सगळं मीच म्हणून का करायचं...भाग 3 अंतिम

TI anandi Asayal havi
सगळं मीच म्हणून का करायचं...भाग 3 अंतिम

"रमा ही तुझी काय पद्धत आहे बोलण्याची? तुला माहितीये ना सगळ्यांना वेगवेगळा नाश्ता लागतो, मग तू का बनवला नाहीस?"


"यानंतर मी बनवणार नाही, माझ्याने होत नाही ज्यांना वाटलं ते बनवून घेतील स्वतः, सगळं मीच का करायचं. आठ दिवस झाले मला बरं नाहीये कुणीतरी येऊन विचारलं मला रमा काय झालं? मी तुम्हाला दिवसभर घरात वावरताना दिसते पण माझ्या आतला त्रास, माझ्या चेहऱ्यावरची थकावट यातून तुम्हाला काही जाणवत नाहीये का?

आठ दिवस झाले मोनोपॉजचा त्रास सुरू आहे मला, अशक्तपणा जाणवतोय, मन अस्थिर वाटतंय, चित्त थाऱ्यावर नसतं, तुम्ही एका शब्दाने तरी विचारलंय?
बस झालंय आता, सगळ्यांच्या आवडीनिवडी जपायला मला जमणार नाही."

रमा एका श्वासात सगळ बोलली. त्यानंतर दोन सेकंदात ती शांत झाली.

"हे बघा तुम्हा सगळ्यांना माहिती आहे मला काम करायला किती आवडतं, सगळ्यांच्या आवडीनिवडी जपायला आवडतात. मी सगळ्यांचं सगळं करते पण कधीतरी कुणीतरी येऊन मला विचारावं एवढीच माझी अपेक्षा आहे तुम्ही लोक चक्क मला गृहीतच धरता. प्रत्येक गोष्टीत रमा रमा रमा. कधीतरी कुणीतरी स्वतःची कामे स्वतः करायला शिका."


असं म्हणून रमा तिच्या खोलीत गेली. सगळे एकमेकांकडे बघू लागले.

त्यानंतर काही वेळाने सुजित खोलीत गेला आणि रमाला बाहेर घेऊन आला.


त्यानंतर सुजितने बोलायला सुरुवात केली.

"रमा आम्हा सर्वांना माफ कर, इतके वर्ष आम्ही फक्त स्वतःचा विचार करत होतो. कधीच तुझा विचार केला नाही. दिवसभर काम करून तू थकत असशील, तुलाही स्वतःसाठी वेळ हवा असेल. तुझी एक लाईफ आहे, स्पेस आहे. त्याचा कधीच विचार मनात आला नाही. एक सवय झाली होती ग तुझी रमा हे दे, रमा हे कर, सगळीकडे फक्त रमा दिसायची, तुझी सवय होऊन गेलेली आम्हाला पण यानंतर असं नाही होणार. तुला तुझा वेळ आणि तुझी स्पेस मिळेल. तुला सगळ्यांसाठी सगळं करायची काहीच गरज नाही. आम्ही सगळे तुला मदत करू. फक्त तू आनंदात रहा, तू आनंदात असलीस ना तरच सगळं घर आनंदात असेल.

घरातली कर्ती स्त्री आनंदी असेल ना तर संपूर्ण कुटुंब आनंदात असतं.


समाप्त:

घरातल्या सुनेला, बायकोला, इतर स्त्रियांना गृहीत धरू नका, तिलाही तीच मन आहे, स्पेस आहे. तिलाही तीच मत आहे हे विसरू नका. सगळं तिनेच करायचं हा अट्टाहास कशासाठी? थोडं तुम्हीही केलंत तर कुठे काय बिघडलं. तिनेच सगळं का करायचं?

🎭 Series Post

View all