सखू आणि रखमा चा ऑनलाईन क्लास

phonetic conversation of two women
 

 सखु आणि रखमा चा ऑनलाईन क्लास

  सखू:   " हा हॅलो बाप्पा रखमाबाई लय दिवसान फोन केला. आमची काई  आठोन येत नाही बा तुम्हा ले"   रखमा : तसं नाही सखुबाई, पन आता अनलॉक सुरू हाय अन कोरोना किती वाढू रायला म्हणून फोन केला तुम्हाले.सखू :हा हे गोष्ट त खरीच हाय रकमा बाई,जावा lockdown होत तंवा सारे गप्प गुमान घरात बसले होते अन आता नीरा पिशावणी ,कामधंदा नासल्यागत सारे बाजारात हिंडतात जणू जेलातून कैदी मोकाट सुटले.रखमा : नाई त काय, कोणी नियम पाळत नाई अन मास्क लावा त लावत नाही ही. एकमेकात अंतर ठेवा त ते बी नाही. बाजारात कोणी ओळखीचा दिसला का लावलेलं मास्क काढू -काढू ,जवळ -जवळ जाऊन बोलतात.सखू : हात धुणं त सारे एसरलेच. म्या त माह्या नवऱ्याले स्पाष्ट म्हणलं भाई रुं न आलं का आधी चप्पल, जोडे धुवा .हात-पाय धुवा कापड बदलवा आन मगच जेवा.रखमा:  म्या तर माह्या दादलया ले सावताच मास्क बांधून देतो आन एक जास्तीच त्याच्या खिशात ठेवतो. हे हे पाहून शेजारच्या पिंकी ना मले तिच्या "टाइमपास महिला मंडळाची" ग्रुप  ऍडमिन केली.सखू:  " अवं हे त काहीच नाहि माया नवरा सवता चे कपडे सवता धुते,अन मले घर काम करू लागते म्हणून शिंद्याच्या राणीनं मले "मॉडन महिला मंच" ची ग्रुप ऍडमिन केली.रखमा:  हेत काहीच नाही सखुबाई माया पोरानं- सोन्यानं मले घर झाडून दे ल त त्याच्या कॉलेज च्या मैत्रीण मले ,सोन्या ले ,माया घरी येऊन सवता च्या हातान च्या करून पाजला.सखू : काय  म्हणता?  लक्ष द्या द्या बाई तुमच्या पोराकडे ,काय बी होऊ शकते ,रखमा बाई चला आता ठेवतो, मले गावातल्या बाया ले नवऱ्याकडून घरचे काम, त्याचे सवताचे काम सावता करायले लावाचे, त्याचा  ऑनलाइन क्लास  घ्याचा हाय  आता गावातल्या साऱ्या बायका ऑनलाइन आल्या अस्तीन.रखमा:  बरं बरं म्या बी आता मीट  सुरू  करतो तालुक्याच्या बायका मले एचारतात का नवऱ्याकडून स्वयंपाक, झाडू ,सडा रांगोळी कशी काढून घ्यची? अन भांडीकुंडी घासायला कस शिकवाच?मी बी आता ऑनलाईन जातो .उद्या बोलू
ReplyForward 

🎭 Series Post

View all