सख्या रे..!! भाग 2

Love Story
नीरजा कॉलेज मधली एकमेव अशी मुलगी होती जिला सर्व प्रोफेसर आणि विद्यार्थी घाबरून असत. कुठलंही काम सरळ करणारच नाही, एकदा तर कॉलेज मध्ये आर्टस् च्या विद्यार्थ्यांची परीक्षा चालू असताना हिने मधेच घंटा वाजवली, सर्व विद्यार्थी आणि स्टाफ मध्ये गोंधळ उडाला...दर 20 मिनिटांनी बेल वाजत असे...आधीची बेल वाजून 5 मिनिटही झाली नसतील तशी दुसरी बेल वाजली..मुलं घड्याळाकडे पाहू लागले... supervisor कडे पाहू लागले...supervisor शिपाई ला शोधू लागले... अन शिपाई.... तो चिडून नीरजा च्या मागे धावत सुटलेला...

सगळा गोंधळ घालून ठेवायला नीरजा ला जाम आवडे...दुसऱ्याच्या खोड्या काढणं तिच्या रक्तातच होतं.
नीरजा चा हाच स्वभाव मुक्ता ला आवडत असे. दोघींमध्ये फक्त एकच साम्य होतं.. खेळाबद्दल आवड. दोघीही sportswoman... कॉलेजला असताना या दोघी विज्ञान शाखेच्या...बाकी सगळ्या मुली आर्टस् अन कॉमर्स च्या...टीम मधील सुद्धा या दोघींची खास तारांबळ उडायची. कॉलेजला लागूनच एक जिमखाना होता, त्याच्या समोर एक मोठं ग्राउंड, आणि बाजूला बोट क्लब होता. ही जागा म्हणजे प्रेमी युगुलांचा अड्डाच जणू. कॉलेजचा जिमखाना म्हणजे फक्त आर्टस् आणि कॉमर्स च्या मुलांनी भरलेला असायचा, दुपारी 12 नंतर आर्टस् आणि कॉमर्स चं कॉलेज सुटायचं तेव्हा बोट क्लब वर तुफान गर्दी असायची. आणि नेमकं त्या वेळेत नीरजा अन मुक्ता चं विज्ञान शाखेचे तास भरायचे.

नीरजा असही कॉलेज बंक करत असे...अभ्यासात तिला रस नव्हता. पण मुक्ता ची मात्र विशेष धावपळ व्हायची. मुक्ता अभ्यासात प्रचंड हुशार, मुक्ता बारावीला अन नीरजा अकरावीला होती. बारावीचं वर्ष म्हणून मुक्ता चा क्लास असायचा सकाळी, तिथून निघालं की जिमखाना, जिमखाना झाला की कॉलेज...अभ्यासही मागे सोडायचा नव्हता तिला. घरून खेळायला विरोध, पण ही प्रचंड जिद्दी...मी अभ्यासही करेन आणि मॅचेस सुद्धा खेळेन. पहाटे 4 ला ती अभ्यासाला उठत असे, आणि नंतर मॅच. जीवकडे बघतच नव्हती.

कॉलेजच्या जिमखान्या बद्दल सायन्स च्या विद्यार्थ्यांना प्रचंड धाक. तिथे फक्त टुकार मुलं आणि प्रेमी युगुल असतात असा त्यांचा समज होता.बोट क्लब चं नाव जरी काढलं तरी त्यांना धडकी भरे. सायन्स चा एकही विद्यार्थी तिथे फिरकत नसे. दुपार झाली की दिवसभर कॉलेज करायचं अन घरी यायचं असा त्यांचा दिनक्रम.

"Boat club is my second home.."

असं नीरजा मुक्ता ला कायम सांगत असे...

एकदा सकाळी ग्राउंड वर प्रॅक्टिस आटोपून मुक्ता घरी जायला निघाली.... कॉलेज नव्हतं त्या दिवशी...नीरजा बोट क्लब कडे जायला निघाली...

"वेडी आहेस का, तिथे कशाला जातेस..."

"का? भूत असतं का तिथे?"

"चल...".

"कुठे?"

"बोट क्लब ला.."

नीरजा हात धरून तिला तिकडे ओढत होती..

"नाही...मी नाही येणार आणि मला फोर्स करू नकोस.."

"तुला यावच लागेल, माझ्याखातर..."

बराच वाद घालून अखेर नीरजा ने तिला पटवलं...

मुक्ता मान खाली घालून त्या दिशेने नीरजा सोबत चालत होती... ऐकलं होतं त्याप्रमाणे सगळा माहोल होता...मुलं मुलींना पाहून गाणं म्हणत होती, काही प्रेमी एकमेकांच्या हातात हात घालून उभी होती...

मुक्ता ला तिथे नको नको झालं...आपण यातले नाही आणि का पाहावं हे सगळं?
मुक्ता आपल्या तत्वांशी अतिशय प्रामाणिक...काही चुकीचं करायचं नाही, चुकीचं पाऊल उचलायचं नाही, केवळ आपलं ध्येय एके ध्येय...

मुक्ता चालत होती, नवीनच आलेल्या मुलीला पाहून काही घोळके गाणं म्हणायला लागली...नीरजा हसत होती, तिने तिला अखेर बोट क्लब वर नेलं..

एक धीरगंभीर नदी, त्या समोर काही बोटी लावलेल्या, बसायला चढ उताराच्या पायऱ्या...अगदी रोमँटिक वातावरण...मुक्ता ते पाहून हरखून गेली...बोट क्लब ला ती पहिल्यांदाच बघत होती...

नीरजा तिच्या डोळ्यात बघत होती..
मुक्ता म्हणाली,

"झालं तुझं समाधान?"

"तुला एक सांगू? तुला पाहिलं की मला अर्जुन ची आठवण येते.."

"कोण अर्जुन?"

"एक मित्र आहे माझा..."

"ए हे बघ, कुठल्याही नव्या भानगडीत मला अडकवू नकोस..."

"मी काय म्हणते, एकदा भेट त्याला..."

"इथे आली तेच चुकलं माझं...मला लायब्ररीत जायचं सगे अभ्यासाला...दुपारी प्रॅक्टिकल आहे माझं ..बाय.."

क्रमशः

🎭 Series Post

View all