साहित्यातील दुर्मिळ पान : अपर्णा ( संबंध सेतू )

साहित्यातील दुर्मिळ पान : अपर्णा
अपर्णा परदेशी...


मुलगी, नवरा आणि आपली अपर्णा अगदी सुंदर त्रिकोणी कुटुंब! तिच्या आयुष्यात ती खूप व्यस्त होती. तिला प्रेग्नन्सी नंतर आता मुलगी वयात येईपर्यंत मधली वर्षे नीट आठवतच नाही. तीच आयुष्य फक्त नवरा आणि मुलगी ह्यांच्या अवतीभवती फिरत होतं. एकदा तिच्या तेरा वर्षाच्या मुलीने कुतूहलाने सहज विचारलं की, "मम्मी तुला काय आवडत?" तर तिला चक्क आठवाव लागलं होत की नक्की तिला काय आवडत. आपण स्रिया संसारात इतकं गुरफटून जातो की स्वतःसाठी जगणंच विसरून जातो. पण मुलगी पटकन बोलून गेली की, "तुला तुझी आवड पण सांगता येत नाहीये आई!!"

त्यावेळी अपर्णाने ठरवलं की या पुढे मी जशी ह्या दोघांची आवड जपते तशी स्वतःची आवड जपायला सुरुवात करायची. मध्यमवर्गीय कुटुंबात फार मोठी स्वप्ने नसतात म्हणून छोटी स्वप्ने तर आपण पूर्ण करूच शकतो ना.!! तिला ट्रॅव्हलिंग करायला आणि कविता रचायला फार आवडतं. सवडीने एकडा तरी सोलो ट्रिपला जायचयं. कसं होईल माहीत नाही पण जायचयं.

लिहायला सुरुवात तशी तिने शाळेत असताना केली. विषय निरीक्षण किंवा एखाद्या घटनेतून सुचतात. तिच्या कविता अतिशय उत्तम असतात. तिने स्वतःला एक नियम दिलाय की रोज एक तरी साहित्य प्रकाशित करायचं आणि ती करतेच. ईराच्या चॅम्पियन ट्रॉफी 2023 मध्ये माझी तिच्याशी ओळख झाली. मुळात इंट्रोवर्ट असलेली अपर्णा ग्रुपवर अगदी बिनधास्त गप्पा मारू लागली.

मोकळ्या वेळेत तिला कादंबऱ्या वाचायला आवडतात आणि आवडता गायक म्हणाल तर किशोर कुमार, पण कलाकार एक नाही सांगू शकत. मनाला भिडणारी कथा असली तर मग ते पात्र तिला आवडायला लागतात. मला ट्रॅव्हल करायला खूप आवडतं. तीच आणि माझा एकदा कॉमन पॉईंट आहे, आमचं दोघींचं आवडतं ठिकाण नाशिक!! जिथं तिने नुकतंच स्वतःच घर घेतलं आहे. आणि जशी साहित्याची बाग तिच्या प्रोफाइल वर फुलतेय तशीच घराची बाग , कुटुंबाचा बहर तिच्या आयुष्यात फुलतो आहे.

अपर्णा कथा लिहतांना जे सुचत जातं ते उतरवते. तिला कविता लिहायची जास्त आवड आहे. प्रेम कथा आणि विनोदी वाचनाची आवड लहानपणापासूनच लागली. तिची आजी स्वाध्यायी परिवारातील असल्याने धार्मिक पुस्तके वाचायला लावायची. तिची मुलगी आता हायस्कूल मध्ये गेली. तिची काम ती स्वतः करते तशी अपर्णाने तिला स्वतःची कामे स्वतः करायची सवय लावली आहे शिवाय यजमानही स्वतःची बरीचशी कामे स्वतः करतात त्यामुळे आता वाचन लिखाणासाठी किंबहुना स्वतःच्या जडणंघडणीसाठी वेळ मिळायला लागला आहे. ध्येय साध्य करण्यापेक्षा तिला आता स्वतःसाठी जगायला आवडू लागलं आहे. संसारात जास्त गुरफटून राहण्यापेक्षा तिने स्वतःच्या आवडी निवडी जपायच ठरवल आहे, नंतर वाटायला नको की संधी आली होती पण आपण ती घेतलीच नाही.

लेखक सुहास शिरवळकर हे तिचे आवडते लेखक आणि ती सध्या बऱ्याच काव्य स्पर्धेमध्ये सक्रिय आहे. पोएम कट्टा नावाची स्पर्धा नुकतीच पार पडली ज्यात तिच्या कवितेला राज्यस्तरीय उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. काव्यवाणी तर्फे तीन महिन्यापासून चालणाऱ्या काव्य स्पर्धेमध्ये 3 राऊंड यशस्वी रित्या पार केलेत. नुकताच फायनल पार पडला. रिझल्ट लागायचा बाकी आहे. इरावरही तीचा संपूर्ण सक्रिय सहभाग आहे. प्रतिलिपीवर रोज एक चारोळी किंवा कविता प्रकाशित करते. Love is love ही तिची पहिली व आवडती कथा. जिच्यामुळे वाचक तिला ओळखायला लागले आणि ती उत्तम लिहू शकते याची तिला स्वतःला जाणीव झाली. ईरावर सध्या ती मेघा अमोल यांचं लिखाण वाचतेय. हळूहळू सर्वांचं वाचेल.

स्वभावाच म्हणाल तर ती जरा इंट्रोव्हर्ट आहे. स्वतःबद्दल फारस बोलत नाही. तिला तिची स्पेस फार प्रिय आहे. लुडबुड आवडत नाही. ऐकते सर्वांचं पण करते फक्त स्वतःच्या मनाचं. मात्र जिथे ती कॉमफॉर्टेबल झाली तिथे बिन्धास्त सर्व बोलून मोकळी होते म्हणून तिच्याकडे मोजकेच पण जिवाभावाची माणसे आहेत. अशा माझ्या गोड मैत्रिणीला तिच्या फुलणाऱ्या लेखणीसाठी खूप खूप शुभेच्छा!!


नवे गाव वाटा नव्या शोधते
उषा-निशा रोजची कथा सांगते!
पुन्हा एकदा तू आज जगावे
नवे रंग या जीवनाचे पहावे!!