समर तुझे विस्मरण होणे नाही (भाग २)

ABout life

भाग १ वाचण्यासाठी इथे क्लिक करा https://irablogging.com/blog/samar-tujhe-visamran-hone-nahi-part-1 १





पहिल्या भागात आपण पाहिले समर गरिबीतून वर आला होता. संसाराला सुरुवात झाली होती. अचानक त्याच्या भूतकाळाने त्याच्या आयुष्यात ठक ठक  केली .



रोजच्याप्रमाणे कारखान्यात गेला. कारागिरांची कुजबुज चालू होती.त्यातून एक कामगार जवळ आला आणि बोलला "मालक मी तुम्हाला काल संध्याकाळी आवाज दिला तरी तुम्ही मला पाहून थांबले आणि  मला  ओळखसुद्धा  दाखवली नाही, मालक माझ्याकडून काही चूक झाली का? तुम्ही सरळ बोललात की तुम्ही मला ओळखत नाहीत ,असं का केलं? "आता समर संभ्रमात पडला कारण, काल संध्याकाळी घरातून बाहेर पडलाच नाही. समर बोलला नक्की तुम्ही मला  पाहिलं का?? तर कारागिरी बोलला "हो मालक तुम्हीच होता, दिवसभर तुम्ही नजरेसमोर असता. तुम्हाला कसं नाही ओळखणार मी ?"समरला काहीच कळत नव्हते, तरी तो सॉरी बोलला आणि वेळ निभावून नेहली.पूर्ण दिवसभर समर विचारात पडला की नक्की कामगाराने कोणाला पाहिलं?  दुसऱ्या दिवशी  कारखान्यात गेला,समरला कळतं न्हवते आज का नाराज आहे करगिर??समरने त्यातल्या एकाला बोलावले आणि नाराजीचं कारण विचारलं. त्याने  सांगितलं की "मालक तुम्ही मघाशी समोरून गेला, आम्ही सर्वांनी तुम्हाला आवाज दिला तुम्ही आमच्याकडे रागाने पाहिले आणि निघून गेला" हे  ऐकून समर आता फार आश्चर्यचकित झाला त्यांनी ठरवलं उद्या कारखान्यात लवकरच यायचं बघू तरी कामगार खरं बोलतात की खोटं. काय ते उद्या कळेल. समर लवकर कारखान्यात आला. कामगारांबरो चहा पीत बसला होता तोच थोड्यावेळाने हुबेहूब समर सारखी  दिसणारी व्यक्ती त्याच्या कारखान्यात समोरून गेली .आता मात्र समोर आ वासून पाहू लागला. ती व्यक्ती अगदी समरसारखी हुबेहूब दिसत होती. जराही फरक नव्हता .त्याने डोक्याला हात लावला. कामगार सुद्धा अवाक झाले सेम टू सेम तरी त्यातील एक कामगार बोलला मालक तुमचा जुळा भाऊ आहे का हा? समर निशब्द झाला, तो पळतच घरी गेला .आईला सांगितले आईसुद्धा अचंबित झाली. समरणे शोध लावण्याचा निर्णय घेतला.नक्की कोण आहे तो?? ह्याची उत्सुकता समरला लागली होती ..  समर कारखान्यात बसून त्याची वाट पाहत होता तो आला आणि समरने  त्याला थांबवले ती व्यक्ती समरला बघून एकटक समरला पाहू लागली.. समरने  त्याचे नाव गाव विचारले त्याचे गाव आणि समरचे एकच गाव होते.नंतर त्याने   खिशातला त्याच्या  आई-वडिलांचा फोटो दाखवला. समर ढासळला कारण तो फोटोतला व्यक्ती समरचा  वडीलच  होता,जो समरला  आयुष्यभरासाठी दुःखी आठवण देऊन गेला होता..समरला विश्वास नव्हता बसत, तो सावत्र भावाच्या समोर उभा आहे . जो  अगदी समर सारखाच दिसतो जराही फरक नाही. समर एकही शब्द बोलला नाही आणि निघून गेला. खूप मोठा धक्का होता त्याच्यासाठी. त्याने आईला बायकोला सांगितले दोघींना विश्वास नव्हता बसत .नशिबाची किमया वेगळीच. अद्भुत असते .समर मानसिक तणावाखाली गेला होता. त्याला आधीचे सर्व दिवस आठवले.आजवर काढलेल्या खस्ता आठवल्या ,इथपर्यंतचा प्रवास फारच खडतर होता..वडील सोडून गेल्यावर आईची झालेली तडफड आजही त्याचे मन व्याकुळ करत होती.खूप काही धारदार अनुभव दिले होते वडिलांच्या असून नसण्याने  खूप काही भोगले होते.. त्या दिवसाच्या आठवणी खिन्न करून गेले..



एक दिवस त्याच्या बायकोने आनंदाची बातमी दिले की त्याच्या घरी आता पुन्हा एक पाहुणा येणार आहे.  या गोड बातमीने त्याचा त्रास देणारा भूतकाळ अलगद बाजूला झाला..आयुष्यात पुन्हा वडील होण्याच्या सुखासाठी आतुर झाला होता. समर वाट पाहत होता . बायकोचे सर्वच लाड पुरवत होता. तिच्या सर्व इच्छा पूर्ण करत होता.. तिला काय खायला प्यायला आवडते सर्व पाहत होता.. समरची आई सुद्धा खूप काळजी घ्यायची सुनेची . तिलाही खूप आनंद झाला होता आजी होणार होती .. पण एक अकल्पित वळण समरच्या  परिवारासाठी वाट पाहत होते. काय होते ते वळण पाहू पुढच्या भागात.



क्रमश....





भाग 3 वाचण्यासाठी ईथे क्लिक करा????



https://irablogging.com/blog/samar-tujhe-visamran-hone-nahi-last-part-3 ३



अश्विनी पाखरे ओगले

❤️मनातलं मनापासून❤️

लेख आवडल्यास लाईक, कंमेंट आणि नावासहित  शेअर करण्यास हरकत नाही.....


🎭 Series Post

View all