सगळीकडे अंधार ...अचानक कुठेतरी गोळ्यांचं आवाज ,बंदुकीतून फायरिंग सुरु असते .एक शत्रू मारला कि लगेच दुसरा येतो ,दुसरं मारला कि ,तिसरा येतो हे असच अखंड चालू असते .सगळीकडचा कानोसा घेत हळू हळू पुढे जातेय आणि अचानक ...............shhhhhhhhhhhhh....अचानक एक आवज होतो एक बॉम्ब पडतो आणि सगळं उध्वस्त ... माझ्या डोळ्यांसमोर हे सगळं घडत आणि मी काही करू शकत नाही .मला मात्र स्वतःची पर्वा न करता ,न थांबता अविरत शेवटच्या श्वासपपर्यंत चालायचं असतं. अगदी सावध पणे , सांभाळून ,कितीही शत्रूचा खात्मा केला तरी नव्याने रोजच शत्रू पुढे येतात आणि मला मात्र सगळ्यांच्या रक्षणासाठी ,आरोग्यासाठी अविरत पणे हे असच सुरु ठेवावं लागत ..अरे हे काय ? आता फक्त २ मिन. चा विसावा घेत होते पाणी पिण्यासाठी तर हे काय ?कोण आहे तिकडे ? shhhhhhh ........ आह .. .मला कितीही लागलं तरी मी मागे हटणार नाही ....आणि अजून एक फायरिंग .....तेव्हड्यात कशातरी आवाज होतो आणि....आणि डोळे उघडतात .." हम्म ... स्वप्न होत तर! ...????♀️.आता कुठे डोळा लागला होता ५ मिन. साठी तर लगेच आवाज ..जरा म्हणून हळू काम करता येत नाही ह्या पोरांना ... चला चहाचा कप वाट बघतोय .तसेच केस वर बांधले आणि चालू लागले किचनच्या मार्गावर ..अरे हे काय ? हे तर सगळं आपल्या स्वप्नात होते तसेच घडत आहे .हि सिंक मधली भांडी पण शत्रू आहे शत्रू ..संपतच नाही कितीही घासली (म्हणजे फायरिंग बरं का !)तरी नव्याने समोर , बाप रे !आणि हे काय ?हा डबा कधी पडला .एखादा बॉम्ब पडावा आणि सगळं उध्वस्त व्हावं तसं हा डबा पडला आणि सोबत किचेनभर कांदा ,बटाटा पण पसरवून गेला..हम्म्म्म... देवा रे देवा! ..काय हे ?जरा म्हणून उसंत नाही ..असं विचार करत पाण्याचा ग्लास भरला आणि तो पिणार तेवढ्यातच छोट्या च्या रडण्याचा आवज ...अरे काय रे ?काय झालं वेदु (छोटया उर्फ वेदांत म्हणजे वेदु ).?".आई दादा ला सांग ,तो मला मारतोय ..आताच पाठीत एक धपाटा घातलाय ..." -वेदांत . "ईशान काय चालाय हे ?तो लहान आहे ना ,कळत नाही का तुला? का मारलस त्याला ?"-मी.  रोजचीच भांडणंभांडी ,तेवढ्यातच "अग ऐक ना !..pls जरा चहा देतेस का? खूप डोकं चढलाय मीटिंग वर मिटींग्स आहेत आज .."-आमचे अहो ..????♀️ 'वळला आमचा मोर्चा लगेच kitchen कडे ..left right .. left ..दाये मूड..!" मैत्रीणीनो ,थोडस तुम्हाला हसवावं म्हणून हा लेख , आज ह्या corona मुळे बरीच कामे वाढवीत आणि त्याचा सगळा ताण गृहिणीवर आला आहे ..जस देशात एखादी आपत्ती अली कि आर्मीचा विचार केला जातो ,तस घरावर काही संकट आलं ,कितीही बोझा आला कि, लगेच गृहिणी सज्ज होते ,सगळं सांभाळायला ... बघा म्हणजे शाळा बंद म्हणून मुलं घरी ,बर मुलं घरी म्हणजे स्वयंपाकघर हे चालूच ..अहोंचे ऑफीसा चे काम घरून म्हणजे सगळीकडे शांतात किंवा त्यांना डिस्टर्ब होऊ नये म्हणून खबरदारी ..आणि शत्रूसारखी सिंक मध्ये भांडी ...घासली तरी संपत नाही ...हे सगळं असाच सगळ्यांच्या घरात .ज्या महिला जॉब करतात त्यांनापण हे सगळं करावं लागतंय कारण आपल्याला मदत करणारी मदतनीस (मी कामवाली बाई नाही म्हणणार कारण ती आपल्याला मदत करते ,) नाही मग व्याप अजून वाढतो ..एक जवान जसा देशाची रक्षा करतो सीमेवर लढण्यासाठी सजग असतो ,तसं आपण गृहिणी हि नेहमी घरातल्यांच्यासाठी सजग असतो . नेहमीच्या साफ सफाई मध्ये दुपटीने वाढ झाली आहे . बाहेरून आणलेल्या सामान ला कितीतरी वेळा स्वच्छ धुवून घ्यावा लागतंय ,तरीही भीत कायम !किती हि वेळेस सफाई केली तरी भीती वाटते म्हणून सारखाच हातात ग्लोव्हस,झाडू आणि सानिटीझर असतो . एक जवान बंदूक घेऊन लढाईसाठी तयार असतो ,तस आपण ह्या coronashi लढण्यासाठी सानिटीझर ,मास्क आणि ग्लोव्हस घेऊन लढतो आहे . काळजी घ्या मैत्रिणींनो स्वतःची , घरच्या आरोग्यासाठी लढता- लढता स्वतःकडे पण लक्ष असू द्या .हे अवघड आहे पण आपल्याला ह्या महामारीशी लढा द्यायचा आहे आणि त्यासाठी आपण आपली काळजी घेतलीच पाहिजे . आज कितीही कंटाळा आला ,तरीही आपण कंबर कसून सगळं करतोय आणि त्याचसाठी सगळ्या गृहिणींना ज्या घरात राहून ह्या संकटाला तोंड देत आहेत ,लढत आहेत ,त्या सगळ्यांना एक सलाम ! माझे लेख आवडल्यास नक्की like आणि share करा .मला फोल्लोव करायला विसरू नका .
 |
ReplyForward
|
|
|
|