सखी गं.. माझी होशील का ? भाग -1

प्रतिक आणि सायलीची मैत्रीतील प्रेम कहाणी...
विषय - सांग कधी कळणार तुला ?
मनिषा नरेंद्र परब.
कथा - सखी गं... माझी होशील का ..?

.........

भाग -1

सायली नेहमी प्रमाणे बस स्टॉपवर उभी होती, प्रतिकची वाट पाहत.
घड्याळात पाहत, " शी.. अजून हा आला नाही ! नेहमी नेहमी मीच का ह्याची वाट पाहत उभ राहायचं ? " ती स्वतःशीच बोलते.

ती प्रतिकला कॉल लावते पण त्याचा फोन नॉट रिचेबल लागतो, " हे काय ! आता ह्याला काय झालं ?" ती वैतागलेली असते.

तेवढ्यात समोरून प्रतिक येतो, " अरे बापरे, फारच चिडलेली दिसतं आहे सायली..!"

प्रतिक येऊन तिच्यासमोर उभा राहतो, " सॉरी, सॉरी ! जास्त वाट पाहावी लागली ना ? " तो तिला सॉरी बोलत.

सायली त्याच्याकडे रागाने पाहते, " फोन कुठे आहे तुझा ? आणि किती कॉल केले ? "

प्रतिक फोन पाहतो, फोन चा नेटवर्क गेलेला असतो, " अरे देवा आता ही अजून चिडणार ? " तो स्वतःशीच बोलतो.
" अगं ते ना, मोबाईल खराब झाला आहे त्यामुळे. " तो सायलीला समजावण्याचा प्रयत्न करतो.

सायली, " बरं बरं, मस्का लावु नकोस. चल आता उशीर होतोय ऑफिसला."
सायली आणि प्रतिक एकच ऑफिसमध्ये कामाला असतात.

प्रतिक आणि सायलीमध्ये खूप छान मैत्रीचं नातं असतं.
प्रतिक आणि सायली ऑफिसमध्ये पोहचतात. त्या दोघांची मैत्री ऑफिसमध्ये खूप फेमस असते.

सायली जाऊन तिच्या डेस्कवर बसते, आणि कामाला सुरुवात करते.
तेवढ्यात तिच्या बॉसचा तिला कॅबिनमधुन बोलावणं येत, सायली कॅबिनमध्ये जाते. दरवाजा नॉक करते.

सायली, " मे आय कमिन बॉस ? " ती आत जाते.

बॉस, " गुडमॉर्निंग सायली, आजच्या मीटिंग चं काही अपडेट ? "
सायली बॉस ची सेक्रेटरी असते. ती बॉस चे मिटिंग शेड्युअल, खाजगी कामं, त्यांचे अकाउंट सार काही सायली बघत असते.

सायली, " हा बॉस, आज मिस्टर शाह . येणार आहेत बरोबर बारा वाजता !"

बॉस, " गुड, सायली. बरं अजून काही अपडेट ? " बॉस तिला विचारतात.

सायली, " नाही, अकॉउंट्स रेडी आहे. मी एक्सेल शीट तुम्हाला ई-मेल करते. "

असं बोलून सायली कॅबिन मधून निघते. प्रतिक तिला खूणवतो, " यार लंच ला बाहेर जाऊया का आज ? "
खूणवत बोलतो.

सायली त्याला मॅसेज करते, " नाही आज बॉस सोबत मीटिंगला जायचं आहे. क्लायंट येणार आहेत सॉरी नाही जमणार.!"

प्रतिक तिचा मॅसेज वाचतो आणि रागाने फोन बाजूला ठेवतो.
दुपार होते मीटिंग बराच वेळ चालू असते. पण तरीही प्रतिक तिची कॅन्टींग मध्ये वाट पाहत असतो.

प्रतिक, " घ्या नाही चं आली, हा बॉस पण ना. मीटिंग लवकर आटपायची तरं नाही. स्वतः हॉटेल मध्ये जाणार आणि स्टाफ ला भूखं मारणार." प्रतिक ला खूप भूख लागलेली असते.

लंचची वेळ संपते आणि काही वेळाने मिटिंग ही संपते. सायली बाहेर येते, तिची नजर प्रतिकला शोधत असते.
बॉस, " सायली क्लायंटसाठी चहा कॉफी मागव ? बघ काय हवं नको ते.!" आणि बॉस कॅबिन मध्ये निघून जातात.

सायली क्लायंटला ऑफिसच्या गेस्टरूम मध्ये बसवते. तितक्यात प्रतिक येतो, सायलीला पाहून तो तिच्याशी बोलायला तिच्या जवळ जातो, " काय गं सायली किती उशीर ? "

सायली, "शु.. हळू बोल, क्लायंट आत आहे. आणि प्लीज आपण नंतर बोलू थोडं घाईत आहे मी.!"
तो तिच्याकडे रागाने पाहतो आणि डेस्कवर जाऊन बसतो.

सायली ला ही फार वाईट वाटतं की प्रतिक तिची वाट पाहत असताना आपण भेटलो नाही.
सायली त्याला मॅसेज करते, "सॉरी पण आजची ही मीटिंग खूप महत्वाची आहे. हे डिल क्रॅक होणं खूप गरजेचं आहे. "

प्रतिक तिचा मॅसेज वाचतो आणि तिच्याकडे रागाने पाहतो, " मी ही जेवलो नाही आहे, तुझी वाट पाहत होतो मी !"

सायली त्याचा मॅसेज वाचते आणि फोन डेस्कच्या ड्रॉव्हरमध्ये ठेवते.
बॉस तिला कॅबिन मध्ये बोलवतात, "येस बॉस, कॅन आय ?" ती आत जाते.

बॉस, " मिस सायली, आजची मीटिंग हवी त्यापेक्षा खूप छान झाली. मिस्टर शाह ह्यांनी ही डिल फायनल केली आहे.. "

सायली, " ओह्ह ग्रेट, अभिनंदन बॉस ! "
सायली डिल फायनल होते म्हणून खूप खूश होते.

बॉस, " सो मिस्टर शाह ह्यांच्या सोबत उद्या एक डिनर पार्टी ठेवली आहे. सो मला तरी असं वाटतं तू ह्या पार्टीला यावं !" बॉस तिला डिनरसाठी आग्रह करतात.

सायली डिनरचं नाव ऐकून थोडी शांत बसते.

बॉस, " काय गं काय झालं ? तू येते आहेसं ना ? "
बॉस तिचा चेहरा पाहून पुन्हा तिला विचारतात.

सायली, "खरं तरं गरजेचं आहे का बॉस, मी पार्टीला असणं ? मिस्टर शाह आणि तुम्ही पार्टी करा ना ? मला असं उद्या नाही जमणार !"

बॉस, " का गं काही प्रॉब्लेम ? खरं तरं ही डिल तू क्रॅक केली त्यामुळे मी तुला ह्या पार्टीला यावं असं इन्व्हिटेशन देत आहे."

सायली नाईलाजाने जायला तयार होते, " बरं बॉस मी येते. "
आणि सायली कॅबिन मधून निघून जाते. प्रतिक कामात व्यस्त असतो. ती प्रतिक च्या डेस्क जवळ जाते.

प्रतिक, " तू दिलेली शीट अजून रेडी नाही आहे, रेडी झाली की ई-मेल करतो. " प्रतिक च्या बोलण्यात सायलीला राग दिसतं होता.

सायली, " मी तुझ्याकडे शीट मागायला आली नाही आहे, तू जेवलास का ? विचारायला आली आहे. "
सायली त्याच्याशी प्रेमाने बोलत.

प्रतिक, " हो जेवलो ना, झाली शीट की मी ई-मेल करतो. आता मला बरीच कामं आहेत, मॅडम !"
प्रतिक तिला टोमणा देत.

सायली त्याच्यावर चिडत, " तू शीट पुराणच लावलं आहेस त्याला मी तरी काय बोलणार..!" आणि सायली रागाने जाते.

संध्याकाळ होते ऑफिस सुटत. प्रतिक सायली ला शोधत असतो, " गेली कुठे ही ? ऑफिस सुटलं पण बॅग ही नाही ही सुद्धा कुठे दिसतं नाही ? "

ऑफिस च्या वॉटचमनला प्रतिक विचारतो, " सायली मॅडम गेल्या का ? "

वॉटचमन, " हो, त्यांना जाऊन अर्धातास झाला ? काय कामं होतं का ? "

प्रतिक, " नाही ते, फाईल बद्दल बोलायचं होतं. असो !" आणि प्रतिक ऑफिसमधून निघतो.

तितक्यात सायलीचा कॉल येतो, प्रतिक कॉल घेतो, " बोल,, आहेस कुठे ? आणि किती शोधल ? "

सायली, " रोजच्या स्टॉप वर आहे, येतोस तरं ये !"

प्रतिक बसस्टॉप वर पोहचतो, " हे काय ? लवकर निघालीस आणि सांगितलं देखील नाही ? "

सायली, " अरे ऑफिसचं काम लवकर झालं, सो निघाली. म्हटलं स्टॉपवर भेटशील तू.!"

प्रतिक तिच्या डोळ्यांत पाहतो, काही वेळ शांतच बसतो.

सायली, " काय रे काय झालं ? असा का पाहतोयस ?"

प्रतिक, " हेच की तुला काहीच वाटतं नाही ? "
प्रतिक कोड्यात बोलतो त्यामुळे सायलीला त्याचं बोलणं कळतं नाही.

सायली, " म्हणजे, कशाबद्दल बोलतोयस ? "

प्रतिक, "हेच की आपण आज लंच करणार होतो एकत्र, मध्येच तुझी मीटिंग आली. नसती अटेंड केलीसं तरं काय होणार होतं का ?"

सायली, " असं कसं बोलतोस तू ? ऑफिस ची मिटिंग होती. आणि शेड्युअल काल फिक्स झालं होतं. "

प्रतिक, " मग मला हे कालच का नाही सांगितलंस ? एकत्र तरं होतो ना !"
प्रतिक सायलीच्या वागण्याने खूप नाराज असतो.

सायली, " सॉरी बाबा..बरं परवा जाऊया का ? "

प्रतिक, " परवा पेक्षा उद्या जाऊया ! तसं ही उद्या अर्धा दिवस ऑफिस आहे.. टेन्शन नाही.. काय बोलतेस..? "

सायली, " अरे देवा उद्या परत हा ऐकेल की क्लायंट सोबत डिनर आहे तरं अजून तापेल..!" ती स्वतःशीच बोलते.

प्रतिक, " काय झालं ? "

सायली, " ग्रेट,, आपण उद्या जाऊ.. खुश ना ? " ती प्रतिक च्या चेहऱ्यावर हसू यावं म्हणून बोलते.


क्रमश....

🎭 Series Post

View all