साबुदाणा वडे

साबुदाणा वडे

उपवास स्पेशल

साबुदाणा वडे

साहित्य - 

एक वाटी साबुदाणा, दोन मध्यम आकाराचे बटाटे, 100 ग्रॅम शेंगदाणे, चार ते पाच काळी मिरी, तीन, चार हिरव्या मिरच्या, चवीपुरते मीठ व थोडी साखर, तळण्यासाठी तेल.

कृती - 

साबुदाणा पाच ते सहा तास भिजू द्या. बटाटे उकडून घ्या. हिरवी मिरची व काळी मिरी मिक्सरवर थोडी जाडसर काढून घ्या. शेंगदाणे भाजून त्याचा कूट तयार करा. उकडलेले बटाटे कुस्करून घ्या. आता भिजवलेल्या साबुदाण्यात उकडलेल्या बटाट्याचा लगदा, शेंगदाणा कूट, बारीक केलेली हिरवी मिरची, चवीनुसार मीठ व थोडी साखर घालून चांगले मिक्स करून घ्या. व हातावर छोटे छोटे वडे करून तेलातून तळून घ्या.

साबुदाणा वडे थोडे जास्त करायचे असल्यास वरील प्रमाणाच्या दुप्पट प्रमाण घेऊनही तुम्ही करू शकता. साबुदाणा वडे लहानापासून तर मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडतात.


उपवासाची दह्याची कढी

साहित्य -

दही, शेंगदाणा कूट, जिरे, हिरवी मिरची, चवीप्रमाणे मीठ व थोडी साखर.

कृती -

दही चांगले घुसळून घ्या, त्यात बेसनाच्या ऐवजी दाण्याचा बारीक कूट घालून चांगले मिक्स करून घ्या. गॅसवर जाड बुडाच्या पातेल्यात छोट्या चमचाभर तूप टाकून मिरची व जिरे घाला. जिरे तडतडल्यावर त्यात दाण्याचा कूट घालून मिक्स केलेले दही घाला. चवीनुसार मीठ व थोडी साखर घालून दोन तीन उकळ्या येऊ द्या.

उपवासाची ही कढी खूप छान होते.

चला तर मग वाट कसली बघतायं?

करा की मग रेसिपीला सुरुवात.

मस्त खा.

स्वस्थ रहा.

धन्यवाद.

सौ. रेखा देशमुख