सखी सहेली भाग -१

स्त्रियांच्या जीवनातील मैत्रीचे महत्वाचे स्थान.

सखी सहेली भाग_१
©® Sush.

जलद कथा मालिका.

एवढी मोठी स्कूल ,एवढा मोठा क्लासरूम ,आणि सुट्ट्या संपून शाळा सुरू झाल्याचा एक वेगळाच उत्साह.
प्रायमरी शाळेतून पास होऊन मोठ्या शाळेत हाईस्कूल मध्ये प्रवेश घेतलेल्या मुली.
पहिला आठवडा तर नुसता एकमेकींच्या ओळखी करण्यात गेला.तसं पण हे वय ओळखी करून मैत्री करण्याचे नसते मुळातच.आणि ही शाळा फक्त मुलींची असल्याने नवीन बुजरेपणाची काही भीतीही नव्हती.

शेजारच्या,आणि मागच्या पुढच्या बेंचवर जे कोणी बसले असेल,त्यांच्याशी लगेच गप्पा टप्पा , हसीमजाक सुरूही झाला होता.

.थोड्याच दिवसात मैत्रिणींचे ग्रुप बनत गेले.या वयाच्या टप्पा भारीच छान असतो नाही का. कोण श्रीमंत,कोण गरीब,कोण कसे दिसते,कोण गोरे गोरे,का काळेसावळे,कोणाचा स्वभाव कसा,किंवा कसा नाही.या असल्या तकलादू प्रश्नांना मनात आणि विचारात किंवा या बाल जीवनात काहीच थाराच नसतो.

असतो तो फक्त आनंद...नव्या मैत्रीचा आनंद,उत्साह,नुसते खेळायचे , बागडायचे आणि " मज्जा नी लाईफ," नुसती....!

दरवर्षी वार्षिक परीक्षा झाली की,पुढच्या इयत्तेत सरकायचे.एवढ्या दिवसात मैत्रिणी कुठे राहतात,त्यांच्या घरचे सगळे कसे आहेत,आई कोणता पदार्थ छान बनवते,हे सगळे माहीत झालेले असते.

शाळेच्या दिवाळीची सुट्टी आणि उन्हाळ्याची सुट्टीत एकमेकींच्या घरी भेटायला आणि खेळायला जाणे सुरू झालेले असते.

म्हणतात ना,मुलींची दुनिया खरंच वेगळीच असते.मुलगी म्हणून जन्माला आल्यानंतर तिचे वेगळेपण जपण्याचे सगळ्यात आधी घरातूनच सुरू होते.

आणि नंतर फक्त मुलींसाठीच्या शाळांमधून त्यांना एक सुरक्षितता ,पण त्याच बरोबर छान संस्कारही मिळत जातात.

जसे की,उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सायंकाळच्या वेळी बागेतल्या हिरवळीवर बसल्यानंतर कसे छान वाटते.त्यातच मधेच एखादी थंड हवेची फ्रेश,आल्हाददायक झुळूक यावी आणि घामजलेल्या तना मनाला स्पर्शून निघूनही जावी,तसेच हे वय मुलींच्या आयुष्यात थंड हवेच्या शितल झुळकेसारखे येते आणि निघूनही जाते....!

मुलींच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा हा एकमेव काळ ,किती अल्प कालावधी साठी असतो .

आणि म्हणता म्हणता हा शाळेतल्या मैत्रिणींचा ग्रुप म्हणजे वयात येणाऱ्या निरागस,कोमल, तरुणीचा ग्रुप म्हणून नव्याने तारुण्यात पदार्पण करतो.

( मैत्रीचा पहिला छोटा टप्पा संपून ,दुसऱ्या टप्प्यात गेल्यावर पुढे काय होते.पाहूया भाग _२ मध्ये.)

🎭 Series Post

View all