समुद्र.. २

खिडकीच्या काचांतून परावर्तित होणारे पावसांचे थेंब मोत्यांचे घोस झाले ...मृण्मयीनं काच हळूच खाली केली त्या धारा हातांवर झेलतांना तीच्या चेहेऱ्या वरचे बदलणारे निरागस भाव टीपतांना सौमित्र भान हरपून गेला ... अनिमिष नेत्रांनी ते माणिक मोती तळव्यांवर झेलतांना तीचे बदलणारे हावभाव सौमित्र अनिमिषतेने पहात होता ...इतकी बालिश वागते कधीतरी
समुद्र ..२

"मला मापणं सोडून दे मनु ..."
" मोजणं ही."
"ते तर करतीच आहे ." "असाच आहेस लहान पणा पासून ?" "जाऊ देत ना ! आता मनु माताजी की वाणी सुरु करणार आहेस का ...?"पुन्हा कधीतरी तुमचा सत्संग ठेवूया ."कावळे ओरडताहेत का पोटांत ...?"आज महत्वाची मिटींग cancel केली आहे तुझ्या साठी ..."आजची संध्याकाळ तुझी ,कुठे जाऊया ...?"काहीतरी थोडं खाऊया इथेच ."समोर सगळे ठेलेवाले ..सौमित्र असलं कधीच खायचा नाही पण आज मनु साठी तयार झाला ...काही तरी अरबट चरबट खात असतेस,unhealthy असतं हे असं बरंच समजावून झालं पण आज मनुला नाराज करणं परवडलं नसतं त्याला ... गेले पंधरा दिवसांतला अबोला सुटला एकदाचा ..
"अग,कशी दिसतेयस तू ..?"
"काय झालं ?"
" इकडे बघ जरा .."
"अरे काय झालं सांगशील...?"
"पाय बघू तुझे ,मृण्मयींनं साडी किचिंत वर उचलली .""पावलं तर सरळ आहेत तुझी "
"मग ओठ जांभळे का झालेत हडळी सारखे ."
मृण्मयीच्या हातात काला खट्टाचा गोळा आणि ग्लास होता ...सौमित्र चा हा मिश्कील स्वभाव विचारायची सोय नाही ...ग्लास तसाच ठेवत मृण्मयी हसत सुटली ..."का रे असं वागतोस..?"
"ओ भैया , इस नागिन को एक और काला खट्टा देना ..." "क्या साहब! आप भी कमाल करते हो !"
"हडळीची नागिण कशी झाले मी ,सौमित्र...?"
"अग माझे राणी तो बिहारी भैया त्याच्या डिक्शनरीत हडळ शब्द नसणार ... नागिन परीचयातली त्याच्या ."
" Impossible आहेस तू !"
"तुझ्या वर चिडणं ही कठिण आहे ."
"तू चिडलीस की जास्त सुंदर दिसतेस मनू ! असं वाटतं ,असं वाटतं ....."
" काय वाटतं ..?"
"काही नाही ,विष भिनलंय तुझ्या प्रेमाचं उतरणं शक्य नाही ..."
"चल घरी सोडतो तुला ..."
" नको रघुकाका आहेत .."
"मी पाठवलं परत त्यांना .."
" ये बंदा हाजीर है आपकी खिदमत में"
गाडीत बसल्या बसल्या सौमित्रनं " घरी पोहोचवू तुला खरंच का असंच पळून जाऊया .कुठेतरी ...विचारलं सौमित्रनं ..." "ऐ शहाण्या पोलीस कम्प्लेंट करतील घरचे ." "तेरे लिए ये भी सही .."
" प्यार के इस खेल में ,दो दिलों के मेल में , तेरा पीछा ना छोडूँगा सोणीये ,भेज दे चाहे जेल में ...." सौमित्र थट्टा पुरे झाली हं आता तू बोलणार आहेस का माझ्याशी ..?"..."तू परवा काकांना नाही का म्हणालास ...?" मृण्मयी आँफीसला येणार नाही का म्हणालास ...?"
"अरे यार ,क्यों मूड बिघाड रही हो !बाद में बात करेंगें !" नाही सौमित्र आत्ताच वेळ आहे नक्की तुझं चाललंय काय ...?"
"काकांची फर्म सांभाळतीय मी ,जबाबदारी आहे सगळी माझ्यावर ...एकदम तू असं कसं म्हणू शकतोस ..?लग्न झाल्यावर मनु बघणार नाही काही तुम्ही बघा दुसरं कुणीतरी..किती फील झालं असेल त्यांना ...""प्लीज हा विषय आत्ता नको ...पुन्हा वाद सुरु होतील ."
" पण वेळ केंव्हा काढणार आहेस तू ..?लग्न झाल्यावर मला कुठले निर्णय घेऊन देणार आहेस स्वतःचे ...?"
"विषय फार बदलतेस तू मनु..."प्रत्येक वेळेला तुझा हट्टीपणा भोवतो मला ."तुला सारखं वाटत रहातंय की लग्नानंतर तुझं स्वातंत्र्यच रहाणार नाहीये .."हा विषय पपां
समोर बोलू एकदा आत्ता नको मूड घालवूस ."
खरं तर अजून पावसाळा सुरू व्हायला वेळ आहे ...पण वळीव येणार ही चिन्ह होतीच ,रेशमी धारा कोसळू लागल्या ..खिडकीच्या काचांतून परावर्तित होणारे पावसांचे थेंब मोत्यांचे घोस झाले ...मृण्मयीनं काच हळूच खाली केली त्या धारा हातांवर झेलतांना तीच्या चेहेऱ्या वरचे बदलणारे निरागस भाव टीपतांना सौमित्र भान हरपून गेला ... अनिमिष नेत्रांनी ते माणिक मोती तळव्यांवर झेलतांना तीचे बदलणारे हावभाव सौमित्र अनिमिषतेने पहात होता ...इतकी बालिश वागते कधीतरी हीला असंच बाहुपाशात घ्यावं आणि त्या गुलाब पाकळ्यावर अलगद प्रेमाची मोहोर उठवावी या मोहात त्यानं गाडी थोडी बाजूला घेतली ...पटकन् उतरुन त्यानं मृण्मयीच्या जवळचा दरवाजा उघडला ..तीला पावसांत बाहेर खेचलं ..तीच्या चेहऱ्यावरुन ओघळणारे दोन टपोरे थेंब त्यानं अलगद टीपून घेतले ...काय घडतंय कळायच्या आत तीला घट्ट बाहुपाशात घेतलं ...रहदारी कमीच होती तशी रस्त्यावर पावसाला अचानक सुरुवात झाल्यानं तारांबळ उडालेली सगळ्यांचीच...मृण्मयीच्या नखशिखांत भिजलेल्या कमनिय बांध्याकडे सौमित्र पहात राहीला ..लाजून चुर झालेल्या मृण्मयीनं आपला चेहेरा दोन्ही हातांनी झाकून घेतला ...बाहेर तूफान बरसणारा पाऊस ,एका अनावर क्षणी वीजेचा लोळ उठला ,गडगडाटानं आसमंत हादरला ...घाबरून मृण्मयी सौमित्रला घट्ट बिलगली ..तीची हनुवटी वर उचलून क्षणभर त्यानं त्या मृण्मयी नजरेत पाहीलं शांत ,नितळ डोह तीच्या नजरेतला सात्विकतेचा मुजोर बहाणा असला तरी ,हृदयातली सगळी आवर्तन शांत करत होता ...त्याच्या मनांतला बेफाम पाऊस अगतिकतेत चिंब होता ....
क्रमशः
© लीना राजीव.

🎭 Series Post

View all