संघर्ष एक कथा -भाग ३

In this part mangesh visited his home

                                                  संघर्ष  एक कथा -भाग ३

चार पाच तसंच प्रवास झाल्यावर लाल पिवळी S T मंगेश ला ज्या शहरात जायचे होते तिथे पोहचली . हातात मोठी पत्र्याची ट्रँक घेऊन मंगेश बस मधून खाली उतरला . खाली उतरल्या उतरल्या त्याला लगेच जाणवले कि हे शहर जिल्हयाचे असले तरीही मुंबई पेक्षा फार वेगळे आहे . मुंबई त लोक नुसती धावत पळत असतात . इथे मात्र चित्र तसे दिसत नव्हते . मंगेश ला मनोमन बरे वाटले . मुंबईत तो राहून आला होता आणि त्याला तिकडे फार काही आवडले नव्हते . ऑफर लेटर मध्ये दिलेल्या पत्त्यावर मंगेश विचारत विचारत चालत चालत पोहचला .

बाहेरच्या वॉचमन ला हे लेटर दाखवले . ते लेटर वाचल्यावर त्या वॉचमन ने त्याला कोणाला आणि कुठे जाऊन भेटावे ते सांगितले . मंगेश त्या च्या साहेबांना जाऊन भेटला . साहेबांनी त्याचे कागद पत्र  पडताळून पहिली आणि त्याला म्हणाले

" तुझी जॉइनिंग आपण आज पासूनच धरू कारण आज दिवस संपलेला नाही . म्हणजे आज पासून तुझा पगार चालू . मंगेश ला खूप आनंद झाला . पण  साहेबांनि सांगितले कि तुझी काम करण्याची जागा  इथे नसेल. तुला आठ दिवसांचे ट्रेनिन्ग मिळेल ते इथे करावे लागेल आणि मग तुझी काम करण्याची जागा तुला देण्यात येईल ."

मंगेश " चालेल सर "

साहेब "  मि . मंगेश इकडे राहण्याचो सोय आहे का ?"

मंगेश " नाही ना सर , मी या शहरात पाहल्यांदाच आलोय "

साहेब " तुझ्या आडनावाचे एक सर आमच्या दुसऱ्या डिपार्टमेंट ला आहेत . तुमची आणि त्यांची गाठ घालून देतो "

मंगेश " चालेल सर .. धन्यवाद सर .

साहेबांना त्या डिपार्टमेंट च्या त्या सरांना फोन लावून दिला आणि मंगेश ला त्या डिपार्टमेंट ला जायला सांगितले .

साहेबांना लगेच कळलं कि मंगेश एक चांगला मुलगा आहे . सिन्सिअर आहे त्यामुळे एक्सट्रा मदत केली होती .

मंगेश पुन्हा त्याची ट्रँक उचलून त्या डिपार्टमेंट ला  जायला निघाला . मनातल्या मनात आज तो खूप खुश होता . आज नोकरी लागली . आज पासून तो सरकारी माणूस होता. काल पर्यंत हा जॉब मिळतो कि नाही याची गॅरंटी नव्हती आणि आता तो एक प्रकारे रुजू झाल्या सारखाच होता . शिवाय गावातून कोणाची ओळख नाही मिळाली तर इकडे साहेबांनी डायरेक्ट जातभाई साहेबाची गाठ घालून दिली , म्हणतात ना " जिसका कोई नहीं होता उसका खुदा होता है । "

त्या साहेबांनी मंगेश ची राहण्याची सोय लावून दिली . त्याच्या खाण्या पिण्याची सोय लावून दिली . मंगेश ने मन लावून ट्रेनिन्ग पूर्ण केले . आणि त्याला त्याची हक्काची टेबल खुर्ची मिळाली . सर्वात पहिले त्याने घरी पत्र लिहुन एकदाची सर्व माहिती कळवली .थोड्याच दिवसात मंगेश ने एक रूम भाड्याने घेतली . रोज सकाळी लवकर उठून स्वतःचा डबा स्वतः बनवायचा . ते हि स्टोव्ह वर तेव्हा आता सारखे गॅस नव्हते . त्यातलाच थोडा नाश्ता म्हणून खायचा आणि मग ऑफिस ला जायचं , ६ तास ऑफिस च काम मन लावून करायचं मग पुन्हा रूम वर यायचा आणि मग कपडे धुवायचे, रात्रीचे जेवण करायचे . येतां येता सामान आणायच . घर आणि ऑफिस असा एकट्याचा संसार सुरु झाला होता . कधी कधी तर कंटाळा आला तर नुसता चहा पाव खाऊन दिवस काढायचा . हॉटेल चा चहा सुद्धा परवडणार नव्हता . पैसे साठवायचे होते. घरी मनी ऑर्डर पाठवायची होती . अशी  ढीगभर स्वप्न उराशी बाळगून मंगेश जगत होता . कधी कधी खूप एकटं एकटं हि वाटायचं . पण करणार काय ?

चांगली नोकरी मिळाली पाहिजे , चांगलं घर घेतलं पाहिजे , चांगला पगार मिळाला पाहिजे , चांगलं दिसलं पाहिजे , चांगलं वागलं पाहिजे ,चांगला शिकलेला पाहिजे , कमी बोलला तर अबोल , जास्त बोलला तर आगाऊ,अशा आणि अनेक अपेक्षा एका मुला कडून या समाजाच्या   असतात . प्रत्येकाची हि अपेक्षा जो पूर्ण करतो तो मुलगा मोस्ट एलिजिबल बॅचलर असतो . त्यालाच  मुलगी द्यायला सर्व जण तयार होतात .  .

बोल बोलता मंगेश ला एक महिना पूर्ण झाला आणि त्याला त्याचा हक्काचा पगार मिळाला . पहिला पगार घेताना त्याला काय आनंद झाला काय सांगू . मंगेश ने ताबडतोब किंवा पाहिलं काम काय केले असेल माहितेय . त्याने सर्वात पहिला मनी ऑर्डर करून घरी आई बाबांना पाठवली . सोबत एक पत्र लिहले . त्याचे एकदाचे रुटीन सांगितले , खुशाली कळवली . बाबांना खोकल्यावर औषध घघ्यायला सांगितले . आई ला तिच्यासाठी एक नवी साडी  घ्यायला सांगितली . एक दोन महिन्यांनी येईन असेही कळवले .

गावात एक मिठाई चे दुकान होते त्या दुकानातून पेढे विकत घेतले आणि मंदिरात गेला . बराच वेळ एकांतात मंदिरात बसून मन शांत झाले . आणि मग त्या साहेबांना भेटून पेढे दिले . त्या त्याचं आडनाव असलेल्या सरांशी तर चांगलीच ओळख झाली होती . त्यांना भेटून पेढे दिले आणि मग त्याच्या रूम वर आला . रूम वर आज त्याला फार एकटं वाटत होत . कस असत ना माणसाला आनंद , दुःख साजरे करायला जोडीदार हवा असतो . मग तो तो मित्र असो व नातेवाईक पण कोणी तरी हवा असतो .

पुढे झालं असे मंगेश सारखाच कोणीतरी नवीन मुलगा जॉईन करायला आला होता . मागच्या वेळे सारखेच तो  साहेबांना भेटला आणि यावेळी साहेबांनी त्या नवीन मुलाची गाठ मंगेश ला घालून दिली

 साहेब " मंगेश  हा बघ तुमच्याच गावचा मुलगा आहे तो हि आज पासून रुजू होणार आहे . "

मंगेश त्याला भेटायला इतक्या आतुरतेने बाहेर आला . बघतो तर मनोहर . त्यांच्याच गावाचा मुलगा . काय आनंद झाला . आणि मनोहर ला अजिबातच माहित नव्हते कि मंगेश इकडे आहे , काय अजिब योगायोग होता . चला म्हणजे आता मंगेश ला त्याचा सध्याचा तरी जोडीदार मिळाला  होता . मनोहर ला तर बरेच झालं . त्याची पण राहायची  सोय कुठे होती ?

मंगेश आणि मनोहर दोघे रूम पार्टनर झाले . दोघे मिळून जेवण करायचे , गप्पा मारायचे , फिरायला जायचे , मनोहर उत्तम स्वयंपाकी होता . आमटी आणि भाजी तर त्याच्या हाताची खाल्ली तर एखाद्या  बाईला  पण लाज वाटेल इतकी छान करायचा .

मनोहर च्या येण्याने मंगेश ची आणि मंगेश च्या असण्याने मनोहरची चांगलीच मज्जा झाली . आता तर कधी कधी ते दोघे एखादा सिनेमा बघायला सुद्धा जायचे .

एकंदरीत दोघे मिळून घरातील काम करायचे , कधी हा जेवण करायचा , कधी तो करायचा , मग दोघे मिळून ऑफिस  ला जायचे . संध्याकाळी परत घरी आल्यावर जेवण बनवायचे . छान गट्टी जमली त्यांची . दोघांचं थोड्या फार फरकाने वय पण सेम होत . गाव सेम होत , आणि आता स्वप्न पण सेम होती . आपण असं म्हणू शकतो मंगेश च्या आयुष्यातील हा सुवर्ण काळ होता .

गावी आई वडील पण खुश होते. मुलगा दार महिन्याला मनी ऑर्डर पाठवतो , पत्र लिहतो , सरकारी नोकरी मिळाल्याने आई वडिलांचे नाव पण गावात रोशन झाले होते . मंगेश च्या घराची परिस्थिती थोडी बदलत होती . मंगेश ला छान स्थळं येऊ लागली होती .

मंगेश दोन एक महिन्यात घरी अल्ला नव्हता . त्याने पत्रातून सांगितले होते कि तो दोन महिन्यांनी येईल पण त्याला यायला जमले नाही . लगेच रजा नको घ्यायला म्हणून थांबला होता . पण इकडे म्हातारा म्हातारी ला चैन पडेना . दोघेही त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली असायची . पैसे नको रे बाळा तू ये भेटायला आम्ही दोघे आता म्हातारे झालोय . कधी देवाचं आमंत्रण येईन याचा नेम नाही असे पत्र शेवटी  बाबांनी त्याला पाठवले .

बाबांचे असे पत्र वाचल्यावर मंगेश ला चैन पडेना .. आणि हा महिना संपला कि गावी जायचं ठरवलं .

बोल बोलता ४ महिने झाले . चार महिन्यानंतर मंगेश ने सुट्टी टाकली आणि  निघाला . गाडीत बसल्या बसल्या गावी गेल्यावर काय काय काम करायची याचा आराखडा तयार करत होता . बाबांना दवाखान्यात न्यायाचे . दीक्षित गुरुजींचे पैसे द्यायचे . मनातल्या मनात मंगेश विचार करत होता पगार मिळतो किती , त्यात खोलीचे भाडे, जिन्नस , मनी  ऑर्डर , या मधेच अर्धे पैसे जातात . पैसे कसे साठवायचे . कुठे कमी करू ? अश्या विचार करत करत तो गावी पोहचला . ते अल्मोस्ट धावत धावत नदी पार करून पहिला आधी घरी गेला . बाबा ओसरीवर आडवे पडलेले पण लक्ष ररस्त्याकडे लावून बसलेले .

लांबूनच त्यांना पुसतच मंगेश दिसला . आणि बाबा उठून बसले  " मंगेश आला ग "असे ओरडायला लागले .

आई ने आरतीचे ताट आणले . भाकरीचा तुकडा त्यांच्यावरून ओवाळून टाकला .

त्या दिवशी मंगेश च्या आई ने घरी दिवाळी साजरी केली . मंगेश च्य आवडीचे पदार्थ केले .त्याला किती बारीक झालेस रे ? खातोस कि नाही ? करून एका दिवसात तिला त्याला चार महिन्याचं भरवायच होत .जेवल्यावर गप्पा मारून झाल्या मग थोडा वेळ सर्व जण झोपले . आज बाबा कितीतरी दिवसांनी झोपले . शांत झोपले. नाहीतर मंगेश च्या आठवणीने जो टूकळा घेतला होता ते त्यांची झोपच गेली होती .

🎭 Series Post

View all