साथ आपली शतजन्माची भाग - ३

नि:स्वार्थीपणाने केलेल प्रेम उशीरा का होईना पुढ्यात मिळते.

©®प्रज्ञा बो-हाडे

साथ आपली शतजन्माची भाग - ३


घरातले आणि रीया थोड्या दिवसांनी शांत झाल्यावर प्रणवची शोध मोहिम पुन्हा सुरु झाली. रीया झाल्या प्रकारने खूपच दुखावली गेली होती. ती काॅलेजमध्ये कोणाशीच बोलत नाही. असे ही मित्राकडून समजले.
इकडे विजय आणि शंतनू मात्र रीयाला सोडून नविन मुलीला फसवण्याची बेट लावून त्या नविन मुलीला स्वत:कडे खेचण्याचा प्रयत्न करु लागले.

प्रणव : या सगळ्यांना चांगलीच अद्दल घडवायला हवी. कोणी अॅक्शन घेत नाही म्हणून वाट्टेल ते करण्याच यांच धाडस होत आहे.

प्रवणचा मित्र ( रीयाच्या काॅलेजमधला) : बरोबर आहे तुझं. आम्ही सुद्धा काहीच करु शकलो नाही.

प्रणव : पुरषांसारखे पुरुष असून गप्प राहण्याची भूमिका बजावतात. एकदा पण अन्याया विरुद्ध आवाज उठवावा नाही वाटले का?

आपला मित्र घाबरुन जावून हाताला घाम सुटला असल्याचे प्रणवच्या लक्षात आले. प्रणवने त्याच क्षणी बोलणे बंद करुन मित्रा जवळ वेगळा विषय काढायला सुरवात केली.


मित्र शांत झाल्यावर आपण दोघे मिळून प्रिन्सिपल कडे तक्रार करु असे सांगितले. मित्र सुटकेचा थोडा नि:श्वास टाकत प्रणवच्या होकारात होकार मिळवू लागला.
दोघेही ठरवतात, युनिटी करुन प्रिन्सिपलच्या केबिन मध्ये जावून विजय आणि शंतनूच्या प्लॅनचा पडदा पाडायचा. हि बातमी कानी येताच सर्वजण प्रणवला सपोर्ट करतात. प्रिन्सिपलला झालेला प्रकार निंदात्मक वाटतो. ताबडतोब विजय आणि शंतनूला हजर करण्याचा आदेश देतात.
विजय आणि शंतनू दोघेही कावरे-बावरे होतात. त्यांना वाटणारी भिती खरी ठरते. काॅलेजमधून दोघांनाही काढण्यात येते.


या दिवसांत रीयाला मात्र तणावमुक्त होण्याकरता दुस-या शहरात काॅलेजला सुट्टी घेवून विश्रांती करता घरचे नातेवाईकांकडे घेवून जातात. काॅलेजमध्ये आजारी असल्याची चिठ्ठी लिहून देतात. घडलेल्या प्रकाराचे सत्य रीयाच्या घरी महितच नव्हते.


रीया आता पूर्णपणे बरी आहे, तिला घरी घेवून जाण्यात काहीच हरकत नाही. हे लक्षात येताच, रीयाला घरी घेवून आले. रीया काॅलेजला येताच, मैत्रिणींनी तिच्या भोवती गराडा घातला.
सगळ्याजणी रीयाच कौतुक करत होत्या. केवळ तुझ्या मित्रामुळे आज आम्ही काॅलेजमध्ये मोकळा श्वास घेत आहोत असे आवर्जून सांगितले.
कोणता मित्र? काय झाले? रीयाला पडणा-या प्रश्नांना कोणी उत्तर देईल अस वाटत नव्हते. कारण सर्वांना वाटायचे, एवढी मोठी गोष्ट रीयाला माहितच असणार ना?
रीयाने विचारलेल्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत फक्त रीयाचे अभिनंदन करत होत्या.


रीयाची नजर प्रणवच्या मित्राकडे जाते. तो हाताच्या ईशा-याने रीयाला बोलवत होता. रीया आजूबाजूला जमलेली गर्दी दूर सारत प्रणवच्या मित्रा जवळ गेली. त्याने प्रणवने काॅलेजला येवून विजय आणि शंतनूची माहिती कशी काढली इथपासून काॅलेज च्या प्रिन्सिपल जवळ मांडलेल मत, विजय आणि शंतनूला काॅलेज मधून काढून टाकले. ह्या बाबत तंतोतंत माहिती दिली.


प्रणवचा एवढा रागराग केला तरीही त्याचे आपल्यावर असणारे प्रेम कधीच कमी झाले नव्हते याची प्रचिती रीयाला आली. एवढ्या वर्षांचा अबोला असूनही प्रणव आपल्यावर प्रेम करत राहिला. आपल्यावर येण संकट त्याने स्वत: आपल्या अंगावर घेतले. माझीच चूक झाली. मी अस वागायला नको होत प्रणवशी.


कोणत्या तोंडाने मी त्याची माफी मागू. असे विचार रीयाच्या मनात येत होते.


रीया आता आपलही प्रणव वर प्रेम आहे याची कबुली प्रणवला देईल का?
तेरा साथ हो तो
मुझे किस बात का गम
गिर जाऐ कभी हम
संभाल पाओंगे ना तुम....
भूल हुई हैं हमसे
जो तुमको ना समज सके
देरी से समज गऐ
अब तो हमारी बाहे थांबलो.....


रीयाच्या मनातल्या ह्या भावना वास्तवात उतरतील का दोघांच्या प्रेमाचा गुलकंद बहरले का? पाहुया अंतिम भागात.

क्रमशः

🎭 Series Post

View all