समर्थांची लेक भाग २९

Story Of A Lady Ghostbuster

समर्थांची लेक भाग २९



मागील भागात आपण पाहिले कि अमर अक्षताला राजस्थानला पाठवतो, जिथे एक अख्खे राज्य शापित आहे.. काय होईल पुढे पाहूया.




मीत आणि अक्षता ठरल्याप्रमाणे राजस्थानला निघाले.. ट्रेनचा प्रवास गप्पा मारत, सुपर्णाची आठवण काढत झाला.. कारण तिने भरपूर हट्ट करूनही तिच्या आईवडिलांनी तिला एवढ्या लांब पाठवायला नकार दिला होता. निघताना आत्याने मीतलासुद्धा एक अंगठी दिली होती..

   " त्याचे काय आहे मीत, आमची अक्षता जिथे जाते ना तिथे तिला शोधत आत्मे येतात.. ती स्वतःचे संरक्षण करू शकते.. तुझे काय? म्हणून हि अंगठी सतत घालून ठेव.. ऑफिसचे काम जरी असले तरी काळजी घेतलेली बरी.."

मीत आणि अक्षताने आत्याचे बोलणे हसण्यावारी नेले तरी अक्षता मनात धास्तावली होती, आत्याला आपण का जातो आहोत हे कळले कि काय म्हणून.. कारण त्या जागेची माहिती कळली असती तर आत्याने नक्कीच यायचा हट्ट केला असता जे तिला सध्या नको होते. तिला आश्चर्य याचे वाटत होते कि सुपर्णा त्यांना सोडायला स्टेशनवर सुद्धा आली नव्हती. शाळेत असल्यापासून हे तिघे एकत्रच असायचे. तिघांची मैत्री एवढी घट्ट कि जिथे अक्षता जायची तिथे सुपर्णा यायची.. आणि मीत पण बदली करून घ्यायचा.. त्या पार्श्वभूमीवर सुपर्णाचे स्टेशनवर सुद्धा न येणे दोघांनाही खटकत होते.. पण दोघांनीही प्रवासात त्या विषयावर बोलणे टाळले.. दोघांनीही किल्ल्याजवळच्याच हॉटेलात रहायचे ठरवले होते.

"मॅडम, हॉटेलमध्ये दोन वेगळ्या रूम बुक केल्यास का?" मीतने विचारले.

" का, तुझा माझ्यावर विश्वास नाही का?" 

" तू बरी आहेस ना? इथे विश्वासाचा काय प्रश्न? पण कोणी काही बोलायला नको म्हणून विचारले."

" मीत, यावेळेस आपण एकाच रूममध्ये राहू तेही तुला चालणार असेल तरच. गेले काही दिवस कोणीतरी सतत माझा पाठलाग करत आहे असे मला वाटते. दोघेही वेगळे राहिलो तर धोका वाढेल असे मला वाटते."

" तू या गोष्टी मला आधी का नाही सांगत?"

" काय सांगू? मला असा भास होतो म्हणून.. पण मी जेव्हा वळते किंवा गाडीच्या आरशात बघते तेव्हा कोणीच दिसत नाही. कोण विश्वास ठेवेल माझ्यावर?" अक्षता वैतागून बोलत होती..

" बरं.. आता चिडू नकोस.. आपण एक काम करू. दाखवायला दोन रूम घेऊ.. पण एक दिवस या खोलीत तर दुसऱ्या दिवशी त्या असे राहू.. चालेल का?"

" हो.. धावेल.."

हॉटेल मध्ये रूम बुक करुन, सामान ठेवून, फ्रेश होऊन दोघे ठरवल्याप्रमाणे किल्ल्यावर चक्कर मारून आले. पण तिथेही त्यांना नेटवर असलेलीच माहिती मिळाली.. उन्ह उतरायला लागली तसे तिकडचा रखवालदार सगळ्यांना बाहेर काढायला लागला. पहिले दोन दिवस तरी हे दोघे तिथे जाऊन फक्त बघणार होते, तिथे काय आहे आणि काय नाही ते.. त्यामुळे बाकीच्या लोकांसोबत ते ही परत निघाले.. पांढरेशुभ्र कपडे घातलेला एकजण या दोघांच्याही पाठी पाठी फिरत होता.. यांच्या पाठोपाठ तो किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत आला.. मीत आणि अक्षता दोघांनाही ते जाणवले होते. पण अनोळखी ठिकाणी उगाच भांडणे नको. म्हणून ते गप्प बसले होते. खाली आल्यावर मात्र त्याने या दोघांना हाक मारली..

" बेटी, रूको जरा.."

हे दोघेही थोडे चपापले. पण तो काय म्हणतो आहे ते तरी पाहूया, असे म्हणत थांबले. ते वळले.. आता त्यांनी पहिल्यांदाच त्या व्यक्तीला व्यवस्थित पाहिले. सगळे केस, कपडे पांढरेशुभ्र. चेहर्‍यावर सुरकुत्यांचे जाळे. पण चालण्यात ताठपणा.. "तुम जो करना चाहते हो , उसमें मैं तुम्हारी मदद कर सकता हूं.. अभी समय नही हैं.. कल सुबह किले के पिछले दरवाजेपर आ जाना. वहीं मिलते हैं." आणि या दोघांच्या उत्तराची वाटही न पाहता तो वृद्ध किल्ल्याच्या दिशेने चालायला लागला.. 'जर रात्री किल्ल्यावर कोणाला रहायची परवानगी नसेल, तर मग हा वृद्ध परत वर का गेला? आणि तो जर परत खाली उतरणार असेल तर एवढ्या कमी वेळात, या वयात त्याला शक्य होईल का?' असा विचार करतच मीत आणि अक्षता हॉटेलवर आले.. आधी थकवणारा प्रवास आणि नंतर किल्ल्यावरची पायपीट त्यामुळे दोघेही भरपूर थकले होते. जेवूनच रूमवर जाऊ असा विचार करत ते जेवायला जवळच्याच एका खाणावळीत गेले. त्या खाणावळीत त्यांना एका अतिशय राजबिंड्या व्यक्तीचा फोटो लावलेला दिसला.. त्याचा चेहरा इतका आकर्षक होता कि सतत नजर त्याच्याकडेच वळत होती. न राहवून अक्षताने खाणावळीच्या मालकाला विचारले, 

"यह किसकी तसबीर है? बडी खुबसुरत है.." त्या मालकाने अक्षताकडे केलेले दुर्लक्ष पाहून मीत पुढे झाला..

" क्या बात है भाईसाब.. आपका खाना तो बहोत अच्छा था.." या स्तुतीने तो मालक खुश झाला. आणि रंगात येऊन मीतशी गप्पा मारायला लागला.. अक्षताला त्या मालकाचा खूप राग आला होता.. पण मीतने हळूच सूत्रे आपल्या हाती घेऊन किल्लयाचा विषय काढला म्हणून ती गप्प बसली..

" कितने दिन रहनेवाले है यहां?" त्या मालकाने विचारले.

" जितने दिन हमारी घरवाली कहे.." मीतने अक्षताकडे हात दाखवत म्हटले.

" अच्छा, आपकी घरवाली है.. मै तो कुछ अलगही समझा.. माफ करना बहेनजी वो आपने सुहागके गहने नहीं पहने ना, तो हमने कुछ अलग समझा."

त्याचे हे कारण ऐकून अक्षताने डोक्यावर हात मारणेच बाकी होते. 

" यहां क्या क्या देखेंगे?"

" सच कहे तो हमे सिर्फ किला देखने आए हैं." मीतने सांगितले.."अगर हो सके तो वहां एक रात रहनेका इरादा भी है.." मीतने अजून एक खडा टाकला. हे ऐकून मालकाच्या चेहर्‍यावरचे रंगच उडाले.. 

"आप नये शादीशुदा लगते है.. इसिलिए बताता हूं.. कभी भूलकरभी उस किले पर रातको रहनेकी भूल मत किजीए.. हमारे दादा, परदादा किलेपरही रहते थे.. वह सब छोडकर यहां रहते है, इसिसे बातको समझिये. अभी मॅडमजीने उस तसबीरके बारेमें पूछा. वह तसबीर हमारे राजाजीकि है.. आप यहांके किसीभी दुकानमें जाईये आपको यह तसबीर दिखेगीही.."

" कोई खास वजह?" अक्षताने विचारले.

" जी हां, यहांके सब लोगोंका मानना है, कि यह राजाजीहि है जो सबकी रक्षा करते है.. उनकी हि कृपासे हम यहां हि सही बिनझिझक रहते है."

यावेळेस मात्र त्या मालकाने अक्षताला उत्तर दिले.

" आप कह रहे है कि सब जगह इनकी तसबीर है, पर हमारे हॉटेलमें मैने तो नही देखी." अक्षताने सांगितले.

" किस हॉटेलमें रूके है आप?" हॉटेलचे नाव ऐकून मालक गप्प झाला. 

"आपको इस के बारेमें किसीने बताया है, या आप खुदही वहां गए है?" मालकाचा नवीन प्रश्न आला. अक्षताच्या डोळ्यासमोर अमरने दिलेले कार्ड आले. त्यावर त्या हॉटेलचे नाव कुठेतरी वाचल्यासारखे तिला वाटले होते, म्हणून तिने इथे रहायचे मीतला सुचवले होते. पण त्या मालकाची प्रतिक्रिया पाहून तिने गप्प रहाणे पसंत केले. ते बघून मीत बोलला, "ऐसा किसीने बताया नही. बाहरसे देखा पसंद आया.. वहांपे रूम ले लिया.."

" या तो आप दोनो सचमें बडे भोले है, या तो बहोत चलाख.. चलिये, अगर आपका खाना हो चुका है तो निकलिये यहांसे." तो मालक यांना तिथून हुसकावत म्हणाला.. आतापर्यंत चांगले बोलणारा हा आता अचानक का बिघडला हे त्या दोघांनाही कळेना.

" मा कसम भाईसाब, हमें इसके बारेमें कुछ नही पता.. प्लीज हमारी मदद किजीये." मीत गयावया करत म्हणाला.. त्याचे ते तसे बोलणे आणि या दोघांचे चेहरे बघून तो मालक विरघळला. म्हणाला ," एक वही हॉटेल है जो हमारे राजासाबको नही मानता. उसका मालिक कौन है, किसी को पता नही.. पर ऐसा कहते है कि काला जादू करनेवाले कोई लोग है. आप दोनो भी बचके रहिए वहांपे." हे ऐकून मीत आणि अक्षताने एकमेकांच्या नकळत आपापली सॅक चाचपली.. आत्याच्या सांगण्यावरून अक्षताने आत्याने दिलेली चेन गळ्यात इतर कोणाला दिसणार नाही अशा पद्धतीने घातली होती. आणि जवळच्या सॅकमध्ये गंगाजल, अभिमंत्रित तांदूळ, अंगारा हे सगळे सॅकमध्येच ठेवले होते. ते आपल्यासोबत आहे या भावनेनेच तिला हायसे वाटले. मीतची प्रतिक्रिया पण बरीचशी तशीच होती. 

" जितने जल्दी हो सके वहांसे निकल जाईये. और अगर कोईभी तकलीफ हो तो मुझे कहिये.. मै आपकी मदद के लिए तय्यार हूं.." मालकाने आपले बोलणे पूर्ण केले..

" अरे आप क्यू इतनी तकलीफ कर रहे हैं, हमारी खातर.." मीत त्याला म्हणाला.

" इसमें तकलीफ कैसी? आप राजस्थानके मेहमान है.. अगर हमें पता है कि आप कुछ संकटमे है, तो बचाना हमारा धर्म है. वैसे भी मॅडमजीने मुझे भाईसाब कहके पुकारा है, तो वह हमारी बहन हुई ना.. और बहन कि रक्षा करने के लिए एक रजपूत कभी पिछे नहीं हटेगा."

    त्या मालकाचे आभार मानून, त्याचे कार्ड घेऊन दोघेही हॉटेलच्या दिशेने निघाले.. जाताना दोघेही विचारात गढले होते..

" मीत"

"अक्षता" दोघेही एकत्र बोलले.

" आधी तू बोल" मीत म्हणाला.

" आपण याच्यापुढे आपल्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्यासोबतच ठेवूया.. आणि मीत आत्याने दिलेली अंगठी हातातून अजिबात काढू नकोस." अक्षताने मीतला सांगितले. 'आत्याला कशी अंतःप्रेरणा झाली असेल?' अक्षता मनात विचार करत होती. मीतने प्रेमाने ती अंगठी कुरवाळली. त्याच्या डोळ्यात पाणी तरळल्याचा अक्षताला भास झाला.

" अक्षता, यापुढे आपण हॉटेलमध्ये काही महत्त्वाचे बोलायचे नाही.. आणि राहू आपण एका खोलीतच."

मीतने त्याचा विचार मांडला..




ती वृद्ध व्यक्ती कोण आहे? काय सांगणार आहे ती अक्षताला आणि मीतला. अंगठी कुरवाळताना मीतच्या डोळ्यात पाणी येण्यामागे काही खास कारण आहे का? पाहू पुढच्या भागात..


हि कथा काल्पनिक असून मनोरंजनात्मक हेतूने लिहिण्यात येत आहे. अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा अजिबात हेतू नाही.


हा भाग कसा वाटला सांगायला विसरू नका..

सारिका कंदलगांवकर 

दादर मुंबई

🎭 Series Post

View all