साडी...

एक प्रेम कथा..
साडी....

मीरा भाजी सोलत सोलत तीची आवडती टीव्ही मालिका पाहत होती...... त्या मालिकेतील आज पर्यतची सगळी लफडी... कोण आधी कोणावर प्रेम करायचे... कोणी कोणाला आता सोडले... कोणी कोणाला कधी घटस्फोट दिला.... काही कालांतर परत त्यांनी संसार कसा सुखात केला.....हे सर्व तर त्या मालिकेच्या लेखकाला देखिल आता आठवत नसेल... पण ती सगळी लफडी तीची तोंड पाठ होती........
इतक्यात त्या सिरियल मध्ये एक सीन आला.... त्या सीनमध्ये नवरा आपल्या पत्नी साठी एक सुंदर अशी साडी ...भेट म्हणून घेऊन आला... आणि त्याने ती साडी पत्नीच्या (त्याच्याच) हातात देत म्हणाला..... सरप्राईज!.... बघ!! मी तूझ्या साठी काय आणलाय ते?.......
झाल....मीरा विचार करायला लागली माझा नवरा कधी अशी साडी मला आणून देत नाही... ..आता तिला कोण सांगणार की... नवरा बायकोला साडी घरी आणून भेट देतो. हे फक्त त्या मालिका किंव्हा चित्रपटाच खरं असते ते?..... ते काही नाही आज समीर घरी आले की सांगतेच त्यानां...नाहीतर अस करते उद्या रविवार आहे... सुट्टीच आहे त्यानां उद्या साडी खरेदीला जातेच घेऊन कशी....

संध्याकाळी समीर थकून भागून पावसात काहीसा भिजून घरी पोहचला.... नवऱ्या कडुन आपले काम कस करून घ्यायच हे बायकांना चांगलच माहिती असते.... बाहेर मस्त पैकी पाऊस सुरू होता... मीराने छान पैकी भजी बनवली व चहा सोबत समीर पुढे पेश केली....... मीरा त्याची बायको असल्याने त्याने लगेचच ताडलं की, ही भजी म्हणजे येणाऱ्या काहीतरी संकटाची चाहूल आहे.........ठीक आहे! जे असेल ते असेल नंतर बघु... आधी भजी तर खाऊ!......भजी खाता खाता समीर विचार करतच होता .....की, मीरा म्हणाली..... अहो!... उद्या रविवार आहे... तुम्हांला सुट्टी.. काय प्लान आहे उद्याचा?.....तिने पहिला सुतळी बॉम्ब टाकला.... उद्या ना!..... उद्या मस्त आख्खा दिवस इरा वरच्या कथा वाचणार..... त्या साठी मी सब्स्क्रीसन घेतलय ईराच्या कथा किती छान असतात ..... आणि प्रेम कथा तर विचारूच नको?.......हो!... माहिती आहे मला मी देखिल वाचते म्हंटल ईराच्या कथा!.... मीरा म्हणाली..
का ग? का विचारलस?...पुढच्या धमाक्याची तयारी ठेऊन त्याने विचारले... कहीं नाही तुम्हांला उद्या सुट्टीच आहे तर उद्या शॉपिंगला जाऊ... दोन तिने ठिकाणी सेलही लागलेत...
म्हंटल एखाद साड्या घेते म्हणून विचारले बाकी काहीनाही.. ..झाल ..शेवटी मीराने समीरवर अणुबॉंब टाकला....हो!... समीर साठी अणुबॉंबच होता तो..... कारण बायको बरोबर खरेदीला जाणे आणि ते देखिल साड्यांच्या..... म्हणजे एखाद्या युध्दावरच जाण्या सारखे होत त्याच्यासाठी.....तसं त्याला पैशांची अडचण नव्हती तो चांगले कमावत होता.... त्याला मीराने खरेदी करावी ह्याची देखिल अडचण नव्हती.... पण खरेदीला सोबत जाणे.... आणि ते देखिल साडीच्या इथे खरी अडचण होती.......

कारण आजपर्यंत तो लग्नाआधी तीच्या बरोबर खरेदीला गेला होता.... तेंव्हा नवीनच प्रेम होत म्हणून त्याने सहन केले होते पण आता... बाप रे!.... उद्या काय होणार ?.....नकार द्यायला तर नो चान्स... त्या गरम भजीने ...मीराने त्याला चेकमेट करून टाकले होते.... आता इतके दिवस संसार करून मीराचा स्वभाव त्याला माहिती होता... त्यामुळे उद्या खरेदीला जाण भागच होत.... नाहीतर उद्याचा पुर्ण दिवस..... घर में बर्तनो की झंकार से गूंज उठेगा।........

रात्री बेडवर समीरने काहीश्या झोपेत हळुवारपणे ...अतिशय प्रेमाने तिला स्पर्श केला..... मीराला तो नेहमीचा स्पर्श होता.......मीरा त्या कोमल स्पर्शाने जागी झाली.... ती कुशीवर समीरच्या बाजूने वळली.....आणि मस्त लाडिक स्वरात म्हणाली..... उद्या किती वाजता जाऊ खरेदीला?.....सकाळी जाऊ की संध्याकाळी?......समीरला त्या स्पर्शाच अपेक्षानूरूप उतर मिळाल म्हणुन तो धन्य झाला....तसं उद्याचे साडी खरेदी पुराण बोलता.. ऐकता... ते एकमेकांच्या मिठीत विसावले म्हणा!.....
संध्याकाळी सगळी काम उरकून मीराने समीरला साडी खरेदीला एका मस्त मोठ्या साडीच्या दुकानात नेले... या!.. या!!... साहेब...दुकान मालकांने स्वागत केले....त्याने समीरच साहेब म्हणून एकट्याचेच स्वागत केले... कारण त्याला माहीत होत... बाईने कितीही खरेदी केली तरी पैसे साहेबच देणार आहे.....अरे मोहन!... बाईसाहेबांना साड्या दाखव......मोहनने साड्या दाखवायला सुरवात केली.... त्या मोहनचा साडी काढुन दाखवण्याचा स्पीड पाहून..समीर थक्क झाला.... त्याला पाहून समीरला महाभारतातील दुशासन आठवला.... जो द्रौपदीची साडी ओढुन थकला होता.... पण मोहन (श्रीकृष्ण) साडी पुरवून थकला नव्हता.........काय खाऊन येत असेल हा माणूस.? ...मीराने इतक्या साड्या दाखवायला संगितले तरी त्याच्या चेहऱ्यावर थकवा किंवा नारजीची एक रेष नाही.......उलट स्पुर्ती.... ही बघा बाईसाहेब... आताच मार्केट मधे आलीय..... ही पहा बाई साहेब... ही एकदम लेट्स्ट डिझाइन.... अशी साडी सनी लीयोनीने तीच्या पहिल्या चित्रपटात नेसली होती.....सनी लिओनी साडी पण घालते ही समीरसाठी नवीन माहिती होती..... आता तर समीरच्या मनात मोहन विषयी आदर आणखीनच वाढला......सरते शेवटी मीराने दोन साड्या पसंत केल्या..... युध्द समाप्तीचा शंखनाद झाल्यावर सैनिकांची जी भावना होते... तशी समीरची झाली...... मात्र युद्ध अजुन संपले नव्हते... अहो!... यातील कोणती घेऊ.?.....अग घे कोणतीही... तुला आवडेल ती!... अहो अस काय?... सांगा ना?...नशीब त्याच्याकडे ही. आणि ती. असे दोनच ऑप्शन होते.... त्याने त्यातले ती. लॉक केली.... तशी मीरा म्हणाली मला तर वाटले तुम्ही... ही. सांगाल... अग मग ही. घे!..... अहो पण तुम्हांला ती. आवडलीय ना? ....कोणती घ्यायची ते आधी विचारायचे.... आणि स्वतः दुसरी पसंत आहे अस सांगायचे.......ही मीराची सवय तो जाणून होता....
...समीरने दोन्ही ऑप्शन सांगितल्याने ही.आणि ती. मध्ये ..दोघांनीही बरीच गहन चर्चा झाली... या गहन चर्चेत परकीय शक्ती प्रमाणे मोहन लुडबूड करत होता... ....शेवटी या गहन चर्चेत मीराने असा निर्णय घेतला की, या साड्या कॉलिटीच्या मानाने फार महाग आहेत... आपण सेल मध्ये जाऊन साडी घेऊ......बाप रे!... आता काय करायच?...समीर समोर मोठा प्रश्न निर्माण झाला..... त्याने मोहन कडे पाहिले... मोहनने मीराच हे बोलणे ऐकले तरी.... त्याच्या चेहऱ्यावर ना चिंतेची ना नाराजीची रेष...... बाईसाहेब तुम्ही आधी साडी तर पसंत करा.. मग किमतीचे बघु.... मोहन आत्मविश्वासाने म्हणाला....शेवटी बराच भवताल करून समीरला आवडलेली साडी मीराने घेतली... ती घेतांना मीरा तिला पसंत असलेली साडी कडे देखील वारंवर पाहत होती......
समीरने एकदाचा सुटकारा सोडला..... बिल भरायला गेल्यावर समीरने आठवणीने मोहनचा नंबर घेतला... आणि त्याच्या कामाचे मनापासुन कौतुक केले......
अहो चला लवकर!.. सात वाजले... इतर थोडी खरेदी करायची आहे.... आठ वाजेपर्यंत घरी जायला हवं.... तुम्हांला काल संगितले होते ना!.... तन्मय ने बायको साठी आणलेली साडीचा बॉक्स उघडणार तेव्हड्यात एपिसोड संपला म्हणून.... आज ती साडी पहायला मिळेल...
नशीब आठ वाजता एपिसोड होता.... नाहीतर ही शिक्षा अजुन.. किती पुरली असती कोणास ठाऊक.....समीर स्वतःशीच....
मीरा आणि समीर बरोबर आठ ला पाच कमी असताना घरी पोहचले... घराचे दार उघडून तीने पहिला टीव्ही चालु केला... व सोफ्यावर बसली.... समीरला माहिती होत आता साडे आठ शिवाय ती हलणार देखिल नाही....... तिने आजचा एपिसोड समीरलाही पहायला सांगितला... त्याला त्या मालिकेत काडीचा रस नव्हता... पण तीच्यासाठी म्हणून बसला..... एपिसोड मधील साडीचा कलर पाहुन.... ती म्हणाली.... अरे!.. हा तर माझा फेवरेट कलर... अहो!... मी पसंत केलेली ती दुसरी साडी अशीच होती ना?.......ओ!... तुम्हांला ही. पसंत आली म्हणून मी ती. घेतली नाही.......आणि हा तन्मय आपल्या बायको साठी.कायम नवनवीन साड्या घेऊन येतो... तुम्ही एकदा तरी आणली आहे का हो माझ्या साठीसाडी... काहीश्या नाराजीने मीरा म्हणाली.... पाच सहा मिनिटांनी जाहिरात आली.... इतक्यात दरावरची बेल वाजली.... समीरने दरवाजा उघडला..... व पुन्हा दरवाजा लाऊन हॉल मधे आला... मीराने टीव्हीकडे पाहतच विचारल... कोण होत?... सरप्राईज!.......हे बघ मी तूझ्यासाठी काय आणले आहे?.... समीरच्या आवाजाने मीरा दचकली.... तिने समीरकडे पाहिले... समीरने गुडघ्यावर बसुन तीच्या समोर.. एक बॉक्स धरला... अगदी तीच्या टीव्हीतल्या तन्मय प्रमाणे... ...मीराने बॉक्स उघडून पाहिले तर काय आश्चर्य.... तिने दुकानात पसंत केलेली तीच साडी होती त्यांत..... तिने आश्चर्याने समीरकडे पाहून विचारले..... हाऊ.????...अग त्यांत काय मोठ...तु माझ्या साठी तूझ्या पसंतीची साडी घेतली नाहीस...... मी तूझ्या साठी तूझ्या पसंतीची साडी आणली इतकच..... हाऊ?... मीराने पुन्हा आश्चर्याने विचारले......अग काही नाही!... मला माहिती होत ती. साडी तुला आवडली आहे... फक्त माझ्यासाठी म्हणून तु ही. साडी घेतलीस.....मी जेव्हा साडीच बिल द्यायला गेलो तेंव्हा दोन्ही साड्यांचे पैसे दिले..... त्या मोहनला आपल्या घरचा पत्ता दिला आणि आठ वाजेपर्यंत ही साडी पार्सल पाठवायला सांगीतली........... औ!.... माझ पिल्लु!..... तुमची हीच स्टाईल मला आवडली होती... म्हणुन तर मी तुमच्याशी लग्न केले...... अस लाडीक पणे बोलुन तीन समीरला आलिंगन दिल...... मालिकेतील प्रसंग आज प्रत्यक्ष तीच्या सोबत घडत होता म्हणून तीन... आजचा दिवस मालिकेकडे दुर्लक्ष केले.....

लेखन: चंद्रकांत घाटाळ
7350131480