सहेला रे.

Marathi Sinema.


सहेला रे.

कथा, पटकथा,संवाद,दिग्दर्शन, सबकुछ , गोडूल्या फ्रुटीची.." मेरी सोन परी है ना"...... म्हणजे आपल्या मृणाल कुलकर्णी.

मृणालजीना मी तेव्हा पासून बघत आले आहे. जेव्हापासून त्या टी. व्ही.वर काम करायला लागल्या होत्या.

त्यामुळे कोणत्याही व्यक्तिरेखेचे काम असूद्या मृणाल म्हंटले की,डोळ्यासमोर ताबडतोब अतिशय सुदंर,सोज्वळ,शांत,संयमी,अशीच व्यक्तिरेखा उभी राहते.

स्वतःच्या सिनेमाची एवढी मोठी जबाबदारी एकटीने घेणे खरंच खूप कौतुकास्पद आहे.
सिनेमा मस्त हळुवार सुरू झाला आणि कथानक पुढे सरकत सिनेमा संपलाही.

सिनेमाबद्दल जे काही वाचले आणि ऐकले होते,आणि सिनेमाच्या शीर्षका वरूनच कथा काय असू शकेल ह्याचा अंदाज येत होता.

खरं सांगू का...??

मला तर सिनेमा बघून मृणालजीना काय नेमके दाखवायचे आहे हे नीट समजले नाही म्हणण्यापेक्षा सिनेमा नंतर कथे विषयी डोक्यात अनेक प्रश्नच येत राहतात.

त्यांच्या ॲक्टिंगचा कस मात्र पुरेपूर लावला गेला आहे. शमाची भूमिका त्या अक्षरशः जगात आहेत असे वाटत होते.

स्वतःचेच संसाराच्या विश्वामध्ये स्वतःचेच गमावलेले अस्तित्व पुन्हा एकदा निर्माण करणारी सुसंस्कृत स्त्री म्हणजे हाऊस वाईफ म्हणजे गृहिणी.

बालपण आणि तरुणपणातील मित्र वीस वर्षांनी अचानक भेटतो.आणि तिच्या जुन्या अस्तित्वाला ललकारतो.

त्याने विचारलेल्या सगळ्या प्रश्नाची उत्तरे अर्धवट आणि घाबरत घाबरत ठराविक मर्यादेमधिक देऊन त्याच्या मनात शमा बद्दल असलेल्या प्रेमाला अगदी सामंज्यस्याने डावलाताना शमा छानच रंगवली आहे.

सिनेमाच्या शेवट पर्यंत गेल्यानंतर ,आपल्याला समजते की,तिचा नवरा विक्रम ,हाच तर सगळ्यात जास्त आणि तिच्या पेक्षाही समंजस आहे.सुबोध भावे ही भूमिका नेहमीप्रमाणेच मस्तच दाखवली आहे.

स्त्रीला गृहीत धरलेल्या घरामध्ये नेमकी चूक कोणाची होती...? नवरा जर इतका समंजस होता तर काय कथेच्या नायिकेला त्याला ओळखता आले नाही काय...? मित्राने चढवल्या नंतर मात्र ...." प्रॉमिसला काय अर्थ राहतो ना...??" विचारणारी स्वतःही नवऱ्याला पुरते ओळखू शकली नाही का..?? म्हणजे गेली वीस वर्ष त्यानेही बायकोने स्वतः असा प्रश्न विचारावा अशी वाटच बघितली ना..??

बरं ते जाऊद्या...

मित्र वीस वर्षांनी आयुष्यात येतो आणि तिला नवं ऊर्जा देऊन जातो.पण आख्या सिनेमा मध्ये मृणालजीनी त्यांची सोज्वळतेची प्रतिमा सांभाळण्याचा जास्त प्रयत्न केलाय की ,त्यांची ही वयक्तिक विवषताच सिनेमांमधून दाखवली आहे का..??

आणि म्हणून स्वतःचे अस्तित्वा साठी बंड पुकारलेल्या शमाने तिच्यात झालेला बदल दाखवण्यासाठी आधी मिक्याच्या गाडीचा फॉलो करते ,नंतर त्याला थांबवते आणि शेवटी एक त्यांच्या सारखीच सुंदर,सोज्वळ ..." प्यार की झप्पी. ".... देते.

आणि कॅमेरा झरकन खूपच लांब डीसटंस घेतो...? त्या भावना दाखवताना हा सीन इतका लाँग डिस्टंस घेतो की,सिनेमातल्या मिक्या आणि शमाच्या भावना नेमक्या काय असाव्यात...??

आमच्या मुलांची सोनपरी कधी कधी वाईट वागुच शकणार नाही .ही आमच्या ही मनाची पूर्ण खात्री आहे.

जो \" साहेला रे \" शमाचे ऊर्जा स्तोत्र निघाला त्याच्या सोबतची ती..." प्यार की झप्पी ".... ही तितकीच निरागस,निस्वार्थी,वासना विरहित असणारच ना....!! त्यासाठी इतका लाँग शॉट सीन ,कशासाठी ...??

अर्थातच ,असल्या शंका मृणाल जीचा आमच्या मनावर असलेला प्रभाव असल्यामुळेही असू शकतो.

का, मृणालजीनी दिग्दर्शन करताना परिवर्तनशील शमाला पूर्ण न्याय नाही दिला की..,त्यांच्या मागच्या सर्व सोज्वळ व्यक्तिरेखांना जपण्याचा प्रयत्न केलाय त्यांनाच माहीत....!!

मराठी सिनेमा प्रेमी स्त्रियांनी एकदा बघावा असा सिनेमा.

असो,त्यांच्या पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा...!!!
©® Sush.