...? कुठेतरी मध्य गाठायला हवाच ...त्याच्याशी बोलणं कधी होणार आहे ,कधी वेळ काढणार आहे तो ...?आता पुन्हा त्याचं चिडणं,असं निरोपही न घेता जाणं कुठे जाणार आहे आपलं नातं हे ...?विचार करतच मृण्मयी हाॅल मध्ये आली ..."काँफी करु का गं गरमा गरम..? बाई साहेब भिजून आल्या आहेत चिंब ."
"बाबा जागे आहात अजून ...?" बापाचं काळीज आहे नाही समजायचं तुला ,लग्न ठरलेली मुलगी ,होणाऱ्या जावया बरोबर असली तरीही काळजी वाटतेच ."
"डोळे असे का दिसताहेत तुझे ...?"केवढी भिजलीयस ...?"
"भांडलात काय पुन्हा...?"
"हो ,समजून घ्यायचं नाहीच अस ठरवलंय त्यानं ." येणारा हुंदका दाबतच मृण्मयी आत पळाली ... "कठीण आहे ... प्रेम विवाह म्हणे ! कसं व्हायचं यांचं ...? रघुवीर शी बोलायला हवंय.. मित्र असला तरी मृण्मयीचा होणारा सासरा आहे ... नाती बदलली की संदर्भ ही बदलतात... नाही समजून घेतलं मनु ला तर याद राख म्हणावं ..."
संपुर्ण रात्र अश्रुंना समर्पित झाली . कुठे चुकतंय आपलं..? हेच की काकांच्या तब्येतीची अती काळजी करणं सौमित्र ला अजिबात आवडत नाहीये .. त्याचा वेळ आपण इतरांना खरंच देतोय का ...? द्विधा मनः स्थितीत केंव्हा तरी डोळा लागला मृण्मयीचा ...
सकाळी फोनची रींग वाजायला लागली .सौमित्रचा फोन.. हा म्हणजे ना ! खरंच कोण समजू शकेल या माणसाला ..?घटकेत एक घटकेत एक असतं ... कधी चिडेल नेम नाही ,कधी रोमँटीक मूड धारण करेल नेम नाही ... फोन घ्यावा की नको या मनःस्थितीत तीनं हृदयाचं ऐकलं "बोल,काय सूचना करायच्या आहेत ,उपदेश करायचेत तुला....समोरून प्रश्नांचा भडीमार सुरु झाला .."
मृण्मयी फोन नुसतीच धरून बसली खरंतर काहीच बोलावंस वाटत नव्हतं तीला दरवेळेलाच हे होतंय .. भावनांशी खेळणं एखाद्याच्या छान जमतं याला ,दुसऱ्या क्षणाला जणु काही घडलंच नाही असं वागतो ...
" ऐकतीयस का...?शांत पणानं त्रागा न करता आपण बोलू या का ...? तू जाऊन ये काकां बरोबर संध्याकाळी मी पिकअप करतो तुला ..." फोन ठेवला सुद्धा त्यानं ... मला संधीही दिली नाही काही बोलायची.. जाऊ दे काही वाद घालण्यात अर्थ नाही ... ह्या माणसाला समजून घ्यायला सात जन्म घ्यावे लागतील मला वाटतंय तरी असं ....
क्रमशः .....
©लीना राजीव.