साथ आपली शतजन्माची भाग - ४

नि:स्वार्थीपणाने केलेल प्रेम उशीरा का होईना पुढ्यात येते.

©®प्रज्ञा बो-हाडे

साथ आपली शतजन्माची भाग - ४


रीया घरी येते ती धापा टाकत. कधी एकदा प्रणवला जावून भेटते असे वाटत होते. नि:स्वार्थीपणे कोणी एवढ प्रेम कस करु शकत. हे प्रणवच्या तोंडून ऐकायचे आहे. स्वत:च्या घरी न जाता रीया प्रणवच्या जिन्याच्या पाय-या चढायला लागते. हे दृश्य पाहून बाहेर उभी असलेली रीयाची आई हाक मारत असते.
रीया आईला आले जरा थांब तू अस म्हणून प्रणवच्या घरचा दरवाजा ठोठावते. आतून आवाज येतो. कोण आहे, जरा थांबा. किती मोठ्याने वाजवताय.
दरवाजा उघडताच प्रणवची आई उभी असते. प्रणव सोफ्यावर बसून पाणी पित असतो. कधी न बोलणारी रीया आज आपल्या घरी आलेली पाहून प्रणव अंगावरच ग्लासातले पाणी सांडून घेतो.

रीया:प्रणवचा हात धरुन मला तुझ्याशी महत्वाच बोलायच. असे म्हणत घराच्या बाहेर सर्वांसमोर घेवून जाते.

प्रणव:काय झालय, सांगशिल का मला. माझ काही पुन्हा चुकले आहे का? तसे असेल तर माफ कर मला. पण तुझ्याबाबत कोणी नजर वर केली तरी मला तिथच संपवून टाकावस वाटत. आणि या... शंतनू ने तर तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढल आहे.
मी कस सहन करु शकणार होतो,तुच सांग.

रीया:एवढ प्रेम करतो तू माझ्यावर. मला वाटल तू इतक्या वर्षात दुसरी मुलगी शोधली सुद्धा असणार.

प्रणव: मनापासून प्रेम एका व्यक्तिवरच केल जात. खर प्रेम मिळवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करवा लागतो. हे मात्र कुठेतरी ऐकले होते.

रीया: हो का. मग मिळाल का तुझ प्रेम तुला.

प्रणव:ते.... ओ..... हो.... ऐक ना तुझ काय काम होत महत्वाच ते सांग मला.


रीया: तुझ्या हदयात मला जागा मिळेल का? मी तुझ्याशी कधी बोलले नाही. तुझ्या भावनांची कदर केली नाही. मला आपल म्हणशील का.

प्रणव: आलोच मी जरा खाली जावून. तू इथेच थांब.

रीया: प्रणवला मी बोललेलं आवडलेल दिसत नाही. तो बहुतेक इतक्या सहजासहजी माफ करणार नाही मला.

समोरुन प्रणव पळत रीयाच्या दिशेने येतो. तिच्या हातात रंगबिरंगी बांगड्यांचा सेट देतो. माझ प्रेम हे शगुन रुपात जवळ ठेव. उद्याच आई-बाबांना घेवून लग्नाची मागणी घालायला येतो.
रीया लाजून कावरी बावरी झाली होती. ते दोघे आपल्या घराकडे जायला निघणार तेच दोघांच्या घरातली मंडळी त्यांच व्यक्त होणार प्रेम आनंदाने न्याहळत होते.


आता तर काय.., घरी जावून लग्नाची मागणी घालण्याची सुद्धा वेळ नव्हती. लगेचच लग्नाची तारीख ठरवण्यात आली.
रीया: प्रणव तेरा साथ हो तो...,,माझ्या आयुष्यात कोणत्याच वाईट घटना घडणार नाहीत. तू माझ्याबरोबर अनेक स्त्रीयांच आयुष्य फसवणूक होण्यापासून वाचवल.
तुला कोणत्या शब्दात वर्णन करुन सांगू शब्द अपुरे पडतात.

प्रणव: तू माझ प्रेम आहेस. तुला होणा-या वेदनांची जाणिव पहिल्यांदा माझ्या मनाला स्पर्शून जाते.


लग्न सोहळा जल्लोषात पार पडतो. दोघे एकमेकांच्या साथीने सुखाचा संसार करु लागतात.
वाचकहो खर आहे ना..., पती पत्नीची एकमेकांना असणारी साथ डोंगरएवढे दु:ख बाजूला सारण्याची शक्ती देत असते.
कथामालिका कशी वाटली कमेंट करुन मला जरुर कळवा.

समाप्त:

🎭 Series Post

View all