कल्लोळ भावनाचा

सहज सुचलं म्हणून....
6) सहज सुचलं म्हणून...........

कल्लोळ भावनाचा

कधीकधी येतो डोळ्यासमोर काळोख........

दाट पसरलेला, किर्र अंधार....

समोरचा रस्ता त्या अंधारात हरवून जातो. ........

कुठे जायचे, कसे जायचे काहीच कळत नाही.. .........

सुरु होते मग दिशाहीन भटकंती....

वाट फुटेल तिकडे जाणं.....

ठेचकाळात, धडपडत, अधांतरी चालणं.........

काय घडणार आहे, याची कल्पना नाही, कुठे थांबायचं माहिती नाही.....

फक्त चालत राहायचं आधाराशिवाय,

......नेमकं काय करायचं हेच माहिती नसताना.......

नाही चालवे तर गुदमरून जाण्याची भीती आणि रस्ता नेईल तिकडे जावे तर खचखाळगे धडपडणे आणि हरवण्याची भीती...................


अंधारच्या या बर्मुडा ट्रायंगल मध्ये अडकून पडायचं कि धडपड करत प्रकाशाच्या किरणासाठी चालत राहायचं हे मात्र सर्वस्वि चालणाऱ्याच्या सदसद्विवेक बुद्धीवर अवलंबून..............

गीतांजली सचिन.