Login

समुद्र ..१

समोरच्या समुद्रा सारखा आहेस नितळ ,थांग न लागू देणारा ..वरून निश्चल वाटत असलास तरी पृष्ठावर अभेद्य आवर्तन असतात तुझ्या मनाच्या ...कित्येक जन्माची खळबळ बाळगून असल्या सारखी..."


समोर अथांग पसरलेला निळाशार समुद्र .
नजर बांधून घालणारा अंतहीन ,नजरेत न मावणारा ...सोनसळी किरणांनी लाटांवर स्वार व्हावं ...चमचमणाऱ्या त्या गर्द केशरी मासोळ्या पहातांना मृण्मयीचे डोळे भरून आले ..शेजारची जागा रिकामी ,तीच्या सारखीच रिक्त ....कुणीही येणार नाही ,कुणीही हात देणार नाही हे माहीत असूनही रोज इथं यायचं ,असंच हरवल्या सारखं बसायचं ..त्या समुद्रालाही सवय झालीय माझी ... रोज भेटतो तो इथेच, याच वेळेला कधी घनगंभीर होऊन माझी गाऱ्हाणी ऐकतो ..शांत ,स्थिर असतांनाच मलाही शांत करतो ... कधीतरी उसळून येतात भावनांच्या लाटा ,जाणीवांचे कढ ही , कोलाहल उडवून देतात... मनांत ...तो शांत असतो मात्र ... निःशब्द ,त्रयस्थ,संन्यस्त.....
" दिदि ,आप कुछ लेंगी ...?"तीनं चमकून वर पाहिलं ..इतक्या आपुलकीनं कुणी विचारावं ...?ते ही या अनोळखी जगांत ..?
"नहीं कुछ नहीं चाहीए ." "आपके लिए कुछ लाता हूँ ". दहा -पंधरा वर्षाचा तो चुणचुणीत मुलगा क्षणांत दिसेनासा झाला ...
पुन्हा मृण्मयीनं समुद्रा कडे पाहिलं , मघासचा आकाशी रंग बदलायला लागला होता ...लाटांवर हळूहळू केशर सांडायला लागलेलं तो जर्द लाल गोळा कित्येक आकांक्षाचे डोह आपल्यात सामावून लयास चालला होता ....उदास उदास सगळंच ... समोरचं पुन्हा काही दिसेनासं झालं ...भरून येणारा डोळ्यातलां समुद्र ..खोली नसणारा ,किनारा हरवलेला ....
क्रमशः .....
#समुद्र भाग २

"दीदी ,ये लिजिए ..."त्या लहानग्यानं ओंजळभर मोगऱ्याची फुलं आणलेली...बेधुंद करणाऱ्या सुगंधानं मृण्मयी बावरली ...त्याच्या हातांतून अलगद ती ओंजळीत घेतांनाही एक हळवेपणा जाणवला तीला जणू तो तीच्या रंगबावरल्या आठवणीं तीला परत देतोय सांभाळ यांना म्हणतोय ..."तुम लाए हो ,ये फूल ..?तुम्हें कैसे पता ये इतने खुबसुरत फुल मुझे पसंद हैं ...?" तो श्वास भरून घेतांना इतकं शांत का वाटलं आपल्याला कळेनाच मृण्मयीला ...तीनं प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं त्या मुलाकडे ..तो किंचिंत हसला आणि त्याने फक्त हसत इशारा केला आणि धूम ठोकली ...
मृण्मयीचा विश्वासच बसेना ..सौमित्र ...?भास ..आभास .. की सत्य ...? क्षणभर हे सगळं घडतंय खरं आहे का..?की भ्रम होताहेत आपल्याया ...?
"सरप्राईज कसं वाटलं ..?"
" बाप रे इतका राग ..?" "नाकावर बसलाय का तो ...?" "...बोलणार नाहीयेस?"
मृण्मयीनं दुर्लक्ष करत उठायचा प्रयत्न केला ...साडीवर जमा झालेली वाळू झटकली ..गौर वर्ण,त्यातच सोनचाफा अंगावर पांघरलेला इतकं घायाळ करणारं सौंदर्य ,रागानं फुरफुरणारं नाक सौमित्र ला हसु आवरेना.. "तुमसे इजहार -ए- हाल कर बैठे !" "बेखुदी में ये कमाल कर बैठे रे! "
"अरे कीती जोरात गाणं म्हणतो आहेस ...?"सगळी बघताहेत आपल्याकडे ...
तीचा हात घट्ट धरुन ठेवलेला सौमित्रनं
" राग गेला म्हण ,सोडतो हात मग ".सगळीच लोकं बघायला लागलेली लाजून ती नं "हो बाबा ,केलं माफ ..म्हटलं तसं तीला आणखीन जवळ ओढत तीच्या डोळ्यात खोलवर पहात "खरं ना ?"असं विचारलं त्यानं ..कुठून एकदम गुलाबाचं टपोरं फूल काढलं तीच्या समोर धरत "मलिका ए हुस्न,नाचीज का तोहफा कबुल कर लिजिए ."त्यानं म्हटलं तसं "पुरे आता आगावू पणा"."वेडा झालायस तू "
मृण्मयी म्हणाली ..".असा का वागतोस..? कहर असतो सगळा तुझा ...तुझे ऋतुच समजत नाहीत मला ...कधी बेफाम कोसळतोस,कधी निःस्तब्ध होतोस ,कधी अवखळ इतका निरागस बालका सारखा ,कधी निगरगट्ट शुंभा सारखा कोणता ऋतु तुझा खरा ...?"
"भांबावून जाते मी." "केंव्हा खरा असतोस तू ...?"चार पावलं पुढं आले की आक्रसून घेतोस स्वतःला ,मी माघार घेणार दिसलं की बेलगाम होतोस नक्की रुपं कोणती तुझी ...?"समोरच्या समुद्रा सारखा आहेस नितळ ,थांग न लागू देणारा ..वरून निश्चल वाटत असलास तरी पृष्ठावर अभेद्य आवर्तन असतात तुझ्या मनाच्या ...कित्येक जन्माची खळबळ बाळगून असल्या सारखी..."
"कसं कापू अंतर हे मी ...?"
"माझ्या साठी असह्य , अनाकलनिय गोष्टी आहेत या ."
क्रमशः ......
©लीना राजीव.

🎭 Series Post

View all