सारं काही तिच्यासाठी भाग -6

प्रेम
भाग -6

" हो... मि इथेच.. हे माझं ऑफिस आहे... आणि तु माझ्या ऑफिस ला आली आहे.. " विशाल बोलतो.

" अरे... वाह... छान... म्हणजे आता जो इंटरव्हिव होईल तो तु घेणार आहेस... म्हणजे तुम्ही... " शालिनी बोलते.

" हो घेणार होतो... पण आता नाही.. " आणि तो फोन चा रिसिवर उचलून पि ए ला आत बोलावून घेतो.

काही क्षणातच पी ए कॅबिन मध्ये येतो, " काय झालं सर..? " पि ए विचारतो.

" ही मुलगी... इथे काय करतेय..? " विशाल जणू पि ए वर भडकतोच..

" अहो सर ह्याच त्या.. शालिनी... तुम्हाला मि तिचा बायोडेटा पाठवला होता आधीच.. " पि ए सांगतो.

विशाल रागाच्या भरात मोबाईल मधले मॅसेज पाहतो," कुठे आहे.. मोहन जरा बघुन कामं करत जा... " आणि तो मोबाईल टेबलावर आदळतो.

" अहो सर तुम्हाला मि ई-मेल केला होता... मला वाटतं तुम्ही पाहिलात नाही.. " पि ए मोहन त्याला बोलतो.

"हिईईईईई..." शालिनी त्याच्यावर हसू लागते..

" हसायला काय झालं...? इथे काय चित्रपट चालला आहे का...? " तो शालिनी वर जरा जास्तच भडकतो.

" हिने उत्तम इंटरव्हिव पास केला आहे.. आणि तिला कामाची पद्धत देखील माहित आहे.. " पि ए समजावून विशाल ला सांगतो.

" ते काही ही असो, ही इथे काम नाही करू शकत... आणि असा एम्प्लॉयी जर असेल तर कंपनी डुबली म्हणुन समजा.. " विशाल भराभर तोंडाला मनात येईल ते बोलतं होता..

" तुमच्या कडे असं एम्प्लॉयी शी बोलतात का...? " शालिनी पि ए ला विचारते..

" असं म्हणजे... तु नको सांगु मला मि कोणाशी कसं बोलायचं ते... आणि मि अजुन काही तुमच्या किंवा ह्या ऑफिसचा स्टाफ झाली नाही.. त्यामुळे मिस्टर.... ह्म्म्म... जे काही आहात ते...तुम्ही अशा भाषेत माझ्याशी बोलु नका.." शालिनी विशाल ला सडेतोड उत्तर देते..

" अहो सर... हिच्या सारखा उत्तम एम्प्लॉयी आपल्या कंपनीला खरंच भेटणार नाही.. " पि ए विशाल च्या कानात कुजबुजतो.

" आणि तुम्हाला मला नसेल ठेवायचं तर फाईन ओके.. " आणि शालिनी ऑफिस मधुन निघुन जाते..

तरी ही विशाल स्तब्ध उभा असतो," सर ती गेली.. " पि ए मोहन बोलतो..

विशाल टेबलावर ठेवलेल पाणी गटागटा पितो, " मला शिकवते.. आणि गेली तर गेली... तिच्या पेक्षा उत्तम एम्प्लॉयी आपल्याला भेटतील... ऍड टाका बघा कसे येतील.. " आणि विशाल लॅपटॉप खोलून कामाला सुरवात करतो.

बराच वेळ विशाल लॅपटॉप मध्ये असतो, अचानक त्याच्या लक्षात येतं. तो घड्याळ पाहतो, त्यात पाच वाजलेले असतात...
" आई शप्पथ... सखी... " आणि तो गडबडीने ऑफिस बाहेर पडतो, गाडीला चवीचा सिग्नल लावून तो गाडीत बसतो आणि गाडी सुरु करतो..

साडेपाच होतात, विशाल कसाबसा स्कूल मध्ये पोहचतो..
तिथे त्याला कुठेच सखी दिसत नाही, त्याला घाम फुटतो. तो स्कूल च्या आत जातो, प्रिंसिपल च्या कॅबिन मध्ये जातो..
सखी बद्दल चौकशी करतो.

" मिस्टर पाठक... अहो कुठे होतात तुम्ही...? आम्ही किती कॉल केले तुम्हाला... " सखीच्या टीचर बोलतात.

" सखी... सखी... तुम्ही सखीला एकटं का सोडलं... अहो ती.. मि... " त्याला काहीच सुचत नव्हतं...

" अहो... त्यासाठी आम्ही किती कॉल केले पण तुम्ही एकही कॉल घेतलात नाही... आणि एक मुलगी आलेली तिने तुमचं नाव घेतलं तेव्हाच आम्ही तिला सोडल.. " सखीच्या टीचर बोलतात..

तो फोन पाहतो तर त्यावर अनेक मिस्ड कॉल असतात, " कोण मुलगी... आणि तुम्ही असं कसं सोडल तिला... तिला कोण घेऊन गेलं असेल... कशी होती मुलगी दिसायला..? " विशाल खुप पॅनिक होतो..

" शालिनी नाव तिचं.. आणि तिचे आधार कार्ड ची कॉपी घेतली आहे आम्ही.. पण तिने तुमचं नाव घेतलं.. म्हणुन आम्ही शहा निशा करून सोडल... " टीचर त्याला समजावून सांगतात..

तो गेट च्या बाहेर येतो, त्याच्या डोळ्यांतून पाणी येतं. तो आजूबाजूला पाहतो, तेवढ्यात त्याचं लक्ष सामोर असणाऱ्या बाकावर जातं...

क्रमश...

🎭 Series Post

View all