सारं काही तिच्यासाठी भाग -19

प्रेम
भाग -19

विशाल तिचा हात पकडतो, ती हात काढून घेते, " काय झालं..? तु उत्तर नाही दिलंस..? "

ती अस्वस्थ होते, " नाही... मला नाही करता येणार.. " ती उत्तर देते...

" माझ्या डोळ्यांत पाहुन सांग... का नाही करणार..? " विशाल बोलतो.

" मला कारण नाही सांगता येणार, आणि प्लीज तु ते नाही विचारलंस तर बरं होईल.. " शालिनी सतत नजर चुकवत बोलतं होती...

" अगं पण,, मि ठीक नाही का..? की माझं लग्न झालं आहे आणि मला मुलगी आहे म्हणुन तु नाही म्हणतेस असं काही आहे का..? " विशाल तिला विचारतो.

बराच वेळ विशाल तिला समजावतो, त्याच्या प्रश्नांची उत्तरे मागतो..

" तसा प्रश्न नाही आहे... तुम्ही समजत नाही आहात.. " शालिनी बोलते.

" मग तु समजावं.. तु सांग.. मि ऐकतो.. " विशाल बोलतो.

" माझं आधी एका मुलावर खुप प्रेम होतं.. " शालिनी रडत असते.

" होतं... मग आता नाही आहे ना..? " विशाल बोलतो.

" आमचा साखरपुडा ही झालेला, पण वेळ कशी असते. त्याचा अपघात झाला... " शालिनी बोलते.

" मग आता काय... पुढे जाऊच शकते तु. आणि मि तुला समजुन घेतोय ना. मग तुला लग्न करायला काय हरकत आहे..? " विशाल बोलतो.

शालिनी ढसा ढसा रडते, " तो अजुन ही जिवंत आहे.. तो माझी सतत वाट पाहतो.. "

" म्हणजे तु त्याच्या सोबत राहते...? " विशाल बोलतो.

" नाही... " शालिनी बोलते.

"तु मला एकच सांग तु माझ्यावर प्रेम नाही करत का...? का मि तुला आवडतच नाही.." विशाल बोलतो " तसं असेल तर मि हा विषय इथेच संपवेन. तु सांग...? " विशाल तिला विचारतो..

" नाही असं काही नाही, माझं खरचं प्रेम आहे तुझ्यावर पण...? " शालिनी मध्येच थांबते..

विशाल तिच्या जवळ येतो, तिचा हात हातात घेतो, " पण काय शालिनी...? "

" तो जिवंत आहे... सागर नाव त्याचं.. मरणाच्या दारात तो झुझतो आहे.. " शालिनी त्याला बोलते..

" म्हणजे...? नक्की काय म्हणायचं आहे तुला..? " विशाल विचारतो..

" आमचा साखरपुडा झाला त्याच्या दोन दिवसानंतर मि आणि सागर फिरायला महाबळेश्वरला चाललो होतो.. रस्त्यात आमच्या गाडीचा ब्रेक फेल झाला आणि अपघात झाला... मला थोडा मार बसला पण, सागरचे अपघातात दोन्ही पाय गेले आणि तो अधू झाला.. त्याच्या डोक्याला सुद्धा मार बसला.. पण..? " शालिनी रडू लागते..

" पण काय...? "विशाल विचारतो.

" त्याच्या डोक्याला मार बसला आणि तो कोमात गेला, अपघाताला दोन वर्षे झाली पण तो आज ही कोमात आहे.. " शालिनी बोलते..

" पुढे...? " विशाल विचारतो.

" तो त्याच्या आईचा एकुलता एक मुलगा, त्याची आई कशीबशी सावरतेय स्वतःला.. " शालिनी बोलते..

" अगं पण ह्यात माझी काय चूक.. तो कोमात आहे आणि जो पर्यँत तो कोमातून बाहेर येतं नाही तो पर्यंत तु ही अशी एकटी आयुष्य काढणार आहेस का...? "

" अरे पण मि काय करू सांग...? त्याचा अपघात माझ्यामुळे झाला.. त्याची ह्यात काही चूक नव्हती... मि हट्ट केला नसता तर हे घडलं नसतं.. " शालिनी बोलते..

" माय गॉड, तु स्वतःला का दोष देते आहेस...? त्याच्या नशिबात होतं ते झालं, जरी तु हट्ट केला नसता तरी सुद्धा जे घडायचं ते घडलंच असत.. " विशाल तिला खुप समजावण्याचा प्रयत्न करतो, पण ती स्वतःलाच दोष देत होती.

" मि महाबळेश्वरला जायचा हट्ट धरला होता, उलट तोच मला सांगत होता की आज नको त्याला महत्वाचं काम आहे.. पण मि ऐकलं नाही आणि हे घडलं.. ह्यात मि स्वतःला कधीच माफ करणार नाही.. " शालिनी बोलते.

" म्हणजे त्या दिवशी मि तुलाच पाहिलं होतं, बरोबर ना..?सिटी हॉस्पिटल बरोबर...? " विशालला त्या दिवशीच सर्व आठवत..

शालिनी हळूच मान हलवून हा बोलते, " हे देवा तु का खोटं बोललीस माझ्याशी...? आणि तुला सहा नंतर सिटी हॉस्पिटलला जायचं होतं, बरोबर..? " विशालला सारं आठवतं...

त्याला चिडावं की तिला उलट बोलावं हेच सुचत नव्हतं..

क्रमश...🎭 Series Post

View all