सख्या तू पैलतिरी भाग पस्तीस ( अकल्पनीय कलाटणी)

एका मुलीची कथा
सख्या तू पैलतिरी भाग पस्तीस
मागील भागावरून पुढे…


त्यादिवशी लंचटाईममध्ये हर्षा काव्याला म्हणाली

"काव्या आज तू चल माझ्या घरी."

"का? विपूल आहे की तुझ्याशी बोलायला. मग मी कशाला हवी?"

त्यावर हर्षा म्हणाली

"काव्या विपूलला तुझ्याशी बोलायचं आहे. तो म्हणाला तिची इच्छा असेल तरच मी तिला दिसेन."

यावर बराच वेळ काव्य काहीच बोलली नाही ती विचार करू लागली की विपूलला भेटावं की नाही! त्यानंतर हर्षा तिला म्हणाली

"तू काळजी करू नको. विपुल मला म्हणाला काव्यावर जबरदस्ती करू नको तिला जर खरंच मला मनापासून भेटायचं असेल तरच मी तिला दिसेन तर चलशील काव्या"

काव्या म्हणाली "सांगते ग ऑफिस सुटता सुटता."

"नाही अगं आधी तू तुझ्या घरी सांगायला नको का? आज तू माझ्या घरी येणार आहे हे मी बाबांना फोन करून सांगते."

"ठीक आहे. सांग"

हर्षाने दिनकरला फोन लावला.

" बाबा आज माझी मैत्रीण काव्या आपल्याकडे राह्यला येते आहे."

"होका. येऊ दे. आत्ताच सांगीतलं बरं झालं सुमनताईंना सांगतो आज काव्या जेवायला आहे." दिनकर

" हो. सांगा. ठेवते फोन." हर्षा आज काव्या घरी येणार म्हणून आनंदात होती.

***

संध्याकाळी हर्षा बरोबर काव्या तिच्या घरी आली.

" बाबा ही माझी मैत्रीण काव्या. " हर्षा

" वेलकम.अगदी घरच्या सारखी रहा." दिनकर

" हो.काका." काव्या हसत म्हणाली.

" तुम्हा दोघींना फ्रेश व्हायचं असेल नं" दिनकर

" हो बाबा फ्रेश होऊन येतो" हर्षा

दोघी हर्षाच्या खोलीत फ्रेश व्हायला गेल्या.

***

जेवणानंतर दोघी हर्षाच्या खोलीत आल्या. दोघी गप्पांच्या छान मूड मध्ये होत्या. तेव्हाच हर्षाच्या कानावर विपूल चा आवाज आला.

" हर्षा काव्या बोलेल का माझ्याशी?" विपूल

हर्षा विपूलच्या आवाजाने भानावर आली.

"काय झालं हर्षा?" काव्याच्या प्रश्नावर हर्षा म्हणाली

"काव्या तुला विपेलशी बोलायला आवडेल?" हर्षा

" विपूल शी…!" काव्या

"हो. विपूल म्हणाला आत्ता मला. तू बोलशील का त्याच्याशी?"

" विपूल ने तुला विचारलं?" काव्या

" हो."

" मग मला कसं ऐकू आलं नाही?"

"तू मनापासून विपूलला भेटायला तयार असशील तर विपूल तुला दिसेल. तुला त्याचा आवाजही ऐकायला मिळेल."

काव्या बराच वेळ काहीच बोलली नाही.
"हर्षा काव्याची इच्छा दिसत नाही. तिला जबरदस्ती नको करूस." विपूल.

" काव्या तुझी इच्छा नसेल तर राहू दे." हर्षा

"अगं तसं नाही. मला विपूलशी बोलायला काही प्राॅब्लेम नाही पण मनात थोडी भीती वाटते आहे." काव्या

" हर्षा तिला सांग काही सेकंद डोळे मिटायला." विपूल

"काव्या काही सेकंद तू डोळे मीट. मी सांगेन तेव्हा उघड. म्हणजे तुला विपूल दिसेल." हर्षा

" ठीक आहे."

काव्या डोळे मिटते.काव्या मनातून घाबरलेली असते त्यामुळे ते काही सेकंद तिला कैक युगं लोटल्यासारखं वाटलं. तेवढ्यात हर्षा काव्याला म्हणाली

" काव्या उघड डोळे"हर्षा

काव्याने डोळे उघडले आणि ती दचकली.समोर विपूल उभा होता.बराच वेळ काव्या जीभ टाळूला चिकटल्यासारखी बसली होती. डोळे फाडफाडून विपूल कडे बघत होती. शेवटी हर्षा ने तिला हरवलं.

" काव्या."

" हर्षा विपूल कडे आत्ता बघीतलं तर तो जीवंत नाही यावर विश्वास बसत नाही."

"हो काव्या मला शरीर नाही. तुम्ही घाबरू नये म्हणून हे शरीर आहे म्हणजे तुम्हाला तसा भास होतो आहे. शरीराशिवाय तुम्ही दोघी मला बघूच शकणार नाही." विपूल

"विपूल हर्षा खूप गुंतली आहे तुझ्यात." काव्या

"काव्या मी तुला तेच सांगतोय की हर्षाला समजव."


"मी हर्षालाकाय समजवू?"काव्या


"अगं हर्षा माझ्यात इतकी गुंतल्यामुळे मी मेल्यावर मला पुढचा प्रवास करणं शक्य होत नाही. या अधांतरी अवस्थेत मला खूप त्रास होतोय. माझ्यातून पूर्ण पुणे ती लक्ष काढून घेईल तेव्हा मला मुक्ती मिळेल. तू समजव तिला. दुसरं लग्नं करायला हवं तिने" विपूल

\"विपूल मी तुझ्याशिवाय दुस-या पुरूषाबरोबर लग्नं करू शकणार नाही." हर्षा

"काव्या बघ. हर्षाचं वय आत्ता फक्त अठ्ठावीस आहे. ही काय जन्मभर माझी विधवा म्हणून राहील का? काव्या समजव हिला." विपूल

ब-याच वेळाने काव्या म्हणते.

"हर्षा तुझं खूप प्रेम आहे नं विपूल वर?" काव्या

"काव्या हे काय विचारतेस वेड्यासारख?" हर्षा

"तुझं इतकं प्रेम आहे विपूल वर तर त्याला इतकं बांधून का ठेवतेय?" काव्या

"मी नाही दुस-या व्यक्तीबरोबर रमू शकणार!" हर्षा

"विपूलला अश्या अधांतरी अवस्थेत काय त्रास होत असेल हे तुला कसं कळणा?" काव्या

"अगं त्याला शरीर नाही तर कसला त्रास होईल त्याला?" हर्षा

"हर्षा मला शरीर नाही पण माझा आत्मा अडकलाय. त्याला त्रास होतो आहे. आमच्या जगात होणारा त्रास वेगळा असतो तो तुला नाही कळायचा." विपूल

"हर्षा विपूलची बाजू समजून घे. तू दुसरं लग्न केलस तर विपूलला आनंद होईल. त्याच्याशिवाय तू एकटी राहीलीस तर त्यालाच त्रास होईल शिवाय या अधांतरी अवस्थेत किती वर्ष तो अडकलेला राहील. हे बरोबर नाही हर्षा. हट्टीपणा करू नको." काव्या

बराच वेळ हर्षा काहीच बोलली नाही. काव्या तिच्याजवळ जाऊन बसली आणि तिचा हात हातात घेऊन म्हणाली

"हर्षा तू दुसरं लग्नं करावस हे एखाद्या वर्षांनी तुझे आईवडील आणि विपूलचे वडील पण म्हणतील. हे त्यांचं म्हणणं योग्य असेल.आत्ता तुला वाटतंय की मी जन्मभर एकटी राहीन पण हे शक्य नाही. तुला तुझं घरटं तयार करावं लागेल. तुला सध्या लग्न करायचं नसेल तर ठीक आहे. लग्नासाठी तुझी मानसिकता तयार होईल तेव्हा लग्नं कर.पण आत्ता विपूलचे विचार हळुहळू तुझ्या मनातून काढून टाकायला लाग. विपूलला त्याच्या या अवस्थेतून लवकर मोकळं करणं खूप गरजेचं आहे." काव्या

"हर्षा काव्या खरं बोलतेय.तू तुझ्या मनातून मला काढून टाकलं म्हणजे तू माझ्याशी प्रतारणा केल्यासारखं होत नाही.ऊलट मला या अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी मदतच होईल." विपूल

"विपूल मला तुमच्या दोघांचं म्हणणं पटतंय पण मन तयार होत नाही. तू असा जरी मला दिसलास तरी चालेल." हर्षा

"हे कसं शक्य आहे हर्षा. असं किती काळ मी या अवस्थेत राहू? मी तुला सारखा दिसत राहिलो तर तू तुझ्या भविष्याचा विचार करणार नाहीस. हे मला आवडणार नाही. मी जोपर्यंत जीवंत होतो तोपर्यंत तू मला जे आवडेल तेच करायचीस नं? आताही तेच कर. मला जे आवडतं ते कर. माझा विचार करणं बंद करून मला या अवस्थेतून सोडव आणि नवीन संसार थाट." विपूल


"हर्षा ऐकलस नं विपूल काय म्हणाला ते." काव्या

"हो.पण मला ते कितपत जमेल माहिती नाही." हर्षा

"तुला जमवावं लागेल. सुरवातीला तुला थोडा त्रास जाईल नंतर सवय होईल." काव्या

"म्हणजे नेमकं काय करू मी?" हर्षा

"आता उद्यापासून विपूलला हाक मारायची नाही. त्याची आठवण आली तर वेगळं काहीतरी कर.तू तुझं मन डायव्हर्ट करायला शीक. तरच तुझ्या मनातून हळूहळू विपूल ची आठवण कमी होईल." काव्या

"काव्या तू आज आलीस म्हणून तू हर्षाला नीट समजावुन सांगू शकलीस." विपूल

"विपूल काळजी करू नकोस. हर्षा तुझ्या अचानक जाण्यामुळे भांबावली होती.आता ती ऐकेल तुझं." काव्या

"हर्षा फक्त तुझच ऐकेल यांची मला खात्री होती.म्हणूनच मला तुझ्याशी बोलायचं होतं." विपूल

काव्याने अलगद हर्षाला मिठी मारली. विपूल दिसेनासा झाला.

_____________________________
क्रमशः सख्या तू पैलतिरी
लेखिका…मीनाक्षी वैद्य.


🎭 Series Post

View all