संभ्रम कविता

कविता
वाट तुझी रोज पाहताना
संभ्रम भासे का मनाला
वाट शोधता तुझी राया
हरवेल मीच नाही ना

भेट तुझ्या अबोल प्रीतीची
जपून ठेवली या हृदयी
भेट एकदा मिठीत घेऊनि
हीच कल्पना या कवीहृदयी

कर तुझा हाती घेऊनिया
रात सरावी चांद ताऱ्यांची
कर वर्षाव तुझ्या प्रेमाचा
सुखे बरसावी आठवांची

कर आसवांचा प्रेमावरी लागे
स्वप्नीही तुझेच मुख दिसे
कर विरहाचा अंत यासमये
जगू दे मज तुजसवे !

~ मीरा ✍️

कर : tax
कर : हात , करणे
भेट : गिफ्ट
भेट : भेटणे
वाट : wait
वाट : रस्ता