*सहनशिलतेची खाण*
बाई नावाची जात जरी एक
तरी तिची रुपे असती अनेक,
परिस्थितीशी घेते जुळवून
संस्कारी अन् सद्गुणी लेक.
सासर- माहेर दोन्ही घरांची
दोर असते बाईच्याच हाती,
मान सन्मान, प्रेम,आपुलकीने
गुंफते घट्ट जिव्हाळ्याची नाती.
दोर असते बाईच्याच हाती,
मान सन्मान, प्रेम,आपुलकीने
गुंफते घट्ट जिव्हाळ्याची नाती.
बाईत शक्ती येते अपार
अन्यायाशी झुंजताना,
दुमदुमतो आसमंत सारा
महिमा तिचा गुंजताना.
अन्यायाशी झुंजताना,
दुमदुमतो आसमंत सारा
महिमा तिचा गुंजताना.
बनूनी ढाल सदा तत्पर
कुटुंबाच्या रक्षणासाठी,
जीवाची लावते बाजी
लेकरांच्या सुखासाठी.
कुटुंबाच्या रक्षणासाठी,
जीवाची लावते बाजी
लेकरांच्या सुखासाठी.
नसानसात जिद्द बाईच्या
यश शिखर गाठण्याची,
स्त्री मनाची आस नित्य ती
सुख समाधान वाटण्याची.
यश शिखर गाठण्याची,
स्त्री मनाची आस नित्य ती
सुख समाधान वाटण्याची.
सहनशिलतेची खाण जरी ती
पण अन्यायावर पडते भारी,
कधी चंडिका, रणरागिनी तर
कधी असे ती सोज्वळ नारी.
पण अन्यायावर पडते भारी,
कधी चंडिका, रणरागिनी तर
कधी असे ती सोज्वळ नारी.
आयुष्याच्या सागरात ती
हसतमुखाने झेलते वार,
जोडीदाराची करून सोबत
जीवन नौका करते पार.
-------------------------
हसतमुखाने झेलते वार,
जोडीदाराची करून सोबत
जीवन नौका करते पार.
-------------------------
सौ.वनिता गणेश शिंदे ©®