साज रांगोळीचा दारी ...

आली आली दिपावली


आली आली दिपावली
साज रांगोळीचा दारी
दिप ज्योती उजळली
हर्ष झाला घरोघरी

धनत्रयोदशी आली
धनधान्यही पुजली
घरदार स्वच्छ झाली
रोषणाईने सजली

स्नान नरक चतुर्थी
उठा पूर्वी सूर्योदय
लावा उटणं सुगंधी
जाई निघूनि दारिद्र्य

वंदू लक्ष्मीला पुजूनी
अमावस्या आश्विनीची
वसु बारस पुजूनी
दारी पावले लक्ष्मीची

लावू कंदील आकाशी
जपू जुन्या संस्कृतीस
दारी स्वास्तिक काढूनी
पुजूया केरसुणीस

भूईचक्र फुलबाजी
फराळ गोडधोडाचा
फटाके आताषबाजी
करंजी लाडू रव्याचा

वसु बारस पूजन
पुरणपोळी नैवेद्य
गायीगुरास चारुन
याव घरात समृद्ध

पत्नी ओवाळी पतीस
बलिप्रतिपदा दिन
व्यापाऱ्यांचे नववर्ष
करा चोपडी पूजन

ओवाळून बंधूराया
दिन भाऊबीज खास
आयुष्य दिर्घ मागूया
ओवाळणी भगिनीस

झाली दिवाळी संपन्न
स्मृती विवाह तुळशी
कन्या दानाचे पुण्य
लावूनी शाळीग्रामाशी


इरा टीम, लेखक आणि वाचक परिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा