सारथी (गझल)

A friend is a blessing.

शोधताना जीवनी या, हर्ष दूजा तो नव्हे;

तू असावे सोबती मग, अन्य काही का हवे ?

स्थान ऐसे स्थिर आहे, स्वार्थ जेथे ना उरे;

खेद सारे दूर आणि, प्रेम हे तुझिया सवे.

संकटांशी दोन हाती, जिंकणे मज तू दिले;

जीवनी या प्रेरणेला, पेरले हे तू नवे.

अर्थ सारे व्यर्थ वाटे, शब्द सारे हे फुके;

रात्र ही अंधारलेली, देखणे हे काजवे.

दर्पणी मी पाहताना, रूप गहिरे हे असे;

त्यातही तू सारथी हो, जोड शोभे साजवे.

©श्वेता कुलकर्णी♥️