समर्थांची लेक भाग ३९
मागील भागात आपण पाहिले कि दामोदरपंतांच्या मृतदेहाला अग्नी देऊन महाराज, मीत, अविरत, उद्धवमहाराज आणि अक्षता तिच्या घरी जायला निघतात.. आता बघू पुढे काय होते..
गाडीत अक्षताचा फोन वाजला.. अक्षताने फोन उचलला. समोरचा आवाज ऐकला आणि फोन कट केला.. मीतने आश्चर्याने अक्षताकडे पाहिले.. अक्षता खिडकीच्या बाहेर पहात होती.. परत फोन वाजला.. अक्षताने नंबर न बघताच फोन कट केला..
" अक्षता, बघ तरी कोणाचा फोन आहे.. परत परत फोन येतो आहे म्हणजे काही तरी महत्वाचे काम असू शकेल. "
" मीत, सुपर्णा आहे.." हे बोलेपर्यंत परत फोन वाजला. अक्षताने फोन कट करायच्या आधी महाराज म्हणाले, " अक्षता तो फोन उचल."
महाराजांची आज्ञा अक्षताला अव्हेरायची नव्हती.. तिने फोन उचलून लाऊड स्पीकर वर ठेवला..
" अक्षता, प्लीज फोन कट करू नकोस.. मला तुझ्याशी खूप महत्त्वाचे बोलायचे आहे.."
" बोल.."
" तू आता कुठे आहेस?" अक्षताने महाराजांकडे पाहिले.. त्यांनी नकारार्थी मान हलवली..
" मी आता बाहेर जाते आहे का?"
" अक्षता तुला धोका आहे.. म्हणूनच मी हि वेगळ्या नंबरवरून तुला फोन करते आहे.. कारण मला अमरच्या नजरेत यायचे नाहीये.. पण तुला सावध करणे मला गरजेचे वाटले.."
" थॅंक यू.. फोन ठेवू?"
" अक्षता, तो भैरोबाबा मला हवा आहे.."
" अच्छा त्यासाठी तू फोन केलास का? पण आता लगेच मी तुला नाही देऊ शकत.. सांगितले ना मी बाहेर आहे म्हणून.."
" अक्षता विश्वास ठेव माझ्यावर.."
अक्षताने सुपर्णाला जास्त बोलू न देता फोन कट केला.. अक्षताचे डोळे पाणावले होते.. मीतने हलकेच तिच्या हातावर थोपटले.. गाडीत शांतता पसरली होती.. अक्षताने वळून महाराजांना विचारले.. "महाराज, सांगाल का, हे काय चालू आहे.. आईने सांगितले होते तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवायला.. काय आहे हि शक्ती? ज्यासाठी माझ्या एवढ्या जिवलगांनी प्राण गमावले आहेत.. जिच्यावर मी बहिणीसारखे प्रेम केले ती सुपर्णाही त्या शक्तीसाठी माझ्यासोबत होती? काय आहे ते नक्की?"
महाराजांनी दोन क्षण डोळे मिटले.. थोडा विचार केला आणि बोलायला सुरुवात केली.. " अक्षता सुष्ट विरूद्ध दुष्ट हा लढा जगाच्या सुरूवातीपासून सुरू आहेच.. या लढ्यात बर्याचाच आहुत्या पडतात जशी तुझ्या कुटुंबाची पडली आहे. पण तू एकटीच अशी नाहीस.. हा मीत बघ.. उद्धव बघ. उद्भवला तरी माहित आहे.. हा मीत तर तुझ्यासारखाच अनभिज्ञ आहे.. कधीतरी तुम्हाला सांगायचेच होते.. आज सांगतो.. हा जो काही अमर आहे ना तो या उद्धवचा सख्खा काका आहे.. त्या अमरने स्वतःच्या वडिलांना, भाऊ , भावजय आणि पुतणे यांना बळी द्यायचे ठरवले होते.. पण त्यांनी आपला प्राणत्याग केल्यामुळेच तो यशस्वी होऊ शकला नाही.. त्यानंतर त्याची नजर वळली त्याच्या पुतण्याच्या बायकोवर जी त्यावेळेस गरोदर होती.. पण उद्धवने आधीच तिला मठात आणून ठेवल्यामुळे तिचे आणि तिच्या होणाऱ्या बाळाचे प्राण वाचले.. पण आपला संसार क्षणात संपल्याचे दुःख तिला सहन झाले नाही.. या मीतला आमच्या पदरात टाकून तिनेही देहत्याग केला.." हे ऐकून मीतने पटकन गाडी थांबवली..
"हो मीत.. हा उद्धव खरेच तुझा काका आहे.. पण तुझ्या आणि त्याच्या दोघांच्याही जीवाला धोका असू शकत होता म्हणूनच आम्ही ते तुला कधीच सांगितले नाही.." मीतने उद्धव महाराजांकडे पाहिले.. पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांनी मान हलवली..
" कळले अक्षता तुला मीतबद्दल.. विचार कर किती दुःख झाले असेल मला त्या चौघांना प्राणत्याग करायला सांगताना.. हो मीच सांगितले त्यांना.. मीत तुला नेहमीच ती अंगठी घातल्यावर सुरक्षित वाटते, आपुलकी वाटते.. कारण ती तुझ्या वडिलांची अंगठी आहे.. तीच ते वापरायचे.. आणि शेवटी तीच अंगठी समोर ठेवून त्यांनी प्राणत्याग केला.." मीत सुन्न होऊन ऐकत होता.. त्याच्याही नकळत तो परत ती अंगठी कुरवाळू लागला.. महाराजांनी एक घोट पाणी पिऊन परत बोलायला सुरुवात केली..
" मोहिनी अवतार माहित आहे?"
मीत आणि अक्षताने मान हलवली..
" मोहिनीकडून दैत्यांनी जेव्हा अमृताचा कुंभ घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याचे चार थेंब पृथ्वीवर पडले.. तिथेच कुंभमेळा होतो.. हे सर्व कुंभमेळे सुरू होण्याआधीची गोष्ट आहे.. आपल्या पंथाच्या संस्थापकांनी अवधूत महाराजांनी चारही ठिकाणचे पवित्र पाणी गोळा केले.. प्रत्येक वेळेस ध्यान करताना किंवा जप करताना त्यांनी ते समोर ठेवले.. तिच प्रथा त्यांच्यानंतर जेवढे महाराज आले त्या सगळ्यांनी ती पाळली.. आधीच ते अमृततुल्य पाणी त्यात ही आराधना.. असे म्हटले जाते कि त्या पाण्याचे रूपांतर खरेच अमृतात झाले आहे.. आधी तो पाण्याचा कुंभ मठातच असायचा. पण बरेच दुष्ट प्रवृत्तीचे लोक त्याच्यामागे लागायला लागले तेव्हा तत्कालीन महाराजांनी तो एका गुप्त जागी ठेवण्यास सांगितले.. बरेच वर्ष तो मी ठेवला होता.. पण जेव्हा या अमरच्या कारवाया वाढल्या तेव्हा मला अनेकदा कुठेही जावे लागे.. म्हणून मी तो दामोदरकडे ठेवायला दिला होता.. अमरने बहुतेक त्याबद्दल कुठेतरी ऐकले असावे किंवा त्याला मिळालेल्या गोलकात त्याने त्याविषयी पाहिले असावे ते काही माहित नाही.. त्या कुंभावर असलेल्या मंत्रप्रभावामुळे त्याची जागा त्याला कळणे त्याला शक्य नाही.. खरेतर मलाही माहित नाही दामोदरने तो कुठे ठेवला आहे.. तो शोधणे आणि कुठेतरी सुरक्षित ठेवणे हेच आता सगळ्यात महत्वाचे आहे.. कारण अमरला हे कळले आहे कि तो कुंभ तुमच्याच घराण्याकडे आहे.."

हे सगळे ऐकून सगळेच विस्मित झाले होते.. एक ऐतिहासिक, पौराणिक संदर्भ असलेली गोष्ट आपल्याला शोधायची आहे या विचाराने मीत आणि अक्षता खूपच उत्तेजित झाले होते.. सगळे अक्षताच्या घरी पोचले.. मालतीताई सुधीर, संगीता आणि रियासोबत त्यांच्या स्वागतासाठी तयार होते.. सगळे हातपाय धुवून घरात गेले.. घरात जाण्याआधी महाराजांनी भस्माची रेख घराभोवती आखून घेतली.. सगळे भुकेलेले होते. प्रवासाने आणि झालेल्या घटनेने दमले होते. सगळे चहा घेत होते. छोट्या रियाला आपल्याला कोणीतरी बोलावते आहे असा भास झाला. सगळे गप्पा मारता आहेत. आई मालतीताईंसोबत स्वयंपाक करते आहे हे बघून ती एकटीच कोणालाच काहीच न सांगता घराबाहेर आली.. बाहेर दिसत तर कोणीच नव्हते. पण समोर काही तरी चमकताना काहीतरी दिसत होते.. ती समोर गेली.. तिथे एक सोन्याची अंगठी होती.. "आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांपैकी कोणाची तरी असेल असा विचार करून ती उचलून ती घरात आली.. जाता येताना तिच्याकडून ती भस्माची रेख पुसल्याचे तिला जाणवलेच नाही..
रात्रीचे जेवण झाल्यावर अक्षता, मीत, महाराज, उद्धवमहाराज , मालतीताई आणि अक्षता देवघरात बसले होते.. बाकी सगळे झोपायला गेले होते.. अक्षताने विषयाला सुरुवात केली,
" आई आजोबांनी कधी आपल्या घराच्या वारशाबद्दल काही सांगितले का ग?"
" नाही ग.. मी कधी या सगळ्यात पडलेच नाही.. तुझी आत्या आली कि ती मात्र तुझ्या आजोबांबरोबर सगळ्याच विषयावर बोलायची.. त्यांच्याबद्दल तुझ्या बाबांपेक्षाही जास्त माहिती ताईंना होती.."
आता काय करायचे अशा अर्थाने अक्षताने महाराजांकडे पाहिले..
" तुमच्या घराचे दप्तर आहे?" महाराजांनी विचारले..
\"घराचे दप्तर?\" मीत आणि अक्षताला आश्चर्यही वाटले आणि हसायलाही आले..
" हो.." मालतीताई म्हणाल्या.. हे ऐकून दोघेही चाट पडले.. "मामंजी आधी लिहित असत.. नंतर हे सुद्धा लिहून ठेवायचे.."
" कुठे ठेवायचे ते?"
मालतीताईंनी देवघरातील दत्ताच्या तसबिरीला नमस्कार केला आणि ती मोठी तसबीर बाजूला केली.. त्याच्या पाठी एक मोठे कपाट होते.. त्याचा दरवाजा त्यांनी सरकवला.. आतल्या फडताळात सगळी कागदपत्रे लावून ठेवली होती.. " यांनी मामंजी गेल्यावर हि जागा मला दाखवून ठेवली होती."
"एवढ्या कागदपत्रात कसे शोधणार?" मीतने विचारले..
"आपल्याला फक्त गेल्या पंचवीस वर्षांची शोधायची आहेत.. जुनी कागदपत्रे थोडी पिवळसर असतात.. तुम्हाला येतील ओळखू.. त्यामुळे कामाला लागा.."
सगळेजण कामात एवढे मग्न झाले होते कि घराच्या बाहेरचा दरवाजा उघडल्याचे कोणाला जाणवलेही नाही.. शोधता शोधता मीतला एक लिफाफा मिळाला. जो सगळ्यात वेगळा दिसत होता..
"महाराज." सगळ्यांनी मीतकडे पाहिले.
"उघडू ?" मीतने विचारले..
"हो.." महाराजांनी संमती दिली..
मीत तो लिफाफा उघडणार तितक्यात एक आवाज आला..
" नाही.. तो लिफाफा इकडे दे.." अमर म्हणाला..
"अजिबात नाही.." अक्षता पुढे येऊन म्हणाली..
"समर्थ घराण्याची उद्धारक.. त्या दिवशी तुझ्या आत्यामुळे तू वाचलीस.. पण आज हे कोणीच तुला माझ्यापासून वाचवू शकत नाही.." बोलता बोलता अमरने महाराज, उद्धवमहाराज, मीत आणि मालतीताईंवर कसलेसे भस्म टाकले .. ते अजिबात हालचाल करू शकत नव्हते.. "तुला मी तसेच तडफडवून मारणार जसे मी तुझ्या बापाला, आजोबाला मारले होते.. पण आधी तो लिफाफा.. जो आहे तुला इतके दिवस जिवंत ठेवण्यामागचे गुपित.. चल तयार हो.." अमरने एक छोटे पिस्तुल बाहेर काढले.. तो मीतच्या दिशेने चालला होता.. अमर तो लिफाफा डाव्या हाताने आपल्या हातात घेणार तोच अक्षताने त्याच्यावर झडप घातली.. ते बघताच त्याने तिच्यावर गोळी झाडली.. कोणी काहीच ना बोलू शकत होते ना हालचाल करू शकत होते.. सगळ्यांच्या डोळ्यातून पाणी वहायला लागले.. अमरने हसत तो लिफाफा हातात घेतला.. तेवढ्यात जोरात एक गोळी त्याच्या हाताला लागली.. तो लिफाफा खाली पडला.. अमरने वळून पाहिले.. अविरत हातात त्याची पिस्तुल घेऊन उभा होता.. अविरतच्या बोलला.. "तुझ्यामुळेच मी जन्माला आलो म्हणून मी तुझा जीव घेत नाही.. तुला एक संधी देतो.. तो लिफाफा इथेच टाक.. आणि आपला जीव वाचव.. नाहीतर तुला माझा नेम माहितच आहे.."
अमर हादरला.. चेहर्यावर उसने हास्य आणत तो म्हणाला,"अविरत काय बोलतो आहेस तू? तू तर माझा मुलगा आहेस.. मी तुलाच घ्यायला आलो होतो.. "
" मुलगा.. नाही.. तू मला एक साधन म्हणून वापरलेस.. हे महाराज जेव्हा माझ्या मनाशी संपर्क साधत होते तेव्हा माझ्या लहानपणापासूनच्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या.. कसा तू मला छळायचास.. मी काही बोलायला लागलो कि तुझे संमोहन वापरायचास. मला आठवत नसलेल्या अनेक गोष्टी मी केल्या असे सांगायचा. मी कुठे जाऊ नये म्हणून ते व्हिडिओ मला दाखवून घाबरवायचास.. सगळे आठवले मला.. आता तुझ्याकडे दोनच पर्याय आहेत. एक इथून पळून जाणे किंवा मृत्यूला सामोरे जाणे." अविरत निश्चयी स्वरात बोलत होता..
" बघून घेईन तुम्हा सगळ्यांना. नाही सोडणार.." अमर गोळी लागलेला हात घेऊन तिथून बाहेर पडला..अविरतने अमर बाहेर पडल्याची खात्री करुन घेतली. नंतर त्याने महाराजांकडे पाहिले.. गेले काही दिवस त्यांच्याशी होत असलेल्या मानसिक संवादामुळे त्यांना काय बोलायचे आहे ते त्याला समजले.. त्याने देव्हार्यातील देवासमोर ठेवलेले पाणी घेतले.. तिथे ठेवलेले भस्म उचलले.. त्याच्या सहाय्याने त्याने त्या चौघांना मुक्त केले.. नंतर सगळे अक्षताकडे वळले..

अक्षताने डोळे उघडले.. तिला तिचे आजी आजोबा, आत्या ,बाबा सगळे दिसले.. सगळे तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत होते.. अक्षताला रडायला आले.. ती म्हणाली.. "तुम्ही सोडून जावे माझी अजिबात अशी इच्छा नव्हती.." ती पुढे काय बोलणार इतक्यात तिला तिच्या आईच्या रडण्याचा आवाज आला.. ती का रडते आहे म्हणून अक्षताने पाठी वळून पाहिले तर.. अक्षता गोळी लागून पडली होती.. तिची आई जोरजोरात रडत होती.. मीत उद्धवमहाराजांच्या कुशीत शिरून रडत होता.. आणि महाराज गंभीरपणे तिच्याकडे पहात होते..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा