Oct 24, 2021
कथामालिका

सहजीवन ( भाग 2)

Read Later
सहजीवन ( भाग 2)

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

इतके बोलून शलाका आपल्या रूम मध्ये गेली. डोळ्या समोर सगळा भूतकाळ दिसू लागला. शलाका आणि प्रमोद चे लग्न अगदी ठरवून बघुन झाले. मध्यम वर्ग कुटुंबात जन्मलेली शलाका घरात मोठी होती तिच्या नन्तर एक भाऊ आणि बहिन . शलाका शान्त आणि समंजस होती. पदवी पर्यंत तिने शिक्षण घेतले मग लगेचच एका नातेवाईकानी प्रमोद चे स्थळ सूचवले. शलाका दीसायला निट नेटकी छान बांधा,मोठे केस कोणाला ही आवडेल अशी आणि प्रमोद एकदम दिसायला राकट ठीक ठाक पण सरकारी नोकरी वाला होता.1980 च्या साली  असे स्थळ सोडने मूर्ख पणा च होता. अस शलाका च्या आई वडिलांना वाटले . मूलीची पसंती तेव्हा इतकी विचारत घेतली जात नसे. शलाका ला प्रमोद इतका आवडला नव्हता. तिच्या मनीचा राजकुमार राजबींडा नसला तरी किमान स्मार्ट सुंदर असा होता. आई बाबा समोर तिचे काही चालले नाही उलट घरात एक व्यक्ति खायला कमी होईल ही त्यांची धारणा. कारण घरची परिस्थिति जेमतेम होती. मग लवकरचा मुहूर्त बघुन शलाका आणि प्रमोद चे लग्न झाले. प्रमोद कामा निमित शहरात होता बाकी गावा कड़े आई वडील  भाऊ बहिन सगळे होते. लग्न झाल्यावर 15 दिवस शलाका गावी राहिली. पहिल्या रात्री ची शलाका ची ख़ुप स्वप्ने होती . प्रमोद तिच्याशी गप्पा मारेल तिच्या आवडी निवड़ी जाणून घेईल तिला पुढे अजुन शिकायचे होते ते ती त्याला सांगेल. तो तिला हळूवार फुलवत प्रणया च्या उत्कट क्षणा पर्यंत नेइल. आपण ही त्याच्या बाहुत अलगद सामावून जावू. पण या पैकी काहीच घडले नाही. ती त्यांच्या खोलीत आली तेव्हाच तीची निराशा झाली. साधी रूम गावा कडची पण जरा सुद्धा सजवली नव्हती. लग्ना नन्तर ची पहिलीच रात्र का आपली असा प्रश्न तिला पडला. ती छान तयार होऊन प्रमोद ची वाट बघत बसली. प्रमोद आत आला. कपड़े बदलून तिच्या बाजूला बसला शलाका मला माझ्या बद्दल काही गोष्टी सांगायच्या आहेत.  हा बोला मी ऐकते आहे ती म्हणाली. मला प्रत्येक गोष्ट वेळे वर आणि निट नेटकी लागते. कामात चुकार पणा चालणार नाही. माझे आई बाबा जेव्हा जेव्हा आपल्या कड़े येतील तेव्हा त्यांचा पाहुणचार व्यवस्थितच झाला पाहिजे. मला न विचारता कोणतीच गोष्ट करायची नाही. मला जसे आवडेल तसेच  वागायचे. मला राग पटकन येतो त्यामुळे माझ्या मर्जी विरुद्ध वागणे मला चालणार नाही. अस बरेच काही तो सव्हता बद्दल सांगत राहिला पण तुला काय आवडते हे एका शब्दाने ही त्याने शलाका ला विचारले नाही. तू माझी बायको आणि मी नवरा या अधिकाराने त्याने तिचा उपभोग घेतला त्यात जरा  सुद्धा हळूवार पणा ,नाजुक पणा किंवा तरल प्रेम भाव नव्हता. तिच्या मनाची भावनां ची पर्वा न करता तो फ़क्त तिला ओरबाडत राहिला. शलाका निमुट पणे त्याला सहन करत राहिली डोळ्यात पानी जमा झाले होते. तिच्या स्वप्नाचा चुराडा झाला होता. रोज असच ती त्याला निर्विकार पणे सहन करत राहायची . तो मात्र सव्हता तृप्त होऊन शान्त झोपी जायचा. गावी  15 दिवस राहुन ते दोघे शहरात आले. प्रमोद ने एक तीन रूम चे घर विकत घेतले होते. शलाका ने आपल्या पसंतीने घर सजवन्याचे ठरवले पण पैसे खर्च करण्याची काही ही गरज नाही आहे असे घर छान आहे अस बोलून प्रमोद ने तिला काही ही करू दिले नाही. तो कीती अरसिक आहे याची शलाका ला पदोपदी जाणीव होत होती.  शलाका संध्याकाळी तो यायच्या आधी छान तयार होऊन बसायची कारण त्याची सक्त ताकीद होती की तीन निट नेटके दीसायला आणि राहायला हवे पण फ़क्त त्याच्या पुरते. बाहेर किंवा शेजारी कुठे ती जाणार असेल तर जास्त नटने ,तयार होणे याची तिला परवानगी नव्हती. त्याच्या साठी शलाका फ़क्त बायको होती कधी ही त्याला अवेलेबल असणारी हक्काची शय्या सोबती. कधी त्याच्या मनात आले तर तो तिला बाहेर फिरायला घेऊन जायचा पण फार कमी. घरी त्यांच् सगळ निट नेटके आणि वेळेत सगळ ती करायची नाहीतर त्याचे बोलने ऐकून घ्यावे लागायचे. लग्न करून ही म्हणावे तसे सुख समाधान शलाका ला मिळाले नव्हते. माहेरी  तिला जास्त तो पाठवत नसे. सव्हता दीसायला तिच्या पुढे कमीच होता म्हणुन शलाका बाबत तो जास्त  सव्हताला अन सेक्यूर फील करत होता. लोकां समोर ही तिचा पाण उतारा तो सहज करायचा. 

क्रमश....... ©® sangieta devkar 2017 

कसा वाटला हा भाग नक़्क़ी कमेंट करा. भेटू पुढील भागात.

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Sangieta Devkar

Print&Media writer.Freelancing writer for PCMC Sakal.Director @Amit Brand Communications

Reading and writing is my passion.Doing Anchoring.Print &Media Writer.Director @amit brand communications.Freelancer writer for PCMC Sakal.