सगळ्याच सगळ बरोबर असत आपण चुकल्यावर...

खरचं आपण चुकतो का

विषय:- सगळ्याच सगळ बरोबर असत आपण चुकल्यावर.....                                                                खरचं आपल्याकडून काही छोटीशी चूक झाली...की सगळ्याचा लगेच ओरडा खावा लागतो की तुला ही गोष्ट करताना साधे विचारावेसे ही वाटले नाही का... मी सांगितले असते तर तू चुकला नसता असे बरेच वेळा बोलले जाते ...खरचं सगळ्याच बरोबर असते का ???? की फक्त तुमची ती चूक आणि आमचं ते बरोबर .... जेव्हा इतरांना मदत करायची वेळ येते तेव्हा सगळे जण लांबून मजा बघणार वेळेला कोणी उपयोगी पडणार नाही .....फक्त चूक की बरोबर हे सांगितले जाते... सगळ्याच्या सगळ्या गोष्टी सगळ्या बरोबर फक्त चुका ह्या आमच्याकडून होणार.....खरचं ते कधी चुकत नसतील का हो??? परत म्हंनायला होते चुकीला माफी नाही....माझ्या मते प्रत्येक चुकीतूनच माणूस पुढे जात असतो...त्याची चूकच त्याला यशाच्या शिखरावर नेऊन पोचवते.... छोट्या छोट्या संकटातून मोठ्या संकटाचे मार्ग सापडतात.... कोणतीही गोष्ट करण्या आधी ती अवघडच असते ....केल्यावरच ती सोपी होते...कारण त्यातील चुका तुम्हाला माहीत होतात... पुढचे पाऊल तुम्ही नंतर काळजीपूर्वक टाकतात..... छोट्या छोट्या गोष्टीतून मिळणारा आनंद खूप असतो हो .... बोलणाऱ्याला सगळे सोपे असते ...काम करताना जो त्रास होतो तो ज्याचा त्यालाच माहीत असतो कोणते पण काम बिना त्रासाचे होत नाही प्रत्येक कामात अडथळा हा येणारच ना तरच तुमच्या तील सर्वोत्तम बाहेर येईल ना..... तेव्हाच जगाला कळेल ना तुम्ही कोण आहात ते ..म्हणून म्हणतात एकावे ते जनाचे नी करावे मनाचे...आपल्या यशाचा मार्ग आपणच तर शोधायचा.... पटते का???                                 ©® ॲड. श्रद्धा मगर