समांतर

Samantar is a story of love the love which is never going to be complete, love which does not exept anything.

समांतर

समोर होतास तु, 

पण माझा नव्हतास कधी.

हरवले होते मी तुझ्यात, 

पण तुझी नव्हतेच कधी. 

खुप बोलायच, खुप हसायच

आठवणी जमवायच्या, 

ना मी तुला थांबवायच, 

ना तू माझ्यात गुंतायच, 

करार आपल्यत एवढाच होता. 

इतक सगळ clear होत, 

मग का मनात बंड होता, 

का तुझ्यासाठी ची अगतिकता वाढत होती, 

आणि तुला मात्र त्याचा गंधही नव्हता. 

असे कितीतरी "का" मनात ठेवून

तुझ्या सोबत, हसते आहे, 

आतल्या आत मी जळते आहे, 

मी तुझ्यासाठी, तुझ्या सोबत, 

तुझ्या समांतर चालते आहे. 

             -गायत्री-