सहज मनातलं काहीतरी..१

आयुष्याची गणितं सोडवायचीच आहेत फक्त स्वतःच्या मतांशी तडजोड न करतां किती साधेपणानं सोडवता येतील हे पहा..पद्धती वेगळ्या पण उत्तर एकच असतं..जे समाधानानं जगण्याचं गृहीतक मांडतं..


मनातल्या विचारांचं विलगीकरण करता येत नसेल तुम्हाला तर थोडं थांबा..दुसऱ्या सारखं वागायला जातांना आपलं जे काही आहे ते विसरतो आहोत ह्याची खुण गाठ नक्की बांधा.
नियमांत जगणं इतरांसारखं असावं ..पण त्यांच्या सारखंच नसावं..तुमचे संस्कार तुमची वैचारिक जडण घडण तुमचं वागणं कायमच वेगळं असणार आहे ..
तुमची ऐहीकता हीच मोजमाप धरलीत तर समाधानाचे कोणतं मोजमाप असू शकेल..? जगणं समाधानाचंच नसेल तर भौतिक श्रीमंती काय कामाची..? मानसिक स्वाथ्याशी तडजोडच फक्त ती.. कर्म करण्याची मुभा दिलीय विधात्यानं ते सत्कर्म की कुकर्म हे जेंव्हा फलप्राप्ती होईल तेंव्हाच जाणवेल..
पापभिरु असणं हे कधी कधी आपल्याच पथ्यावर पडतं सहसा दुखवायला जात नाही कुणाला आपण ..पण गृहीत धरण्याचा धोका तितकाच तीव्र असतो..
वागण्यातली एक निश्चितता आणायची असेल तर सत्या पासून पळणं हा धोका पत्करायचा नाही ..परीस्थिती कोणतीही येवो स्वतःचे मूलभूत सिद्धांत जपणं व्हावंच ..तडजोड कशाची आणि कोणत्या तत्वांशी करतो आहोत हे ही पहावंच..
दुसऱ्याला बदलण्या पेक्षा स्वतःतले बदल निश्चित करावेत..
पण या साठी आत्मसन्मान आणि स्वतःच जगणं पणाला लावू नये..जिथे गरज आहे ठाम भूमिका घ्यायची ती निश्चितच घ्यावी..

सत्यमेव जयते नानृतम् सत्येन पन्था विततो देवयानः।
येनाक्रमत् मनुष्यो ह्यात्मकामो यत्र तत् सत्यस्य परं निधानं।।
भावार्थ:
जीत सत्य की होती है असत्य की नहीं। परमात्मा का मार्ग सत्य से परे है। जिस पथ पर मनुष्य स्वयं कर्म करता है, वही सत्य का परमधाम है।
©लीना राजीव.

🎭 Series Post

View all