सखी सहेली भाग -४

स्त्रियांच्या जीवनातील मैत्रीचे महत्वाचे स्थान.


सखी सहेली भाग -४
©® Sush.

जलद कथा मालिका.


आता नवीन शहर ,नवे घर,नवे नाते संबंध, नवा संसार,आणि असंख्य नव्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य.

मैत्रिणी संसारात पडल्या होत्या.घरचे करून बाहेरचं म्हणजे नोकरी पाण्याचेही करावे लागत होते.त्यातच कुटुंबही वाढत असते.नुसती सून,बायको,न राहता दोन तीन मुलांची आईही झालेली असते.

घर संसाराचा आनंद आणि अभिमान यातच आपोआप गुंतल्या जातात. मुलांच्या शाळा,त्यांची हौस मौज,हट्ट,शिक्षणे,यांचे चक्र सुरू होते.

परंतु एवढ्यातुनही संसाराध्ये ,नोकरीमध्ये,रोजच्या दगदगी मध्ये सुध्दा अधून मधून बालपण आणि तारुण्य आठवणींच्या कप्प्यात बंद करून ठेवलेले असते,कधीतरी तो आठवणींचा कप्पा उघडायचा आणि हरवून जायचं भूतकाळा मध्ये .....

.....कासव , सश्याची शर्यत आठवते ना ? संसारमधे सुखं दुखांची,अनुभव त्यातून मिळणाऱ्या शिकवणीची , मान अपमानाची,तडजोड,अपेक्षांची तशीच शर्यत चालू असते....!

फक्त थोडासा विश्रांतीचा आणि मन शांतीचा हवा असतो.मनाची घालमेल, कुचंबना व्यक्त करण्यासाठी .

वीस बावीस वर्षापूर्वी सोनालीच्या लग्नामध्ये सगळ्या मैत्रिणी एकत्र जमल्या होत्या.सगळ्यांना बघून सोनालीच्या आईचे डोळे भरून आले होते.

सोनालीची आई;- " किती छान,सुंदर दिसत आहे तुम्ही मैत्रिणी,किती एक जीवाने राहता ,एकमेकींना तयार होण्यासाठी मदत करताय, हसताय , बागडताय, खरंच खूप छान असतो आयुष्याचा हा टप्पा.अशाच एकमेकींना साथ द्या.विसरून जाऊ नका.लग्नानंतरही कॉन्टॅक्ट मध्ये रहा.मी पण जेव्हा तुमच्यासारखी होते ना,आमचाही एक मैत्रीचा ग्रुप होता.पण लग्नानंतर सगळ्या वेगळ्या झालो ते आजपर्यंत परत भेटलोच नाही."


खरंच सांगत होती सोनालीची आई.

पण त्यावेळी "इंटरनेट "तरी कुठे होते.

आणि जुन्या मैत्रिणी ह्या नेटवर्कच्या जमान्यात शोधणे शक्य होते.

आणि नेमके तसेच झाले......!!

जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा जुन्या मैत्रिणींना इंटर नेट वर शोधले जायचे.

असेच एकदा,रुपालीच्या मुलीचे लग्न होते.मुलाकडच्या पाहुण्यांमध्ये जयाला आधी पासून ओळखणारी नातेवाईक होती.तिला रुपालीच्या जुन्या मैत्रिणीची आठवण अन् माहिती होती.तिने सहजच रुपालीकडे सर्व मैत्रिणीचा विषय काढला.आणि रुपालीच्या संयमाचा बांध फुटलाच.


रुपालीने तिच्या कडून जयाचा व्हॉटसअप नंबर मिळवला.आणि संधी मिळताच ताबडतोप जयाला फोन लावला.

रुपालीच्या व्हॉटसअप वर डी.पी.बघूनच जयाला आश्चर्याचा गोड धक्का बसला......

......आणि तिथून पुढे सुरू झाली,त्यांची जुन्या मैत्रिणी शोधण्याची धावपळ.आणि प्रयत्नांची कसरत .

आणि म्हणतात ना," मंजिले मिलती गई.... कारवां बनता गया....!!

अगदी तसेच व्हॉटस अप ,फेसबुक,ने मदतीचा हात दिला आणि जयाला , पूनमचा नंबर मिळाला.

आणि वीस बावीस वर्षांचा ,मनात दबून राहिलेला भावनांचा,आनंदाचा,आंतरिक विचारांचा,धगधगत्या ज्वालामुखीचा स्फोट झालाच.....!!
©® Sush.

( वीस बावीस वर्षांनी भेटलेल्या मैत्रीत काही बदल झाला होता का.इतक्या वर्षांनी त्यांची प्रत्यक्ष भेट झाली की नाही.? पाहूया भाग -५ मध्ये.)

🎭 Series Post

View all