सहवास तुझा

सहवास
तुझ ते हक्कान रुसणें
माझ ते तुझ्यात गुंतणे
इंद्रधनूचे रंग संपले
उरले गंध दिवाणे

अबोल्यातले ते झुरणे
अहेतुकाचे ते हसणे
मौनामधुनी मोहरणारे
सहवासातील खोटे रुसणे

सहजी करी धरावे
नख लावुनी खुडावे
प्रेमाने फूल मालतीचे
लटकेच रागाने पहावे

नीरवता ती तशीच
धुंद तेच हे चांदणे
रुणझुणले काळजात
लखलखले ती लोचने

ती भेट पापण्यांची
धुंदावल्या क्षणांची
काहूर गोड वाटे
ही खूण या पथाची

नयन बोलले काही
स्मित उमटे हास्याचा
तू सप्तसूर माझे
तू श्वास अंतरीचा


- श्री
✍️✍️✍️✍️