साथ आपली शतजन्माची भाग - २

नि:स्वार्थी प्रेम उशीरा का होईना पुढ्यात येते.

©®प्रज्ञा बो-हाडे

साथ आपली शतजन्माची भाग - २

प्रणवने आपल्याला धोका दिला. आता मी देखील त्याच्यापेक्षा चांगल्या मुलाच्या प्रेमात पडून त्याच्याशी लग्नगाठ बांधते की नाही. ते पाहाच आता. रीयाचा निश्चिय पक्का झाला.
रीयाच्या काॅलेजमध्ये लकी बाॅईज नावाचा ग्रुप होता. दिसायला रुबाबदार, डॅशिंग मुले त्यात सामिल होती. एकदा त्या ग्रुपच्या मुलांमध्ये रीयाला फसवून तिच्याशी प्रेमाच खोट नाटक करायच अशी बेट लावण्यात आली. जो हि बेट जिंकेल त्याला दहा हजार रोख रक्काम हाती देणार.
विजय आणि शंतनू दोघेजण बेट जिंकण्याकरता वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करु लागले. इकडे रीया मुलगा शोधण्याच्या प्रयत्नात होती. तिला समोरुन विजय आणि शंतनू आपल्या प्रेमाचे दिवाने झाले अश्या खोट्या गैरसमजूतीत होती.


रीयाला कोणाला चाॅईस कराव? हा प्रश्न होता. विजय बाॅडी बिल्डर, उंचपुरा तर शंतनू चाॅकलेट बाॅय. त्याच्या डोळ्यावर चढवलेल्या गाॅगल मुळे तो आवडायला लागला होता. रीयाच माप शंतनू कडे धाव घेत होते. याची नकळत चाहूल विजयला लागली. स्वत:हून माघार घेतलेली बरी असे विजयने ठरवले. रीयाने जर खरच शंतनूवर प्रेम केल तर आपण लावलेली बेट हरु शकतो. मित्राच्या मदतीने शंतनू प्रेमाच नाटक करतोय हे रीया पर्यंत पोहचवायला हव.


सत्य कळल की रीया शंतनूवर चिडेल आणि लावलेली बेट कोणीच न जिंकल्यामुळे दहा हजार मिळण्याचा मुद्दा उपस्थित होणारच नाही. मित्रांच्या मदतीने विजयने प्रेमाचे खोट नाटक असल्याची बातमी रीया पर्यंत पोहचते. त्या दिवशी रीया ओट्यावर शून्यात नजर लावून बसली होती. प्रणवने ते तिथून जाताना पाहिले. रीयाला विचाराव तरी कस? काय झाले ते.
रीयाची अचानक नजर प्रणव वर गेल्याने ती तडक उठून आत निघून जाते. रीया काॅलेजला गेल्यावर प्रणव रीयच्या घरी जावून घरी काही समस्या आहे का? हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. तशी काही चिन्ह दिसत नसल्याचे निर्दशनास आले होते.


उलट रीयाच गप्प असते घरात. काहीच बोलत नाही या गोष्टी घरच्यांकडून समजतात. काॅलेजमध्ये कोणीतरी त्रास दिला असावा याचा अंदाज घेवून प्रणव रीयाच्या काॅलेजमध्ये चौकशी करतो.
चौकशी दरम्यान विजय आणि शंतनू मध्ये रीयाला प्रेमाच्या जाळ्यात फसवण्याची बेट बाबत खुलासा होतो. ते दोघेही रीयाला त्रास देतात. याचा संताप प्रणवला होत होता. रागाने त्याचा चेहरा लाल झाला होता. आत्ता जावून त्या शंतनूच्या कानाखाली द्यावी. आणि रीयाची माफी मागायला लावावी अस वाटतय.


प्रणव रीयाच्या काॅलेममध्ये स्वत:चे काॅलेज बुडवून येवू लागला. या गोष्टीच्या तळापर्यंत जाण्याचा तो प्रयत्न करु लागला. रीयाच्या काॅलेजमध्ये प्रणव आता सर्वांनाच ओळखीचा झाला होता. रीयाला हि गोष्ट कळताच. घरी आल्यावर प्रणवच्या घरच्यांना चांगलीच खडसावू लागली.

रीया : माणसान स्वत:पुरताच करावा. जास्त महान बनण्याची गरज नाही. मी स्वत: सक्षम आहे स्वत:ला सावरायला.

प्रणव : ऐक जरा, शांत हो. तुझी फसवणूक केली जाते. आपण जरा बाहेर जावून बोलूया का?

रीया : मला काही बोलायचे नाही. तू फक्त माझ्या काॅलेज मध्ये यायच नाही.

प्रणवच्या घरचे रीया निघून गेल्यावर विचारु लागले. काय झाले? रीया अशी वैतागलेली का असते नेहमी. प्रणव घरच्यांची समजूत काढतो. फारस काही नाही. तिच्या मैत्रिणी तिला फसवून सहलीला जाण्याचा प्लॅन करत आहे. ते मला माझ्या मित्राकडून समजले. कि जो रीयाच्या काॅलेजमध्ये आहे.


इतकच ना.. मग यात चिडण्यासारख काय आहे.

प्रणव : जावू द्या, नका लक्ष देवू तुम्ही. मी पाहतो.

प्रणवच्या घरचे : तू तिला आपलेपणाने सांगायला जातो. ती तुझा तिरस्कार करते. आता तरी सावर नको करु एवढ प्रेम तिच्यावर. आता बहुतेक इतक्या वर्षाचा विसर पडला आहे. तिचं नसेल राहिल प्रेम तुझ्यावर.


घरच्यांच ऐकून प्रणव रीयाला विसरु शकेल का? की रीयाला खोट्या प्रेमाच्या नाटकातून बाहेर काढेल? पाहूया पुढच्या भागात.

क्रमशः

🎭 Series Post

View all