समर्पण-एक प्रेमकथा भाग ४
मागील भागाचा सारांश: नीरजाला दहावीत चांगले गुण मिळाल्याने शालिनी ताईंनी तिचे अकरावीचे ऍडमिशन के टी एच एम कॉलेज नाशिक येथे करून दिले. तिची रहाण्याची व्यवस्था होस्टेलला केली.
आता बघूया पुढे….
शालिनी ताईंनी मार्केटमध्ये जाऊन नीरजा साठी काही कपडे खरेदी करून दिले. काही आवश्यक असणाऱ्या वस्तूही घेऊन दिल्या. गीता ताई व नीरजाला घरी सोडून त्या एका कार्यक्रमासाठी बाहेर गेल्या होत्या. घरात गीता ताई व नीरजा या दोघीच होत्या.
"गीता ताई, शालिनी ताई माझ्यासाठी एवढं का करत आहेत?" नीरजाने तिला पडलेला प्रश्न विचारला.
"शालिनी ताईंना समाजसेवेची आवड आहे. गरजू लोकांना त्या मदत करत असतातच. तुझ्या डोळयात त्यांना शिक्षणाची तळमळ दिसली, म्हणून त्या तुला मदत करत असतील." गीता ताईने उत्तर दिले.
"शालिनी ताईंच्या घरी कोणी असत का? की त्या एकट्याच असतात?" नीरजाला एकेक प्रश्न पडत होता.
"ते मलाही सांगता येणार नाही, कारण त्या विषयावर आमची कधीच चर्चा झाली नाही. शालिनी ताई आश्रमात येतात, तेव्हा आश्रमा बद्दलच आमच्यात बोलणं होतं. नीरजा, तुला एक सांगू का?
ही सगळी मोठी माणसं आणि पैशावाले असतात ना, ते कधीच पर्सनल विषयांवर चर्चा करत नाहीत. मग आपणही कामाशी काम ठेवायचं. तुला त्यांच्याकडून जो फायदा होत असेल, तो करून घ्यायचा. त्यांच्याशी तेवढ्यापुरत बोलायचं. जास्त खोलात जाण्याची गरज आपल्याला नाही." गीता ताईने नीरजाला समजावून सांगितले.

"तुमचं म्हणणं मला समजतंय. मी शालिनी ताईंना कधीच असे प्रश्न विचारणार नाही." नीरजा म्हणाली.
दुसऱ्या दिवशी शालिनी ताईंनी नीरजाला होस्टेलवर सोडले. गीता ताईला घेऊन त्या आश्रमात निघून गेल्या. जाताना नीरजाला चार समजुतीच्या गोष्टी सांगून गेल्या.
नीरजा भूतकाळात रमलेली असतानाच मोबाईलची रिंग वाजल्याने ती वर्तमानकाळात परत आली. मोबाईलच्या स्क्रीनवरील नाव बघून ती मनातल्या मनात म्हणाली,
'मला हिची गरज आहे, हे हिला कसं कळतं? बरोबर मी दुःखी असतानाच हिचा फोन येतो.'
'मला हिची गरज आहे, हे हिला कसं कळतं? बरोबर मी दुःखी असतानाच हिचा फोन येतो.'
एकदा रिंग कट होऊन दुसऱ्यांदा रिंग वाजल्यावर नीरजाने फोन उचलला,
"हॅलो, मिसेस नीरजा मॅडम. इतकी बिजी झाली आहेस की मैत्रिणीचा फोन उचलायला सुद्धा वेळ नाहीये. डॉ नीरवच्या आधी मी तुझ्या आयुष्यात आली आहे, हे लक्षात ठेव बरं." नीरजाच्या मैत्रिणीने नॉनस्टॉप बोलणं सुरू केलं.
नीरजा तिला थांबवत म्हणाली,
"केतू, बोलताना जरा श्वास घेशील का?"
"केतू, बोलताना जरा श्वास घेशील का?"
नीरजाचा भरलेला आवाज ऐकून केतकी काळजीने म्हणाली,
"हे काय नीरजा, तू रडते आहेस का? तुझा आवाज भरलेला का येतो आहे? काय झालंय, मला सांगणार नाहीस का?"
"हे काय नीरजा, तू रडते आहेस का? तुझा आवाज भरलेला का येतो आहे? काय झालंय, मला सांगणार नाहीस का?"
"काय सांगू आणि कसं सांगू, हेच कळत नाहीये? केतू, सगळं गणित बिघडलं ग." नीरजा शब्दांची जुळवाजुळव करत म्हणाली.
"नीरजा, हा फापटपसारा सांगत बसण्यापेक्षा नेमकं काय झालंय हे सांगशील का?" केतकीने वैतागून विचारले.
"आपण उद्या भेटून बोलूयात का? मला फोनवर तुला काहीच सांगता येणार नाही." नीरजा म्हणाली.
"हो चालेल. आपण उद्या भेटून बोलू, पण आज कितीही राग आला असेल, तुझं मन दुःखी असेल, तरी जेवण न करता झोपायचं नाहीये. तुला माझी शपथ आहे. आजवर आयुष्यात इतकी वादळं झेलली आहेस, हे वादळ त्यापुढे इतकही मोठं नसेल ना?
नीरजा, तुझं वाक्य तुझ्याच लक्षात आणून देते. संघर्ष हा त्याच्याच वाट्याला येतो, ज्याच्यात संघर्षाला तोंड देण्याची ताकद असते. शालिनी मॅडम तुझ्या आयुष्यात आल्या नसत्या, तर तू डॉक्टर होऊ शकली असती का?
तुझ्या काका-काकूंनी तुला अंतर दिले नसते, तर तू कल्पतरू आश्रमात आली नसती आणि पुढे काहीच घडलं नसतं.
आता तुझ्या बाबतीत नेमकं काय घडलं आहे, हे मला ठाऊक नाही. पण जे काही घडत असेल, त्याला काहीतरी कारण असेल.
आता तुझ्या बाबतीत नेमकं काय घडलं आहे, हे मला ठाऊक नाही. पण जे काही घडत असेल, त्याला काहीतरी कारण असेल.
डोकं शांत कर. डोळे पुस. जी काही परिस्थिती पुढ्यात उभी राहिली आहे, त्यावर काय सोल्युशन काढू शकते, याचा शांतपणे विचार कर. याही प्रॉब्लेमला सोल्युशन सापडेल." केतकीने तिला समजावून सांगितले.
केतकी सोबत बोलल्यावर नीरजाला आधी इतकं हतबल वाटत नव्हतं. थोडं फ्रेश वाटायला लागलं होतं. नीरजा मनातल्या मनात विचार करत होती की,
'केतकी म्हणते तसं माझ्या बरोबर आता जे घडत आहे, त्याला काहीतरी अर्थ असेल ना? डॉ नीरव जोशी सारख्या प्रसिद्ध व तज्ञ डॉक्टर सोबत लग्न होणं सोपं नाहीयेच.
'केतकी म्हणते तसं माझ्या बरोबर आता जे घडत आहे, त्याला काहीतरी अर्थ असेल ना? डॉ नीरव जोशी सारख्या प्रसिद्ध व तज्ञ डॉक्टर सोबत लग्न होणं सोपं नाहीयेच.
माझ्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांचा विचार केला, तर सगळ्या एकमेकांशी जोडल्या गेल्या आहेत. आताही जे घडत आहे, त्याचा उलगडा मला करावाच लागेल. रडून, त्रागा करून हातात काहीच मिळणार नाही. माझ्या बोलण्याने आई दुखावल्या गेल्या असतील, त्यांच्याशी जाऊन बोलावं लागेल.'
नीरजा तिच्या विचारांत दंग झालेली असताना सरस्वती दरवाजावर नॉक करून रूममध्ये आली व ती म्हणाली,
"नीरजा ताई, तुम्हाला बाईसाहेबांनी खाली जेवायला बोलावलं आहे. त्या तुमच्यासाठी थांबल्या आहेत."
"नीरजा ताई, तुम्हाला बाईसाहेबांनी खाली जेवायला बोलावलं आहे. त्या तुमच्यासाठी थांबल्या आहेत."
"मी पाच मिनिटात आलेच."नीरजाने सांगितल्यावर सरस्वती खाली निघून गेली.
नीरजा आपल्या जागेवरून उठली. तोंड धुवून फ्रेश झाली. रुममधून बाहेर पडल्यावर तिची नजर नीरवच्या रुमकडे गेली. नीरजाने आपली नजर तिकडून हटवली व ती खाली निघून गेली. शालिनी ताई डायनिंग एरियात नीरजाची वाट बघत बसल्या होत्या.
"सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला जेवण करायला थांबावं लागलं." नीरजा खुर्चीत बसता बसता म्हणाली.
"मला वाट बघण्याची सवय लागली आहे. नीरवला हॉस्पिटल मधून यायला नेहमीच उशीर होतो. मला एकटीला जेवायला आवडत नाही." शालिनी ताई म्हणाल्या.
नीरवचं नाव ऐकल्यावर नीरजाला पुढे काही बोलण्याची इच्छा झाली नाही. तिने जेवणावर लक्ष केंद्रीत केले. खरंतर आज तिला जेवण करण्याची इच्छा नव्हती, पण केतकीने शपथ घातल्याने ती निमूटपणे जेवण करत होती.
"नीरजा, तुझ्या जेवणाच्या आवडीनिवडी सरस्वतीला सांगून ठेव, त्याप्रमाणे ती स्वयंपाक बनवत जाईल." शालिनी ताई नीरजाला बोलत करण्यासाठी म्हणाल्या.
यावर नीरजा मिश्किल हसून म्हणाली,
"आई, एका अनाथ मुलीला कसल्या आल्या आवडीनिवडी. दोन वेळेस जेवायला पोटभर मिळणंच आमच्यासाठी सुख असतं. मला जेवायला सगळंच आवडतं. भाजी खाताना आवड म्हणून नाही, तर पोट भरण्यासाठी म्हणून मला खाण्याची सवय लागली आहे."

"हो, बरोबर. तरीही जर काही वेगळं खाण्याची इच्छा झाली, तर सरस्वतीला सांगत जा." शालिनी ताईंनी सांगितले.
शालिनी ताई बोलत असतानाच नीरव मुख्य दरवाजातून आत आला. त्याला बघून शालिनी ताई म्हणाल्या,
"नीरव, पटकन फ्रेश होऊन ये आणि जेवायला बस बरं."
"नीरव, पटकन फ्रेश होऊन ये आणि जेवायला बस बरं."
नीरव मोबाईलमध्ये बघता बघता डायनिंग एरिया जवळ आला. हातातील मोबाईल पँटच्या खिशात ठेवत नीरव म्हणाला,
"आई, आज जेवायला काय स्पेशल बनवलं आहे?"
"आई, आज जेवायला काय स्पेशल बनवलं आहे?"
"वरणभात, बटाट्याची भाजी आणि पोळी." शालिनी ताईंनी उत्तर दिले.
नीरव तोंड वाकडं करत म्हणाला,
"आई, दररोज तेच तेच खाऊन कंटाळा येतो ग. काहीतरी वेगळं चमचमीत बनवायला हवं."
"आई, दररोज तेच तेच खाऊन कंटाळा येतो ग. काहीतरी वेगळं चमचमीत बनवायला हवं."
सरस्वती तिथेच उभी होती, ती म्हणाली,
"दादा, तुमच्यासाठी नीरजा ताईंना चमचमीत बनवायला सांगत जा. बायको आलीय म्हटल्यावर माझ्या हातच्या जेवणाची चव आता तुम्हाला आवडणार नाही."
"दादा, तुमच्यासाठी नीरजा ताईंना चमचमीत बनवायला सांगत जा. बायको आलीय म्हटल्यावर माझ्या हातच्या जेवणाची चव आता तुम्हाला आवडणार नाही."
नीरजाचं नाव ऐकल्यावर नीरव म्हणाला,
"मी फ्रेश होऊन येतो, मग जेवायला बसतो." त्याने नीरजाकडे बघणे टाळले होते.
"मी फ्रेश होऊन येतो, मग जेवायला बसतो." त्याने नीरजाकडे बघणे टाळले होते.
"आई, मी उद्या पासून हॉस्पिटलला जाणे सुरू केले तर चालेल ना?" नीरजाने शालिनीकडे बघून विचारले.
"मला तरी काहीच अडचण नाहीये. एकदा नीरवला विचारुन घेऊयात." शालिनी ताई अस बोलल्यावर नीरजाने मान हलवून होकार दर्शवला.
नीरव जेवायला येईपर्यंत नीरजाचं जेवण झालं होतं. नीरवच्या चेहऱ्याकडे बघण्याची इच्छा नीरजाला नसल्याने ती आपल्या रूमच्या दिशेने जायला निघाली, तेव्हा शालिनी ताई म्हणाल्या,
"नीरजा, जरावेळ इथे बसून आपण गप्पा मारुयात ना."
"नीरजा, जरावेळ इथे बसून आपण गप्पा मारुयात ना."
"नको आई. माझी इथे थांबण्याची इच्छा होत नाहीये." हे बोलून नीरजा तिच्या रूममध्ये निघून गेली. शालिनी ताईंना तिच्या बोलण्याचा अर्थ उमगल्याने त्यांनी तिला अडवण्याचा विचार केला नाही.
क्रमशः
©®Dr Supriya Dighe