सगळी जबाबदारी तिचीच कशी... भाग 4

Sagal tine ektinech ka karaych


सगळी जबाबदारी तिचीच कशी...भाग 4

रोज हे असं चालायचं कधी कधी रीमाला खूप रडायला यायचं. इतका सगळं करूनही कुणाचे दोन शब्द प्रेमाचे तिला मिळत नसत. प्रशांतही त्याला काम असलं तेव्हाच गोड गोड बोलायचा नाही तर तोही तिच्यावर ओरडायचा. 


बघता बघता दिवस सरकत गेले आणि रिमा पुन्हा प्रेग्नेंट झाली. यावेळी रीमाला अजिबात इच्छा नव्हती, तिला बाळ ठेवायचं नव्हतं पण प्रशांतच्या हट्टा पायी तिने बाळ स्वीकारलं, पुन्हा सगळं ते तसंच घडलं.

रीमाला दुसरा मुलगा झाला, याही वेळी रीमाच्या सासूने कुठलीच मदत केली नव्हती, त्यांनी तिला त्रास देणं सुरू केलं. आता रीमाने ठरवलं की सगळ्या कामाला बाई लावायची. कारण रीमाच्याने तेवढी दगदग होत नसे.


घर, ऑफिस, दोन दोन मुलांचं सगळं करून रीमाला एकटीलाच सगळं करायला लागायचं. तिला कुणाचीच मदत होत नव्हती, उलट तिचा त्रास वाढत जात होता. सासूबाईची टोमणे वाढत होते, हळूहळू मुलं मोठी व्हायला लागली शाळेत जायला लागली.

आता तर रीमाचे आणखी काम वाढले. त्यांचा अभ्यास घेणे, वेळच्या वेळी त्यांच्या स्कूलची संपर्क ठेवणे. अपडेट राहणे सगळ्या गोष्टी वाढत गेल्या. रीमाने कामाला बाई ठेवली. त्यातही सासूची कुजबुज सुरू होती पण रीमाने त्यांच्याकडे लक्ष दिले नव्हते. तिने घरच्या प्रत्येक कामाला बाई ठेवली, बाई येऊन सगळं काम करून जायची, संध्याकाळचा स्वयंपाक पण बाई करून जायची.

घरी आल्यानंतर रीमा तिच्या मुलांचं करून बाकीच्यांना जेवण वाढायची. बघता बघता मुलं मोठी व्हायला लागली आणि शिक्षणासाठी ती बाहेर शिकायला गेले, आता घरात फक्त रिमा, प्रशांत आणि सासू-सासरे राहायचे, मुलं सुट्ट्या मध्ये भेटायला यायचे, कधी रीमा त्यांना भेटायला जायची.

रीमाने ठरवलं आता फक्त स्वतःसाठी जगायचं, स्वतःपुरतं जगायचं.


हळूहळू दिवस सरकत गेले आणि सासर्‍यांची तब्येत खालावली, काही दिवसांनी ते हे जग सोडून गेले.


आता मात्र सासूची जास्त चिडचिड व्हायला लागली. त्यांना एकाकी वाटू लागलं होतं. आता त्यांना गरज होती ती कुणाच्या तरी आधाराची, तो आधार रीमाने दिला, रीमा आता सासुबाई सोबत स्वतःला पण वेळ देऊ लागली. रीमाने स्वतःसाठी जगण्याचा निर्णय घेतला होता.


त्यामुळे ती ऑफिस आणि घर याव्यतिरिक्त स्वतःचे छंद जोपासायला लागली. सुट्टीच्या दिवशी बाहेर वेळ घालवायची, मैत्रिनींना भेटायची. बाहेर जायचं असेल तर प्रशांत आला तर ठीक नाहीतर ठीक,ती एकटीच निघून जायची.


कधी कधी सासुबाईंना मंदिरात घेऊन जायची, त्यांच्याने तेवढं चालणं व्हायचं नाही, पण त्यांना फ्रेश वाटावं म्हणून कधी मंदिर, कधी गार्डन मध्ये घेऊन जायची.


क्रमशः

🎭 Series Post

View all