समर्पण-एक प्रेमकथा भाग ९६

एक अनोखी प्रेमकथा
समर्पण-एक प्रेमकथा भाग ९६

मागील भागाचा सारांश: नीरजाने रणजीतची बहीण रजनीला फोन करून तिची अपॉइंटमेंट घेतली. नीरव साठी जेवणाचा डबा घेऊन ती हॉस्पिटलमध्ये गेली.

आता बघूया पुढे…

“मे आय कम इन मॅडम?” गौरवने नीरजाच्या केबिनच्या दरवाजावर नॉक करून विचारले.

“यस कम इन.” नीरजा.

गौरव आत आला. नीरजाने त्याला आपल्या समोरील खुर्चीत बसायला सांगितले.

“माझ्याकडे काही काम होतं का?” नीरजाने गौरवकडे बघून विचारले.

आपल्या हातातील एक कागद पुढे करत तो म्हणाला,
“डॉ स्नेहाचं लिव्ह ऍप्लिकेशन तुम्हाला द्यायला तिने सांगितले होते.”

“ओके.” नीरज एवढंच म्हणाली.

“काल हॉस्पिटल मध्येच स्नेहाचा पाय मुरगळला. तिच्या पायाला बरीच सूज आहे, तिला नीट चालताही येत नाहीये, सो तिला काही दिवस आराम करण्याची गरज आहे.” गौरव बोलत असताना नीरजा त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव टिपत होती.

“ओके. पायाचा एक्सरे काढला का?” नीरजाने विचारले.

“हो. स्नेहा एक्सरे काढायला नाही बोलत होती, पण मीच तिला खूप फोर्स केला. हेअरलाईन क्रॅक असेल याची मला भीती होती, पण थँक् गॉड असं काही झालं नाही. मला तर टेन्शनच आले होते.” गौरव अगदी सहजपणे बोलून गेला.

“डॉ गौरव अग्रवाल, तुमची आणि स्नेहाची फ्रेंडशीप झालेली दिसतेय.” नीरजाला गौरवचे उत्तर काय असेल याची उत्सुकता लागली होती.

“हो. मी हॉस्पिटल जॉईन केल्यापासून आम्ही दोघे सोबतच काम करत आहोत, तर आमच्यात फ्रेंडशीप झाली. आमचे विचार बऱ्यापैकी मिळते जुळते आहेत.” गौरवने उत्तर दिले.

यावर नीरजा म्हणाली,
“डॉ गौरव, कदाचित तुम्हाला माहीत नसेल, मी व स्नेहा चांगल्या फ्रेंड्स आहोत, आम्ही दोघी माझं लग्न होईपर्यंत रुममेट्स होतो.”

“ओह! हे मला खरंच माहीत नव्हतं. तसं माझ्यात आणि स्नेहामध्ये काही डिस्कशन झालं नाही.” गौरव म्हणाला.

“ओके, नो प्रॉब्लेम.” नीरजाचा मोबाईल वाजल्याने गौरव तिच्या केबिन मधून निघून गेला.

मुक्ताने घरी कधीपर्यंत येणार यासाठी नीरजाला फोन केला होता. हॉस्पिटल मधील पेंडींग कामं आवरून नीरजा घरी गेली. आवरून ती मुक्ताला घेऊन लगेच घराबाहेर पडली. रजनीने तिच्या घराचं लोकेशन पाठवलं असल्याने तिचा पत्ता शोधायला अडचण आली नाही.

रजनीने मुक्ता व नीरजाचं हसून स्वागत केलं. नीरजा व मुक्ता रजनीच्या घरात जाऊन सोप्यावर बसल्या. रजनीच्या घरातील एका बाईने त्या दोघींना पाणी आणून दिले. रजनी त्यांच्या सोबत तिथेच बसली होती.

“हाय, मी डॉ नीरजा जोशी. मीच तुम्हाला फोन केला होता. ही माझी नणंद मुक्ता.” नीरजाने रजनीला आपली ओळख करून दिली.

“हाय, मी नीरवला दोन वेळेस भेटले होते. रणजीत आणि नीरव दोघे चांगले मित्र आहेत, सो नीरवला घरातील सगळेचजण ओळखतात.” रजनी म्हणाली.

“हो, नीरव तसं बोलले होते. मुक्ताला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचे क्लासेस करायचे आहेत. आता तुम्ही घरातल्या प्रमाणे मार्गदर्शन करा म्हणजे तीही तिच्या आयुष्यात लवकर सेट होईल.” नीरजाने सांगितले.

यावर रजनी म्हणाली,
“मला रणजीतने मुक्ताच्या आयुष्यात जे घडून गेलं आहे, त्याची कल्पना दिली आहे. सो मी मुक्ताचं आयुष्य कसं पटकन मार्गी लागेल याकडे लक्ष देईल. हे सगळं करताना तिचा इंटरेस्ट कशात आहे हेही लक्षात घ्यावे लागेल.
उद्या सकाळी ११ वाजता मी एका कॉलेजमध्ये करिअर गाईडन्स या विषयावर लेक्चर द्यायला जाणार आहे, तर सोबत मुक्ताला घेऊन जाईल. मी तिकडे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कोर्सेस बद्दल डिटेल मध्ये माहिती देणार आहे सो मुक्ताला सगळंच कळेल आणि पुढे काय करायचं याबद्दल ती क्लिअर होईल.”

ज्या बाईने पाणी आणून दिले होते तिनेच मुक्ता व नीरजाला चहा आणून दिला.

“तुम्ही क्लासेस कुठे घेतात?” नीरजाने रजनीकडे बघून विचारले.

“सुरुवातीला स्टुडंट कमी होते तर घरीच क्लासेस घ्यायचे. दिवसेंदिवस स्टुडंट वाढल्याने बाजूच्या बिल्डिंग मध्ये 3 bhk फ्लॅट आहे तिकडे इन्स्टिट्यूट सुरू केलं. मला वाटलं नव्हतं की, इतक्या पटकन एवढं वाढेल पण कष्टाला फळ मिळालं.
माझा मुलगा अंश लहान असल्याने मी जवळच इन्स्टिट्यूट सुरू केलं. आता ज्या तुम्हाला चहा-पाणी देऊन गेल्या ना त्या सविता ताई घरातील कामं व अंशला सांभाळायचं काम करतात, पण मला लक्ष ठेवावेच लागते.” रजनीने सविस्तरपणे सगळी माहिती दिली.

“एका लहान बाळाला सांभाळून एवढं मोठं इन्स्टिट्यूट चालवणं खरंच कौतुकास्पद आहे. मी वेबसाईट बघितली त्यावरून तुम्ही किती काम करता याचा अंदाज आला.” इतक्या वेळ शांत बसलेली मुक्ता म्हणाली.

“थँक्स. मुक्ता, एकदा आपण मनाशी काहीतरी करून दाखवायचं ठरवलं ना, तर मग वाटेत कितीही अडचणी, संकटं येऊदेत. आपण त्यातून मार्ग काढतो. पाण्यात पडल्यावर पोहोता येत, फक्त आपल्याला हातपाय मारावे लागतात.” रजनी स्माईल देऊन म्हणाली.

“तुमचं बोलणं ऐकून मनात पॉजिटीव्हीटी निर्माण झाली आहे. मी काहीतरी करू शकते, हा विश्वास वाटू लागला आहे.” मुक्ता म्हणाली.

रजनी पुढे म्हणाली,
“मुक्ता, मी हे सगळ्यांनाच सांगत असते तसंच तुलाही सांगते. कितीही कठीण परिस्थिती समोर येऊन उभी राहिली, कितीही वेळा हार पत्करावी लागली असेल, तरी आपला स्वतः वरील विश्वास कमी होऊ द्यायचा नाही. Selft confidence is more important.”

“ रजनी मॅडम, तुम्ही हे एकदम बरोबर बोललात. स्वतःवर विश्वास असेल तरच सगळं काही शक्य आहे. दरवेळी आपल्याला कोणीतरी मोटीव्हेट करेल ही अपेक्षा ठेवायची नाही. स्वतःच स्वतःला मोटीव्हेट करायचं.” नीरजा म्हणाली.

“मुक्ता, मी तुला फॉर्म भरण्याची लिंक पाठवते, त्यावर जाऊन तुझ्या डिटेल्स भर आणि तुला कितीच्या बॅचला यायला जमेल तेही सांग. उद्यापासून क्लासला येत जा. उद्या तुला स्टडी मटेरियल मिळून जाईल. काही अडचण आली तर डायरेक्ट माझ्याशी निःसंकोचपणे बोलत जा.” रजनीने सांगितले.

“मॅडम, कोर्सची फी कधी भरायची?” नीरजाने विचारले.

“तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा भरा.” रजनीने चेहऱ्यावर स्माईल आणून उत्तर दिले.

“असं नाही मॅडम. जे नियमानुसार असेल तसं सांगा.” नीरजा.

“ओके. मुक्ताचा फॉर्म भरून झाल्यावर मी व्हाट्सएपवर सगळे डिटेल्स पाठवते, त्यानुसार तुम्हाला फी भरायला सोपं पडेल.” रजनी.

“चालेल. आता आम्ही निघतो.” नीरजा सोप्यावरून उठत म्हणाली.

“पुढच्या वेळी नीरव आणि तुम्ही जोडीने घरी जेवायला या.” रजनी हसत म्हणाली.

“तुमचा निरोप मी ह्यांच्या पर्यंत पोहोचवते. बघू ते काय म्हणतात.” नीरजा.

“तो बहिणीच्या घरी यायला कधीच नाही म्हणणार नाही. मी रणजीतला त्याला फोन करायला सांगेल.” रजनी.

रजनीचा निरोप घेऊन नीरजा व मुक्ता तेथून बाहेर पडल्या.

गाडीत बसल्यावर नीरजाने मुक्ताकडे बघून विचारले,
“तुला रजनी मॅडम कश्या वाटल्या?”

“चांगल्या वाटल्या. त्यांच्याकडे बघून, त्यांचं बोलणं ऐकून त्यांच्याही आयुष्यात बरीच संकटे येऊन गेली असतील असं वाटलं.” मुक्ताने उत्तर दिले.

“मुक्ता, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे येतच असतात. फक्त ती संकटे वेगळ्या स्वरूपात असतात. आता रजनी मॅडमच्या आयुष्यात काय संकट आल असेन यापेक्षा आजरोजी त्या जिथे उभ्या आहेत त्याकडे आपण लक्ष देऊयात.

मुक्ता, तुला तुझ्या नशिबाने आयुष्यात नव्याने उभं राहण्याची एक नवीन संधी दिली आहे, त्या संधीचं सोन कर.” नीरजा म्हणाली.

“हो. मी ही संधी अशीच वाया जाऊ देणार नाही.” मुक्ताच्या डोळ्यात आत्मविश्वास दिसून येत होता.

घरी गेल्यावर नीरजाने गीता ताईंना फोन करून अंजलीची चौकशी केली. शालिनी ताईंना फोन करून त्यांची व सविताची चौकशी केली. स्नेहाला फोन करून तिचा पाय आता कसा आहे व उद्या तुला भेटायला येऊन जाईल असं सांगितलं.

नीरव घरी आल्यावर नीरजा, नीरव व मुक्ता या तिघांनी गप्पा मारता मारता एकत्र जेवण केले. नीरजाने रजनी व तिच्या इन्स्टिट्यूट बद्दल नीरवला सगळी कल्पना दिली. नीरवने नीरजाला हॉस्पिटल मधील दोन सिरीयस पेशंट बद्दल माहिती सांगितली.

सकाळचा प्रवास व दिवसभराची धावपळ यामुळे ते तिघेही लवकर झोपी गेले.

क्रमशः

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all