समृद्धी पेक्षा ममतेचा स्पर्श मोठा. भाग १ –
शिवम देशमुख. मुंबईच्या वरळी सी-फेसवर असणाऱ्या टॉवरमधील ४४व्या मजल्यावर त्याचं आलिशान घर. बाप मोठा बिल्डर. आई समाजसेविका, पण तिचं समाज म्हणजे टेबलावर ठेवलेली फायली आणि इनस्टाग्रामवरचे फोटो. शिवमचं शिक्षण महागड्या इंटरनॅशनल शाळेत, आईबाबांनी त्याचं सगळं ‘बेस्ट’ दिलं. फक्त... वेळ नाही दिला.
त्याच्या वाढदिवसाच्या दिवशीही आई एका कार्यक्रमात व्यस्त होती आणि बाबा सिंगापूरच्या बिझनेस ट्रिपवर.
"तू किती लकी आहेस रे!" असं मित्र अनेकदा म्हणायचे. पण त्याच्या मनात एक खळखळती पोकळी होती.
एका दिवशी त्याचा वर्गमित्र अर्जुन चार दिवस शाळेत आला नाही.
शिवमला कळलं – "अर्जुनच्या घरी काहीतरी गंभीर आहे."
त्या दिवशी अर्जुन शाळेत दिसला नाही. सलग चार दिवस. तो त्याचा जवळचा मित्र होता. काळजी वाटून शिवम थेट त्याच्या घरी – वडाळ्याच्या चाळीत गेला.
“ओ, शिवम! चल ये आत. अर्जुन आजारी आहे रे, ताप आहे. पण तुला भेटल्यावर त्याला छान वाटेल."
दार उघडणाऱ्या अर्जुनच्या आईचं हसू एवढं आपुलकीचं होतं की शिवमचं मन त्या आपुलकीत भिजून गेलं.
लहानसं घर, जुन्या भिंतींवर फाटकी पोस्टर्स, ओल्या भिंती आणि गरिबीचं वास्तव. पण तिथे एक वेगळीच गोष्ट शिवमला जाणवली.ती होती – माणुसकी.
कळकट भिंती, पंखा कर्कश आवाज करत होता. पण दार उघडणाऱ्या अर्जुनच्या आईच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं.
शिवमने चपला काढल्या. घरात एका बाजूला छोटासा देव्हारा, फुलांच्या हारांनी सजलेला. दुसऱ्या बाजूला अर्जुनचा अभ्यासासाठी असलेलं टेबल खुर्ची, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे – त्या घरात हसणाऱ्या चेहऱ्यांचं अस्तित्व शिवमला दिसलं.
त्याच्या मनात आलं, शिवमच्या घरी आपल्या घरी ज्या गोष्टी आहेत त्यातील काहीच नाही तरीही सगळ्यांचे चेहरे आनंदी आहेत.
आपण ज्या शाळेत जातो तिथे अर्जुनला येणं यांना कसं परवडलं असेल? त्याचा युनीफाॅर्म आपल्या सारखाच असतो. त्याचं वागणं, बोलणं यात कधीच शंका आली नाही की तो अश्या चाळीत रहात असेल.

घरात देवघर, अभ्यासाचा कोपरा, आणि भिंतींवर अर्जुनने रंगवलेली चित्र. पण यात शिवम च्या मनाला सगळ्यात जास्त भावलं ते – त्या घरातली जिवंत माणसं.
"शिवम, काय झालं रे? कोणत्या विचारात आहेस? " आजारी अर्जुनने विचारलं.
त्याच्या प्रश्नाने शिवम भानावर आला.
शिवमने डोळे भरून पाहिलं. आणि त्याच्या मनात विचार आला –
"इतकं प्रेम, इतकं आपलेपण... हे मला मिळेल का कधी?"

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा