आपण लग्नानंतर तुझ्या आईवडिलांसोबत रहायचेय का? मी तुला आधीच सांगितले होते की आपले वेगळे घर हवे." साधना म्हणाली.
आकाश तिला समजावण्याच्या सुरात बोलू लागला....
"तू मुलगी आहेस साधना...... आपली मुलगी लग्न करून परक्याच्या घरी नांदायला जाणार आहे याची जाणीव आईवडिलांना आधीच असते. मी मुलगी आणि मुलगा यांच्यात तुलना करत नाहीयेय. पण काही गोष्टी आहेत आणि त्या तश्याच्या तश्या स्वीकाराव्याच लागतात.
विरोध करणं सगळीकडेच कामाला येत नाही. मी असे म्हणत नाही की, तू तुझ्या आईवडिलांची काळजी करणे सोडून दे. मीही घेईन त्यांची काळजी. मदत करेन त्यांना" मी पण त्यांना मुलाप्रमाणेच जपेन....
"मदत फक्त पैश्यांचीच असते का रे? मानसिक आधार पण हवा असतो माणसाला. वेळ काही सांगून येत नाही. उद्या काही कमी जास्त झाले तर कोण असेल त्यांना मदत करायला?" साधना म्हणाली..
"पटतंय मला तुझं. पण तूही मला समजून घे. तू तुझ्या आईवडिलांना सोडून येणार आहेस म्हणून मीही माझ्या आईवडिलांना सोडून वेगळे रहावे हे योग्य आहे का? आकाश म्हणाला..
साधना मी समजू शकतो तुला राजाराणीचा संसार हवाय. तुझ्यासोबतचा एकांत मलाही हवा आहे पण, जबाबदारी टाळून मिळालेल्या सुखाच्या मागे एक जखम असते. ही जखम कधी ना कधी उघडी पडतेच.
माझ्या आई- वडिलांनी खूप कष्टाने आता हे दिसतंय ते घर उभं केल आहे का तर माझ्यासाठी, माझ्या भविष्यासाठी आणि मी त्यांचे ते कष्ट असे वाया घालवायचे का सांग तू.... मी हे घर सोडून तुझ्याबरोबर दुसरीकडे कसं जाणार .... आई – बाबांनी आता मला नोकरी चांगली आहे म्हणून ह्या सगळ्या सुख- सोयींचा उपभोग घ्यावा आणि बसून आराम करावा हि माझी इच्छा आहे....
तुझ्या घरी पहिल्यापासूनच श्रीमंती आहे पण माझ्या घरी मी लहानपणापासून आई – बाबांचे कष्ट बघितले आहेत. तू पहिल्यापासूनचं लाडात वाढलेली आहेस, तुला पाहिजे ते पाहिजे तेव्हा मिळत गेलं आहे... पण माझ्या मला लहानपणी हवं असणार्या दोनशे रुपयाच्या घड्याळासाठी बाबा दोन महिने काटकसर करत होते.
.
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत – साधनाला आकाशचं म्हणण पटत का ते......)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा