समांतर रेषा (टीम अमृतवेल)

Love that never ends

समांतर रेषा-(टीम अमृतवेल)

https://www.youtube.com/watch?v=vzlXfZlH5dk&ab_channel=Venus (लिंक क्लिक करा..ऐका.. पहाआणि मग वाचा)

नेत्रा सकाळी कॉलेजला निघाली खरी..पण त्याच्या आठवणीने तिला बेचैनी आली होती..त्याच्या बरोबर घालवलेला काळ तिला आठवत होता..तिच्या मागेपुढे करून तिला खुश करण्यासाठीची त्याची धडपड..तिच्या चेहऱ्यावर हसू बघण्यासाठी त्याने केलेले सर्व प्रयत्न..तिला एखाद्या परी सारखा तो वागवायचा..हे आठवून..नेत्रा बिथरली..खोटे होते ते सगळे..कसे काय?का?तिला तर ते सगळे खरेच वाटले होते.

नेत्रा आणि सायली दोघी सकाळी सायकल वरून कॉलेजला निघाल्या..वाटेत त्यांना ओम आणि तुषार भेटला.. आज रिझल्टचा दिवस होता.हे चौघेजण इयत्ता आठवी पासून एकत्र होते.आता फायनल इयर पर्यंत एकाच वर्गात होते.चौघे हुशार,अभ्यास आणि अभ्यास  या व्यतिरिक्त काही चौघांना माहित नव्हते.चौघांची एकमेकांना तगडी कॉम्पिटिशन असायची.आठवी पासून ते आतापर्यन्त नेत्राने तिचा पहिला नंबर कधीच सोडला नाही.ओम आणि तुषार कधी दुसरा तर कधी तिसरा असे वरखाली होत असायचे पण नेत्राला मागे टाकणे हे कोणाला जमलेच नाही.सायली पण अभ्यासात हुशार पहिल्या तीन मध्ये आलटून  पालटून  हे चौघे असायचेच.

त्यांची मैत्री तर अख्या कॉलेजला माहित होती.चौघेही सारखेच होते.अभ्यासू किडे..आधी कॉलेज,मग लायब्ररी,मग क्लासला हे चौकट कायम एकत्र जायचे आणि यायचे.जरी कॉम्पिटिशन असली तरी चौघात निखळ मैत्री होती हेवेदावे नव्हते.ओम, सायलीआणि तुषारला नेत्राचा अभिमान होता.तिने कधीच तिचा पहिला नंबर सोडला नाही म्हणून..

ओम-"पहिला नंबर तर सोडूनच द्या..तो नेत्रानेआधीच बुक आहे..तुषारआता तू मी का सायली दुसरा येते ते बघू?"

तुषार-"हो ना...मलातर वाटतंय या वेळी मी तिसरा असेल..मला अलजेब्रा जरा कठीण गेला होता"

ओम-"तसा तर मला फिसिक्स कठीण गेला होता.

सायली-"आणि मला सगळे सोपेच गेले होते नाही का?”आणि सायली हसायला लागली.

नेत्रा मात्र आज फार अस्वथ होती..आज पर्यन्तचे तीचे रेकॉर्ड आज मोडेल कि काय असे का कुणास ठाऊक तिला वाटत होते..तिच्या एका चुकीमुळे आज कदाचित तिचं  तिनेच नुकसान करून घेतलं असे तिला वाटू लागले होते कारण फायनल इयरला आताचे पेपर जरी चांगले गेले असले तरी आधीच्या सेमिस्टरचा गोंधळ ती विसरली नव्हती.

सायली-"नेत्रा,काळजी करू नकोस..पहिला नंबर तुझाच असणार आहे..मला खात्री आहे..दुसर्याने केलेल्या वाईटाची शिक्षा देव तुला नक्कीच देणार नाही."

नेत्रा-"बघू आता..कळलेच..मी माझ्या परीने प्रयत्न नक्कीच केलाय..फक्त मला जर कोणी मागे टाकले तर आपल्या तिघांपैकी कोणीही टाकावे मला काहीही वाटणार नाही..त्या..त्या...तिच्या डोळ्यातून अश्रू आला..त्याने नको टाकायला.."

ओम-"तरी मी सांगत होतो नेत्रा तुला..त्याच्या नादाला लागू नकोस म्हणून...तू ऐकले नाहीस माझे"

सायली-"जाऊ दे ना ओम आता..नको हा विषय..तुला माहितेयना किती त्रास होतो तिला ते सगळे आठवले कि"

तुषार-“मला तर त्याला थोबडवून टाकावे असे वाटते...समोर आलाना कि चीड येते त्याची..निर्लज्ज कुठला"

नेत्रा काही बोलत नव्हती..पण खूप शांत झाली..डोळे काठोकाठ भरले होते..पण पाणी बाहेर येऊ देत नव्हती.. आपण फसवले गेलोय हि खंत तीच्या मनाला टोचत होती..आपल्या भावना दुखावल्याआहेत याची तिला पुन्हा जाणीव झाली.

सायली-"नेत्रा..तू रडू नकोस ग..मला सहन नाही होत तुझे हे रडणे..तू यातून लवकर बाहेर पडशील तेवढं चांगले आहे"

नेत्रा-"मी प्रयत्न करतेय ग..काय करू?खूप त्रास होतोय मला..विश्वासघात झाल्याचे आठवते ना तेव्हा..असे वाटतं.. कुठेतरी आपला चेहरा लपवावा..एवढा मजाक उडवला माझा..एवढा अपमान..एवढा मोठा गेम माझ्याशी खेळला त्याने..कसे ग..मी काय कोणाचं बिघडवले होते..वर्गात पहिली येते हा काय माझा गुन्हा झाला का?कधी मान वर करून कोणाकडे बघितले  नाही आणि मला हरवण्यासाठी माझ्या भावनांशी खेळला ग तो."

सायली-"हे बघ,नेत्रा आता कॉलेजला तो दिसेल..त्याला जरा सुद्धा कळले नाही पाहिजे कि त्याच्या असण्याने तुला काही फरक पडतोय..जस्ट इग्नोर कर त्याला..तू दुःखात आहेस हे त्याला कळले कि तो जिंकला..आपल्याला त्याला हरवायचंय.."

नेत्रा-"एक काम कर ना..मी घरी जाते..तू माझा रिझल्ट घरी घेऊन येशील..मी जाते..नको..मला त्याला फेस करायची ताकद नाहीये..मला भीती वाटते माझी..मी त्याला नाही हरवू शकत..कारण मी मनाने हरलेय..कितीही त्याचा राग येतो तरी..तरी पण माझ्या तो समोर आला कि माझे संतुलन बिघडते..माझी मी राहत नाही..आपोआप त्याच्याकडे माझे मन ओढू लागते..मी जातेच..मी घरी जाते."

ओम-"नेत्रा..काय चाललंय काय तुझे?मला ना आता तुझा राग येतोय?तुला कळत नाहीये का तो एक प्लॅन होता त्याचा..तुझ्या विरुद्ध रचलेला..तुला त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून..तुलाअभ्यासावरून डिस्ट्रक्ट करून तुझ्यापेक्षा जास्त मार्क्स मिळवायची पैज लावलेली त्यांने आणि ती जिंकली त्याने..त्याच्यासाठी विषय संपला तू अजूनही त्यात अडकलीय का?ते सर्व खोटे होते..सावर स्वतःला.."ओम पोट तिडकीने तिला समजावत होता 

नेत्राच्या डोळ्यातुन  दुःख पाण्यावाटे वाहत होते.

नेत्रा-"ओम..मला ते का सगळे खरं वाटत होते..त्याच्या डोळ्यात मला खरेपणा दिसत होता....तो नाटक करतोय असे वाटलेच नाही रे मला"

ओम-”ते सगळे त्याने तुझ्यापेक्षा जास्त मार्क मिळवायला केले होते..तुला भरकटवत होता तो.. त्या पक्या बरोबर पैज लावली होती त्याने”

बोल बोलता सगळे कॉलेजला पोहचले..

सगळे आपापल्या जागेवर बसले..

आता थोड्याच वेळात सर वर्गात येऊन रिझल्ट सांगतील..हे चौघे नेहमी प्रमाणे एकत्र बसले होते.

तुषार आणि ओम मनोमन प्रार्थना करत होते कि पहिला नंबर हा नेत्राचाच येऊ दे..बाकी काही नको..

तेवढ्यात वर्गात तो आला..तो आला तसा वर्गात एकदम शांतता पसरली..त्याची अवस्था काही चांगली नव्हती.. डोळे खोल गेलेले..त्याचा तो हॅंडसम लूक गायब झाला होता..केस वाढलेले,दाढी वाढलेली..कुढत होता आतल्या आत..त्याला पाहून नेत्राच्या हृदयाचा ठोका चुकला..

तो आला आणि बसला त्याच्या जागेवर..त्याच्याशी कोणी बोलेना..तो मान खाली घालून बसला पण..पण..खाली मान  करून अनावधानाने  त्याने नेत्राच्या ठरलेल्या जागी बघितले..नेमकी ती पण त्याच्यकडेच बघत होती...नजरानजर  होईल असे दोघांनाही वाटले नव्हते पण झालीच आणि दोघांनी झटकन लक्ष नाही असे दाखवले आणि मान  फिरवली..

नेत्राने मान फिरवली खरी पण डोळ्यांत जमा झालेले अश्रू तिची परवानगी न मागता टप टप खाली पडू लागले.. एक हुंदका जो तिला आला तो तिने भरला..सायली ने तिच्या खान्द्यावर हात ठेवला...तिला धीर दिला..नको ग रडूस..जस्ट इंगनोर हिम"

त्याला तिचे अश्रू दिसले नसतील पण तिचे दुःख त्याच्या मनापर्यंत तर नक्कीच पोहचत होते..

तो उठला..पुढे आला...सगळ्यांसमोर..त्याने नेत्राला आवाज दिला..

तो-"नेत्रा,सॉरी मी चुकलो..नेत्रा मला माफ कर.."त्याने दोन्ही हाताने कान पकडले होते आणि खाली गुढघे टेकून तिच्या समोर बसला होता"

नेत्राचा रडण्याचा वेग वाढला होता..ती त्याला बघत पण नव्हती..

तो-"या..याच वर्गात सर्वांसमोर मी तुला दुखावले होते ना..आज याच सर्वां समोर मी तुझी माफी मागतो..नेत्रा..मला माफ कर..मी पैज लावली होती..हे खरं आहे...पण आता सांगतो..मी खूप प्रेम करतो तुझ्यावर..तुला हर्ट केल्यावर आणि त्या क्षणापासून मी तडपडतोय..मला..मला या त्रासातून मुक्त कर..फक्त एकदा म्हण"मी तुला माफ केले"

ओम रागाने उठला आणि त्याने त्याची कॉलर पकडली"

ओम"जस्ट शट अप..अँड स्टॉप इट..तू आता अजून किती छळणार आहेस तिला..गाठ माझ्याशी आहे हे लक्षात ठेव..चल उठ निघ इथून..तू बोलूच नकोस तिच्याशी.."

तो-"ओम जस्ट स्टे अवे..हा माझा आणि नेत्राचा विषय आहे..तू यात पडू नकोस"

ओम-"नाही..तुझ्यात आणि तिच्यात आता कोणताच विषय असू शकत नाही..तिचे नाव पण घेऊ नकोस तुझ्या तोंडात..."

तो-"ओम..प्लिज मला समजून घे...आय लव हर...नेत्रा सांग ना त्याला आपण दोघे एकमेकांवर किती प्रेम करतो ते ..नेत्रा..प्लिज बोल..प्लिज नेत्रा मला माफ कर"

तुषार-"ए..तुझी नाटकं खूप झाली..प्रेमाचा अर्थ तरी कळतो का तुला?म्हणे प्रेम आहे?लाज नाही वाटत का रे?प्रेम आहे म्हणून सांगायला..याच वर्गात तू तिला मान खाली घालायला लावलीस ना..हे असे प्रेम असते होय रे ?"

सायली-"आता कोणाशी आणि किती ची पैज लावून आलाय भिकाऱ्या..५००० रुपयांसाठी तिच्या भांवनाशी खेळलास तू..माझा शाप आहे तुला..तुला तुझे..”

नेत्रा-"थांब सायली.....तो माझ्याशी वाईट वागला म्हणून त्याला शाप नको देउस.....माझी दुवा आहे त्याचे चांगलेच होऊ दे..कारण त्याने जरी मला फसवले असेल ना तरी मी खरं प्रेम केले होते ना.."

सायली-"तू गप ग......मी तुझ्या जागी असती ना तर मरेस्तोवर मारला असता नालायकाला.."

नेत्रा-"माझी इच्छा असनूही माझे मन मला हे करायला धजत नाही..मला त्याचा राग नाहीये..त्याला सांग..फक्त माझ्या समोर येऊ नकोस....जा इथून....जा....निघून जा....मला तोंड पण नको दाखवूस.."

तो-"नेत्रा यार..प्लिज समजून घे ना..मी पाया पडतो तुझ्या..माझा श्वास अडकलाय....मला मुक्त कर..मी मरत नाहिये म्हणून मी जगतोय....प्लिज मला माफ कर..मला एकदा संधी दे....मी तुला पुन्हा आयुष्यात कधी तक्रार करायला जागा देणार नाही"

नेत्रा-"प्लिज....खोट्या प्रेमाच्या आणाभाका घेऊन मला त्रास नको देऊस....माझ्यासाठी प्रेम हा विषय आता कायमचा संपलाय.थँक्स टू यु....आयुष्यभर पुरेल एवढे दुःख दिल्या बद्दल....मी देवाला प्रार्थना करेल..सगळी सुखं देवाने तुझ्या ओंजळीत टाकावी....आता हा विषय कायमचा संपला."

तेवढयात सर वर्गातआले.सर वर्गात रिझल्ट सांगू लागले..ओम,तुषार,सायलीआणि नेत्रा हातात हात घेऊन कान  देऊन ऐकत होते.

पहिला नंबर....पहिला नंबर आहे" नेत्राचा"

सगळ्या वर्गात कडकडून टाळ्या वाजल्या....नेत्राला ओम आणि तुषारने तर खांद्यावर आनंदाने उचलूनच घेतले

ओम-" यु डिड इट नेत्रा..आय एम प्राऊड ऑफ यु"

सायली-"काँग्रॅच्युलेशन्स"सायलीने तिला कडकडून एक मिठी मारली.

तुषार-"येस..येस...थँक गॉड.."

तिघे खुन्नसने त्याच्याकडे पाहत होते..

------------------------

आठ वर्षांनंतर

आज सायलीच्या मुलाचा पहिला वाढदिवस होता.चौघे वेलसेटल झालेले.चौघे छान नोकऱ्या करत होते..ओम,तुषार चे पण लग्न झाले होते..पण नेत्रा अजूनही अनमॅरिड होती..तिच्या मनात कुठेतरी अजूनही तोच होता..त्याने तिच्यावर खोटे खोटे का होईना पण केलेले प्रेम तिला जगायला खूप होते..

ज्याच्यावर जीवापाड प्रेम केले त्यानेच विश्वासघात केला त्यामुळे एवढा विश्वास आणि प्रेम परत कोणावर करायची आणि होण्याची शक्यता नव्हतीच.कुठेतरी एकटेपणा होता..एक पोकळी होती तिच्या आयुष्यात..ओम,तुषार,आणि सायलीला तिची काळजी वाटत राहायची.

ओम-"साला,तो कुठे असेल रे?काय करत असेल?आपल्या नेत्राच्या आयुष्याची वाट लावून गेला नाही का?नाहीतर आज नेत्रा पण लग्न करून सेट झाली असती..तिला पण आपल्या सारखे एकेक मुलं झाले असते..बिचारी किती दिवस अशी एकटी राहील"

तुषार-"तो..लंडनला आहे.....त्याच्या डॅडचा बिझनेस संभाळतोय"

सायली-"मग काय बघायलाच नको....चांगल्याच रासलीला चालू असतील त्याच्या."

ओम-"मला नाही वाटत?कदाचित तो हि नेत्राची वाट बघत असेल."

तुषार-"मला नाही वाटत?"

सायली-"नेत्रा म्हणाली तशी लंडन म्हणजे सुखात लोळत असणार..तिने त्याला दुवा दिली ना..मग सर्व सुखं असतील त्याच्या पायाशी?त्याला कशाला नेत्राची आठवण येईल."

ओम-"त्या दिवशी माफी मागताना..मला त्याच्या डोळ्यांत नेत्रासाठी प्रेम दिसत होते..तेव्हा ती वेळच अशी होती कि त्याने केलेल्या कृत्याची शिक्षा त्याला होयलाच पाहिजे होती..पण आपल्या सगळ्यांच्या नजरेतून हे चुकले कि या सगळ्यात नेत्राला पण शिक्षा होतच होती..तसे नसते तर आता पर्यन्त ती बाहेर पडली असती त्यातून"

तुषार-"होना.. मला नेहमी सांगायची..तो..खूप रोमँटिक आहे..तो माझी खूप काळजी घेतो..तो मला खूप हसवतो... त्याचे कौतुक करता करता थकायची नाही नेत्रा..तो हि नक्की काय करतोय हे त्यालाच कळले नसेल रे....काहीवेळा प्रेमाची घंटी उशिरा वाजते..तो प्रेमात आहे हेच त्याला तिला दुखावल्यावर कळले..तेव्हा खूप उशीर झाला होता.

सायली-"हे म्हणजे असे झाले....दोघे एकमेकांवर प्रेम करतायत पण एकत्र नाहीत..दोन समांतर रेषा एकमेकांना कधीच मिळत नाहीत तसे."

तेवढ्यात तिकडून नेत्रा आली..पार्टीला यायचे म्हणून छान साडी घालून आली होती..खूप सुंदरआणि नाजूक दिसत होती.

सायली-"हे ब्युटीफुल..मस्त दिसतेय तू तर आज.."

नेत्रा-" थँक यू..आज मी स्वतःलाच खुश केले..तुझ्या मुलाचा वाढिदवस आहे ना..सो लेट्स सेलेब्रेट"

ओम,तुषार,सायली आणि नेत्रा एकमेकांना भेटून खूप आनंदी होते..सेल्फिज घेत होते..हसत होते..

इतक्यात सायलीच्या नवऱ्याने सायलीला हाक मारली

सायली-”अरे रोहन,केक कट करूया का?"

रोहन-"हो तेच सांगतोय..मी ज्याची वाट बघत होतो तो आलाय..थांब तुझी ओळख करून देतो..हा बघ माझ्या बॉसचा मुलगा राज मल्होत्रा....लंडन वरून आलाय.

सायली ने राज ला बघितले आणि त्याला मिठी मारली..रोहन एकदम ऑकवर्ड.. हि अशी काय करते..माझ्या बॉसच्या मुलाला डायरेक्ट मिठी काय मारतेय?

सायली"राज..राज..तू लग्न केलेस काय?बोल ना राज? तू लग्न केलेस काय?अरे गधड्या बोल"

रोहन "सायली बिहेव्ह युअर सेल्फ..काय करतेय?तो माझ्या बॉसचा मुलगा आहे"

सायली"अरे तो माझा क्लासमेट आहे..राज..बोल न..तू लग्न केलेस काय?"

राज"काय सांगू सायली..मी करायचं ठरवले पण नाही करू शकलो..तुला तर माहीतच आहे..आय लव हर"

सायली-"मेरी जान....तेरी जान....देख उधर तेरी राह देख रही है....जा भेट तिला.."सायलीच्या डोळ्यात आनंदाश्रू होते.. तिने पटकन रोहनला मिठी मारली.."थँक्स रोहन,याला इथे आणल्या बद्दल..थँक्स....काय बोलू तुला मी..हाच तो नेत्राला फसवून प्रेम करणारा..

राज नेत्राच्या मागे उभा राहिला..कान पकडून..

राज"नेत्रा,विल यु मॅरी मी....प्लिज फर्गिव्ह मी....प्लिज आता नाही जगू शकत यार तुझ्या शिवाय."

नेत्राने मागे बघितले....राज ढोपरावर बसला होता..पुन्हा सगळ्यांसमोर तमाशा करत होता..

ओम-"नेत्रा आता नाही म्हणू नकोस..त्याची शिक्षा त्याने भोगलीय...प्लिज नाही नको म्हणू.

नेत्रा रडत रडत हॉलच्या बाहेर जायला निघाली..राज पण तिच्या मागे जात होता.

तुषार भरल्या डोळ्यांनी"हे राज,आज मार खल्लास तरी सोडू नको तिला...विष यु हैप्पी मॅरीड लाईफ..लग्नाला नाही बोलावलेस तरी चालेल....पण लग्न करून ये"

राज ते लोक काय म्हणताय ते ऐकत होता पण पाऊले तिच्या मागे मागे चालली होती.ती अजूनही त्याच्यासाठी थांबलीय हाच तिचा होकार होता..शेवटी त्याने तिचा हात पकडलाच..

राज-"थांब ना....कुठे पळतेस"आणि तिच्या डोळ्यातले अश्रू पुसत होता.

नेत्रा-"तू नालायक आहेस..तू..का आलायस.. तू जा.."

राज-"मी तुला घ्यायला आलोय....त्याने त्याच्या गळ्यातली चेन काढली आणि तिच्या गळ्यात टाकली..आणि तिला घट्ट मिठीत घेतले आणि तिच्या कपाळावर किस केले..आय लव्ह यु..बास नाआता..किती शिक्षा देणार आहेस.सॉरी ना"

नेत्रा-"तू का असे केलेस?मला स्वप्न दाखवलीस आणि तीच स्वप्न तूच मोडून टाकलीस.."

राज-" सॉरी ना यार....एकदा माफ कर...त्या पक्याच्या नादाला लागलो आणि केलं हे सगळे....मी तुझ्याकडे चोरून बघतो हे त्याने पहिले होते आणि तिथून चिडवाचिडवी सुरु झाली....मस्ती मस्तीत पैज लावली..मी पैज जिंकायची म्हणून नाटक करत होतो पण नंतर मला कळले.....तुझ्या बरोबर असताना मी सर्वात जास्त खुश होतो...पैज जिंकली आणि मी तुला सगळ्यांसमोर हर्ट केले....तोपर्यंत मी तुझ्या प्रेमात आहे हे मलाच माहित नव्हते..पुढे एक आठवडा तू कॉलेजला आली नाहीस....आणि तू दिसत नव्हतीस तर मी वेडापिसा होऊ लागलो...आपण दोघांनी एकत्र घालवलेले सुंदर क्षण आणि तुझा हसरा निरागस चेहरा माझ्या डोळ्यासमोरून जाईच ना...तेव्हा मला कळले कि मी..तुझ्याच प्रेमात आहे....पण तोपर्यंत तू खूप लांब गेली होतीस."

नेत्रा-"माझा प्रेमावरचा विश्वासच उडून गेला होता रे....तू मला कधी खोटा वाटलासच नाही आणि तुझ्या तोंडाने सर्वांसमोर तू मला सांगितलेस कि तू हे सगळं नाटक करत होतास..मी तुटून गेले होते रे..."नेत्रा रडत त्याच्या दंडावर मारू लागली

राज-" सॉरी....खरंच दिलसे सॉरी.."

नेत्रा-“आता तुला सातजन्म शिक्षा भोगावी लागेल....मी सांगेल तसे वागावे लागेल.”

राज-"तू बरोबर असलीस तर सात काय सातशे जन्म शिक्षा भोगायला तयार आहे" राज तिला घेऊन गेला त्याच्या स्वप्नांच्या नगरीत..

https://www.youtube.com/watch?v=GUWIYZ23r00&ab_channel=LyricsTube

ओम,तुषारआणि सायली या दोघांसाठी खूप खुश होते.तिघांनी एकमेकांना मिठी मारली.

सायली-"ओम...समांतर रेषा एकत्र येऊ शकतात जर त्यांनी त्यांचा अँगल चेंज केला..तर"

तिघे आनंदाश्रूंत होऊन एकमेकांना टाळी देऊन हसू लागले.

समाप्त!!!!

©शीतल महेश माने.

कथा आवडल्यास लाईक आणि कंमेंट करून सांगा.

हि कथा काल्पनिक आहे.