सजणा का धरिला परदेस (भाग १)

सजण निघाला परदेस
सजणा का धरिला परदेस (भाग १)


रागिणीचा आज गाण्याचा कार्यक्रम ठरला होता. तिच्या उरात धडधड होत होती, अर्थात हे नेहमीचेच होते. तसा आज काही तिचा पहिला कार्यक्रम नव्हता. पण ती तरीही अस्वस्थ होती. ती कार्यक्रमाला जाण्यासाठी तयार होती. तेवढ्यात आईची हाक आली " रागिणी, हे बघ जाताना देवाला नमस्कार कर आणि अंगारा लाऊन जा. आणि हो बाबांना पण भेटून जा. "

रागिणी हो म्हणाली आणि खरचं देवाला नमस्कार करून आणि बाबांशी बोलून बाहेर पडली. कार्यक्रमाच्या ठिकाणी ती पोचली. तशी अगदी वेळेवरच पोचली पण कार्यक्रमाचे अध्यक्ष अजून आले नव्हते. ती आपल्या जागेवर बसणार इतक्यात कोणी तिला भेटायला आले, " मॅडम, एक रिक्वेस्ट होती. तुम्हांला फर्माईश केली तर तुम्ही माझ्यासाठी एक गाण म्हणाल का?" तो तरूण.
" अगदी लगेच नाही पण मध्यंतरानंतर प्रयत्न करीन. " तो थॅक्स म्हणाला आणि फर्माईशची दोन गाणी लिहीलेला कागद देऊन तो निघून गेला. त्या फर्माईश मधील दोन्हीही गाणी रागिणीच्याही आवडीची होती. अध्यक्ष जरा उशीरा आले. पहिला ओळख, बक्षीस समारंभ वगैरे होऊन मग रागिणीचा कार्यक्रम सुरू झाला. प्रथम रागिणी ने एका रागाने सुरवात केली. प्रेक्षकांचा प्रतिसाद अगदी उस्फूर्त होता. त्यामुळे रागिणीही उत्साहाने गात होती. एक ठुमरी गाऊन झाल्यावर ती फर्माईशीकडे वळली. पहिले गाणे तिने " हे सुरांनो चंद्र व्हा" घेतले. टाळ्यांच्या कडकडाटात गाणे संपले. मग *सजणा, का धरिला परदेस" सुरु केले तेही टाळ्यांच्या कडकडाटात. गाणे सारा प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन ऐकत होता. गाणे संपल्यावर परत टाळ्यांचा कडकडाट झाला आणि लगेच कार्यक्रम संपल्याची घोषणा केली गेली. रागिणी मागचे सोपस्कार आवरून घरी जायला निघाली तर तो दारात उभा. त्यानी थांबवून सांगितले "मॅडम गाणे अफलातून झाले. तुम्ही माझ्या घरी याल का? "
"साॅरी, मी कुणाच्याही घरी जात नाही. " रागिणी.
" प्लीज, मॅडम नाही म्हणू नका. " तो तरुण.
रागिणी लक्ष न देता आयोजकांनी सोय केलेल्या गाडीत जाऊन बसली.

दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी १० वाजता तो तरुण घरी हजर. रागिणी काॅलेजला गेली होती तोपर्यंत तो तिच्या आईशी ओळख करून घेऊन गप्पा मारत बसला. रागिणी घरी आली. त्याला समोर बघून तिला आश्चर्य वाटले. तो रागिणी ला म्हणाला " साॅरी मॅडम पण मला नाईलाजाने घरी यावे लागले. माझ्या आईसाठी तुम्ही माझ्या घरी यावे एवढच सांगायला मी आलोय. "
"पण मी खरचं कोणाच्याही घरी जात नाही. मी नाही येऊ शकत. हवे तर तुम्ही तुमच्या आईला इथे घेऊन या." रागिणी
" ते शक्य नाही. मी सांगणार नव्हतो पण सांगतो. माझी आई संगीताची शिक्षक होती. गाणं म्हणजे तिचे सर्वस्व. चार वर्षापूर्वी शाळेतच तिला चक्कर आली. तिच ब्रेनहॅमरेज झाले आणि ती कायमची हंथरूणाला खिळली. गेले काही दिवस ती एकदम शांत झालीय. फारशी बोलत नाही, प्रतिसाद देत नाही. " तो.
" तरी पण. हे बघा माझेही वडील अधू झालेत. त्यांच्या स्पायनल काॅर्डला धक्का बसलाय. म्हणूनच मी कुठे जात नाही आणि अशा परिस्थितीचा लोक फायदा घेतात आणि माझी सिक्युरिटी मला महत्वाची आहे. काय माहित तुमचे घर कुठे आहे. आणि माझ्या बरोबर यायला ही कोणी माणूस नाहीये."रागिणी.
" नाही मी काही तुम्हांला करणार नाही. पण मी समजूच शकतो. ठीक आहे. आता मी तुम्हांला आग्रह करणार नाही. हे माझे कार्ड. कधी तुमचा विचार बदलला तर… * तो.
" एक मिनीट, " रागिणीचे बाबा " रागिणी, बेटी तू जा त्यांच्या घरी. इतरही कोणाला अडवू नाही. तुझ्या गाण्यानी जर यांच्या आई बर्या होणार असतील तर खरचं जा. "

" पण बाबा, मी कशी जाऊ? तुम्हीच मला सांगितले होते ना, कुणाच्याही घरी जायचे नाही." रागिणी " ठीक आहे मि. केदार , मी उद्या ठिक अकरा वाजता तयार राहीन पण तुम्हाला मला न्यायला आणि परत सोडायला यावे लागेल. " रागिणी.
" माय प्लेजर, मी नक्की येईन. बाबा तुमचे उपकार मी कसे फेडू. आई हा सर्वांचा वीकपाॅइंट असतो, तसा माझाही आहे. मी फार आभारी आहे तुमचा. " तो एवढ बोलून निघून गेला.
रागिणी मात्र त्याचा विचार होती " कोण हा केदार देशमुख. कुठे राहतो. कार्ड वरून तरी एका फर्मचा मॅनेजर आहे एवढे कळले. "

जाणून घेऊया या केदार विषयी आणि त्याच्या आई विषयी पुढच्या भागात.

सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे

🎭 Series Post

View all