सहवास तुझा नी माझा..... लघु कथा

काका काकू एक वृद्ध दाम्पत्य, एकटे एकमेकांना सांभाळत छान राहतात, एकुलता एक मुलगा, तो खूप चांगला आहे, कामा निमित्त दुसर्‍या शहरात राहतो तो , मुलगा नेहमी आग्रह करतो चला तिकडे माझ्याकडे

 सहवास तुझा नी माझा..... लघु कथा

©️®️शिल्पा सुतार
.........

काका काकू एक वृद्ध दाम्पत्य, एकटे एकमेकांना सांभाळत छान राहतात, एकुलता एक मुलगा, तो खूप चांगला आहे, कामा निमित्त दुसर्‍या शहरात राहतो तो , मुलगा नेहमी आग्रह करतो चला तिकडे माझ्याकडे, पण काका काकू जात नाहीत, त्याच घर वरती अकराव्या मजल्यावर, करमत नाही त्यांना तिकडे, कोंडल्या सारख होत, शिवाय मुलगा सून दोघ नौकरी करतात, दिवस भर घरी नसतात, काय करणार तिथे जावून, वर्ष सहा महिन्यात असते त्यांची फेरी मुलाकडे, महिना पंधरा दिवस राहतात परत आपल्या घरी वापस , आपल घर आपला परिसर या शिवाय आता काका काकूंना करमत नाही, कधी मुलगा सून येऊन जातात, इकडे शेजारी ओळखीचे आहेत, मित्र मंडळ कट्टा सगळ आहे, मन रमत तेवढच, आयुष्याचे अनेक पावसाळे याच घरात पाहिले, आता कुठे जावसं वाटत नाही त्यांना, मोठा ऐसपैस बंगला आहे त्यांच्या, पुढे मागे बाग, छान आवड होती त्यांना बागकामाची, वेळ मस्त जात होता त्यांच्या तिथे,

काका काकूंचं म्हणजे तुझ माझ जमेना तुझ्या शिवाय करमेना अस झालय सध्या , कोणत्याही असा मुद्दा नाही ज्या वरुन वाद होत नाही, एखाद्या गोष्टीवर त्यांच एकमत होण दुर्मिळ गोष्ट आहे , पूर्वी काकू ऐकुन घ्यायच्या, आता त्या ही बोलतात, दोघ एकमेकांच्या आधाराने आनंदात जगत आहेत, एकमेकांना काय हवंय हे एवढ्या वर्षांचा संसारात नीट समजल त्यांना, दोघे तितकेच हट्टी, अगदी लहान मुलासारखे,

काकू उठल्या बघितल काका बाजुला नाहीत

" कुठे गेले हे" ,.... किचन मधे काही तरी खुडबुड सुरू होती, काका चहा करत होते

"अहो तुम्ही कश्याला केला चहा? मला उठवायच ना? , काल चटका लावून घेतला तुम्ही हाताला",.. काकू

"लावून घेतला म्हणजे काय? चटका लागला अस बोल ना",.. काका

"तुम्ही ना खूप धावपळ करतात कामाची, उगीच लागून जात",.. काका

"हो समजल, पुरे आता, चल चहा झाला आहे, मस्त बागेत बसुन चहा घेवू ",.. काका

काकू छान हसत होत्या..

चहा झाला, दोघ जरा वेळ बोलत बसले बागेत

"चल मी आवरतो आता",.. काका

" ठीक आहे मी नाश्ता बनवते",.. काकू आत आल्या, अर्धा तास झाला तरी काकांची आंघोळ झाली नव्हती, काय करतात इतका वेळ कोण जाणे, काकांचा अंघोळीत बराच वेळ गेला

"अहो आटपले की नाही तुमच? किती वेळ अंघोळ करणार?, पूर्ण पाण्याची टाकी खाली झाली ", ....... काकु आवाज देत होत्या

"झाल आहे ग, माझे कपडे धुत होतो, तुझ म्हणजे नेहमी अतिशयोक्ती करते, काय तर म्हणे पूर्ण टाकी खाली झाली ", .... काका

"जस काही मी धुणार नव्हते ना तुमचे कपडे?, मशीन मध्ये टाकत जा ना ",.. काकू लटक्या रागात बोलल्या

"हे मला अजिबात आवडल नाही, आता मी पूर्वी काम करायचो नाही तर ओरडायची मला, आता करतो तर नको बोलतेय, नक्की काय हवय तुला?", ..... काका बोलत होते,.. "झाला का तुझा उपमा बनवून ? ",

" हो चला डिश घ्या, त्या साठी बोलवत होते मी, आवरा लवकर उपमा गार होतोय, या वयात आता कोणाला दाखवायच आहे एवढा साबण लावून", ..... काकु

" मी स्वतःसाठी स्वच्छ राहतो ",.. काका जरा चिडले होते

" हो समजल चला आता",.. काकू

नाश्ता झाला,

" येतेस का ग तू कट्यावर, चल फिरून येवू", .... काका रेडी होवुन आले, ते आवाज देत होते

" नको तुम्ही जावून या, मला काम आहेत घरात, सरला येईल कामाला परत", ..... काकु

" अगं चावी ठेवू की शेजारी आणि आता तर खाण झालं आहे, स्वयंपाक आज थोडा करू या, चलतेस का?",.. काका थांबले होते

"नको हो तुम्ही जा संध्याकाळी येईन मी, डबल डबल थकायला होत आता हल्ली मला", ......काकु

" काय होतय? मी थांबू का घरी?, गोळ्या आहेत ना तुझ्या सगळ्या? ", ....काका काळजी करत होते, आताशा थोड जरी काही झालं काकूंना तरी ते घाबरून जात

" मी ठीक आहे , तुम्ही जा, मला जरा वेळ एकटा रहायचं आहे, पडते जरा मी" ,..... काकु

" बर मी येतो अकरा वाजेपर्यंत, मग करू स्वयंपाक तू तोपर्यंत आराम कर", .... काका फिरायला निघून गेले

" काय बाई ईकडे चल.... तिकडे चल, अजिबात आराम नाही, नेहमी मी सोबत हवी" ,.. काकू छान हसत होत्या,.. "ही सरला का आली नाही अजून? सुट्टी तर नव्हती ना सांगितली तिने , नाही तर मी आरामासाठी घरी रहायची आणि घर काम करावे लागतील",...

बेल वाजली बहुतेक..... सरला आली होती

" काय ग उशीर झाला सरला?",.. काकू

"हो काकू आज जरा शाळेत गेले होते, मुलांची फी भरायला ",... सरला

" आटोप ग आता", ... काकु

" तुम्ही नाही गेल्या का काकू फिरायला ",.. सरला

" नाही ग आज जरा आराम करेन म्हणते", .... काकु

"काही करायचा का स्वैपाकाच? ....काही काम असेल तर सांगा", .... सरला

"नको..... आज खाण झाल आहे, आता दुपारून मुगाची खिचडी करेन आणि ताक... तू आवर",.. काकू

सरलाचं काम झालं, ती आवरून गेली

काकूंनी मस्त रेडियो लावला, छान गाणी ऐकत पडून घेतल, केव्हा डोळा लागला ते ही कळलं नाही, कोणीतरी जोरात दार वाजवत होत, काकू उठल्या चष्मा लावला, घड्याळात बघितलं तर बारा सव्वा बारा होत आले होते, काका आले नाही वाटतं? कोण वाजवतंय एवढ्याने दार?

काकूंनी दार उघडलं, बघते तर काका दोन जणांच्या मदतीने लंगडत आता आले

"काय झालं?",.. काकू घाबरून गेल्या

बगीच्यात पाय घसरून पडले काका, सोबतच्या मित्रांनी आम्हाला फोन केला, दवाखान्यात नेऊन आणले आहे, त्यांचा पाय मुरगळला आहे, घाबरायचं काही कारण नाही, डॉक्टरांनी ही औषधे दिली आहेत, थोडे दिवस पायाची काळजी घ्यावी लागेल, खूप चालू नका, घरातल्या घरात थोड चालता येईल, ते ही उद्या पासून......

"ठीक आहे, तुमचे काही पैसे द्यायचे आहेत का?", ... काकु विचारत होत्या

"नाही बिल भरलं आहे काकांनी",..

दवाखान्यातून आलेले मदतनीस गेले, कट्ट्यावरचे दोन मित्र आत येऊन बसले, काकूंनी पाणी आणलं, मित्रांनी पाणी घेतल

"काका तुम्ही आराम करा आता, येतो आम्ही, संध्याकाळी येतो परत भेटायला, काही आणायचं आहे का? त्यावेळी येतांना आणतो" ,.. मित्र

"काही नको, माझ्याकडे आहे तुमचा नंबर, काही लागलं तर सांगेन" ,..... काकु

काकू आत आल्या, काळजीने काकांन जवळ बसल्या आणि रडायला लागल्या

"काय झालं आहे? , मी एकदम ठीक आहे, एवढी काळजी करू नको", ..... काकांचे ही मन भरून आलं होतं

" तरी तुम्ही म्हणत होते तू चलतेस का? मीच आले नाही, मी यायला हवं होत सोबत", ,..... काकू

"त्याने काय झालं असतं, जेव्हा पडायचं तेव्हा पडणारच होतो ना मी", .... काका मुद्दाम गम्मत करत होते

" हे बघा असं बोलू नका, माझाच हलगर्जीपणा आहे हा", ..... काकु अजून काळजीत होत्या

" ठीक आहे.... आता तू वाईट वाटून घेऊ नको", .... काका

" तुम्ही बसा टीव्ही बघत मी खिचडी टाकते ",.. काकू

" असं कर आता राहू दे आता स्वयंपाकाचं, फोन आण मी बाहेरून जेवण मागवतो", .... काका

" होईल हो खिचडी पटकन, अजूनही काय माझीच काळजी करता आहात", .... काकुंना किचन मध्ये जाण्यापासून काकांनी थांबवल आणि हट्टाने बाहेरून जेवण मागवल

काका काकूंचं जेवण झालं, काकूंनी काकांना औषध दिले, काका झोपले होते, काकू जवळच बसून होत्या, एव्हाना सगळीकडे कळल होतं, बऱ्याच मित्रांचे मेसेज आले होते,

काकू विचार करत होत्या, यांना काही झालं तर माझं कसं होईल? रोज सोबत राहायची खूप सवय झाली आहे, कसेही असले तरी खूपच जपतात मला ते, जास्तीचं काम ही पडू देत नाहीत, होते तसे पूर्वी ते हट्टी स्वभावाचे ते पण आता वयामानाने बरेच निवळले आहेत, मी सोबत करायला हवी होती त्यांची, यापुढे काळजी घेईन मी त्यांची,

हळूच काकू दुसऱ्या रूममध्ये गेल्या, मुलाला फोन केला,

"अरे बाबा पडले आज बगिच्यात, तुला फक्त कळवते आहे मी, मित्रांनी नेल होत दवाखान्यात, औषधे मिळालेत तू काळजी करू नको" ,... काकू

मुलगा खूप घाबरून गेला... जास्त लागले नाही ना?

"पाय मुरगळला आहे त्यांचा",.. काकू

"का गेले होते बाबा तिकडे?",..

"अरे वॉक ला गेले होते मित्रांसोबत ",.. काकू

" मी येतो उद्या तिकडे ",..

" नको रे असं कर तू नंतर ये शनिवार-रविवारी एवढं घाबरण्यासारखं काही नाही, मी लक्ष देऊन आहे" ,... काकू समजावत होत्या

संध्याकाळी काका उठले तर चहा-बिस्कीट रेडी होते

" अरे वा आज मला अगदी व्हीआयपी ट्रीटमेंट.", ... काका

"हो म्हणजे रोज जसे काही तुमचे हालच असतात घरात", ..... परत बोलाचाल सुरू झाली त्यांची

" आता छान वाटत आहे घरात असल्यासारखं",..... काका खो खो हसायला लागले

मस्त चहा पाणी झालं, टीव्ही बघता बघता संध्याकाळी सहाच्या सुमारास कट्ट्यावरचे सगळी मंडळी घरी आली,

"पुढचे पंधरा दिवस हाच आपला कट्टा, चालेल ना काकू?",..

"हो म्हणजे काय, आपल्या ग्रुपचा आमचा आधार आहे",.. काकू

" पण एक करायचं काकू रोज चहा वगैरे काही करायचं नाही, त्रास करून घ्यायचा नाही, आम्ही रोज येणार मस्त गप्पा मारणार, तेवढेच काकांनाही करमेल",..

"हो चालेल पण एक दिवस आपण सगळे जेवायला या इकडे, मस्त बेत करू" ,... बराच वेळ गप्पा झाल्या हा हा ही ही मस्त वेळ गेला, आजचा पहिला दिवस म्हणून काकूंनी आज हट्टाने सगळ्यांना चहा केला

संध्याकाळी सरला आली, तिला पुढचे पंधरा दिवस दोन्ही वेळच्या स्वयंपाकाची जबाबदारी दिली, सरला काळजी करत होती, दोन-तीन उपायही तिने सांगितले, काकूंनी हसून ऐकून घेतल

"ताट करू का?",.. काकू

" हो पण आधी इकडे ये" ,.. काकांनी काकूंना बोलावले, "किती धावपळ करते आहेस तू, मी एकदम ठीक आहे, तू रिलॅक्स हो बर आधी" ,.... काका

"मी ठीक आहे हो, काळजी तर वाटणारच...... शेवटी जोडीदाराबरोबर जेवढं प्रेमाने हक्काने मनमोकळे रहाता येतं, जो आधार प्रेम जोडीदार देऊ शकतो त्याची सर दुसर्‍या कशात नाही, तुमच्या शिवाय मी अपूर्ण आहे",.. काकू

काका ही अगदी काकूंचा हात हातात घेऊन बोलले...... "खूपच सवय झाली एकमेकांची, खूप बोलाचाल होते आपल्यात, कधी कधी मत जुळत नाहीत आपली, पण एकाला काही झालं की दुसरा हळवा होतो, आपोआपच दुसऱ्याबद्दल प्रेम वाढतं, काळजी वाटते, यालाच तर सहजीवन म्हणतात" .....

दोघांनी जेवण केल,

"चला ह्या गोळ्या घेवून घ्या, आणि आता पाय सांभाळा",.. काकू

" हो तू ही आराम कर, तुझी धावपळ आहे खूप ",.. काका

परत दुसऱ्या दिवशी सकाळी.....

काका बाथरुम मध्ये होते..

" आटपा हो झालं की नाही? चालता येते का? काय करत आहात बाथरूम मध्ये? एवढा वेळ कसा लागतो तुम्हाला नेहमी ? , पाय सांभाळा आधी, टॉवेलने नेला आहे का?..... काकु

"हो आलो आलो, आटोपतोय ग, काय, किती आवाज देते", ...... काका

चला नाश्ता रेडी आहे.. डिश घ्या......

" चालता येत का मला? , काम नको सांगू मला",.. काका

"एवढ्या वेळ बरे बाथरूम मध्ये उभे राहिलात, तेव्हा नव्हता का पाय दुखत?",... काकू

हा सहवास प्रेमाचा कधीही न संपणारा.......