सारं काही तिच्यासाठी भाग -20

प्रेम
भाग -20.

" हो बरोबर आहे.. पण मि मुद्दाम तुम्हाला अंधारात नाही ठेवलं.. मला कळत होतं की तुम्ही माझ्यावर प्रेम करतात आणि मि ही तुमच्यावर प्रेम करते पण...? "
शालिनी बोलते..

" पण काय...? तु मला अंधारात ठेवलस आणि मुख्य म्हणजे तु माझ्याशी खोटं बोललीस.. " विशाल ला फार वाईट वाटतं.

शालिनी त्याचा हात धरते, " मला खरचं माफ करा.. माझं खरचं खुप प्रेम आहे तुमच्यावर, पण मि एका कर्तव्यात बांधली गेली आहे.. त्याची कायम साथ देईन असं वचन मि त्याच्या आईला दिलं आहे.. " शालिनी बोलते.

विशाल तिचा हात घट्ट पकडतो,आणि तिला शांतपणे विचारतो, " पण मग माझ्या प्रेमाचं काय..? मि विसरून जाऊ तुझ्यावरच प्रेम...? तु तरी विसरशील का..? " विशाल चे डोळे लाल लाल झालेले असतात..

" ह्या जन्मात तर ते शक्य नाही.. खरंच माझं प्रेम आहे पण मी कर्तव्यात अडकली आहे.. " असं बोलुन शालिनी तेथून निघते..

विशाल तिथेच बसुन राहतो, बराच वेळ विचार करतो..
विशाल घरी येतो रात्रीचे अकरा वाजलेले असतात..

आई त्याची वाट पाहत बसलेली असते, विशाल घरात आल्या आल्या सरळ रूममध्ये जातो..

आई त्याच्या रूममध्ये येते, खोलीत अंधार असतो. त्याची आई रूमची लाईट लावते, " कशाला लावलीस...? बसुदे शांतपणे... " विशाल बोलतो.

आई समजुन जाते नक्की काही तरी झालं आहे, " अरे अंधारात बसणं चांगल नाही.. " तरी सुद्धा त्याची आई लाईट लावते..

" आयुष्यात अंधार झाल्या सारखं का बसला आहेस..? काय झालं..? शालिनी भेटली का...? " आई विचारते.
आई ने त्याची दुखरी नस बरोबर पकडलेली असते..

" तुला कसं माहित..? " विशाल विचारतो..

" अरे मी तुझी आई आहे, तुझ्यावर माझं कायम बारीक लक्ष असत. " आई बोलते.

" तिचं सागर नावाच्या मुलाशी साखरपुडा झाला आहे.. " विशाल बोलतो..

" काय... हे तुला तिने आज सांगितलं..? " आई बोलते..

" सागरचा अपघात झाला आणि तो आता कोमात आहे.. " विशाल पुर्ण हकीकत आईला सांगतो.

" मग तुझं काय म्हणणं आहे...? काय करायचं ठरवलं आहेस...? तिला विसरून जाणार की...? " आई त्याला स्पष्टच विचारते..

" की काय आई..? तिला ह्या जन्मात मि विसरून जाईन हे कधीच शक्य नाही.. " विशाल बोलतो.

" मनाची कोंडी करून बसणार आहेस का...? जर ती सागरला विसरू शकत नाही, त्याच्या आईला दिलेलं वचनच पुर्ण करणार आहे तर मग तुझं काय...? तुला वाटतं हे नातं पुढे जाईल..? शालिनी सागर च्या ऐवजी तुझा विचार करू शकेल..? आई विचारते..

" नाही... नाही जाणार... पण मि दुसऱ्या कुणाचा विचार ही करू शकणार नाही... तिला राहायचं ना सागर सोबत तर रहा. खुशाल रहा मि तिला कधीच जबरदस्ती करणार नाही.. " विशाल बोलतो.

सकाळ होते, विशाल ऑफिस ला पोहचतो. तो थांबुन शालिनीच्या डेस्क कडे पाहतो..
आणि तडक कॅबिनमध्ये येतो, मोहन सुद्धा नेहमी प्रमाणे त्याच्या पाठोपाठ कॅबिनमध्ये येतो..

" आजच्या मिटिंग कोण कोणत्या आहेत..? आणि हो साईड वर कोणत्या मिटिंग आहेत...? " आज मोहनला विशाल शांत वाटला..पण विचारू तरी कसा...?

मोहन त्याला कामाचा अपडेट देतो, बराच वेळ गेल्या नंतर तो मोहन ला शालिनी बद्दल विचारतो..

" शालिनी आज आली नाही..? काही सांगितलं आहे का तुला..? " विशाल विचारतो.

" नाही.. असं काही म्हटलं नाही... मि पाहू का कॉल करून..? " मोहन विचारतो..

" नाही नको... मि पाहतो कॉल करून तुम्ही जा..." विशाल मोहन ला बोलतो..

विशाल तिला फोन लावतो, समोरून फोन ची बेल वाजत असते. पण शालिनी त्याचं उत्तर देत नाही... तो पुन्हा फोन लावतो पण पुन्हा तेच होतं...

तो मोहन ला कॉल करून आत बोलावतो..
मोहन त्याच्या फोन वरून तिला कॉल करतो, पण तेच होतं. ती कॉल घेत नाही.. " सर त्या कॉल उचलत नाही आहे.. "

" पुन्हा लावा..!" विशाल बोलतो.

पुन्हा मोहन तिला कॉल करतो, " ह्या वेळेस शालिनी कॉल घेते.. "

" हॅल्लो मि मोहन बोलतोय... सर विचारतात तुम्ही आलात नाही ऑफिस ला...? आणि काही सांगुण ही गेलात नाही..? " मोहन फोन वरून विचारतो..

" तुमच्या सरांना सांगा मला नाही जमणार जॉब पुढे करायला.. " आणि ती समोरून फोन ठेवते..

शालिनीच हे उत्तर ऐकुन मोहन ला प्रश्न पडतो, की नक्की झालं काय..?

" सर त्या म्हणतायत... की... " मोहन बोलतो..

" हेच की मि जॉब पुढे नाही करू शकणार... बरोबर ना..? " विशाल शांतपणे बोलतो.

" हो पण... तुम्ही कसं ओळखलात...? " मोहन विचारतो..

क्रमश...



🎭 Series Post

View all