सख्या परत ये

प्रियकराच्या विरहात घातलेली साद


असे आजही तोच सागरी किनारा,
आजही वाहे ओला सुगंध हा वारा
ओल्या मिठीत माझ्या अजुनी वसे
तुझ्या प्रेमाचा रेशमी निवारा

आठवुन तो क्षण सारा,
काहुर मनी वसे आता
होतास सख्या साथीला माझ्या
अनुराग वाहे चोहीकडे

का दुर केले तुजला नियतीने
मन वेडे माझे मलात विचारते
जिवलगा तुझ्याविना आयुष्य हे
सहवेना मजला आता हे


आजही साद घालते मी तुला
गाज ह्या अर्णवाची ऐकु तुला येऊदे
सख्या पैलतिरावरून परते ये आता
वाट मी तुझी सदा पाहते