सारं काही तिच्यासाठी भाग -18

Prem
भाग -18

" आज आपल्याला कुठल्याही मिटिंग ला वगरे नाही जायचं आहे.. " विशाल शालिनीला बोलतो..

" म्हणजे समजली नाही मि..? मग कोणत्या साईडवर वगरे जायचं आहे का..? " शालिनी विचारते..

" नाही तेही नाही,,, आपल्याला एक महत्वाची मिटिंग आहे.. आणि ती फार गरजेची आहे.. " विशाल बोलतो.

" तुला संध्याकाळी आठ वाजता एका ठिकाणी यायचं आहे.. प्लीज नाही नको म्हणुस.. " विशाल बोलतो...

शालिनी त्याचं बोलणं ऐकुन गोंधळते, अशी कोणती मिटिंग आहे जी रात्री आठ वाजता आहे..?

" पण अशी कोणती मिटिंग आहे..? " शालिनी पुन्हा विचारते.

शालिनी त्याला प्रश्न विचारात जाते पण तो तिला अपेक्षित उत्तर देत नाही.

" तु आता जा ऑफिस वर्क आटप, आणि संध्याकाळी आठ वाजता मि तुला तुझ्या घराजवळ घ्यायला येईन.. " विशाल बोलतो.

" हे देवा,, आता मि ह्यांना काय सांगु.. नका येऊ.. आणि मग सौंशय येईल ह्यांना.. " शालिनी स्वतःशीच बोलते.

" काय झालं...? कसल्या विचारात आहेस...? " विशाल तिला भानावर आणत..

" ठीक आहे,, पण तुम्ही नका येऊ घ्यायला मि येईन स्वतः. फक्त कुठे भेटू ते सांगा.? " शालिनी विचारते..

शालिनीच्या मनात वेगवेगळे विचार येतात, अनेक प्रश्न टीच्या मेंदूचा भुगा करत होते.

संध्याकाळ होते ठीक आठ वाजता शालिनी विशालने दिलेल्या पत्त्यावर येऊन उभी असते..

विशाल ची गाडी तिच्या सामोर येऊन थांबते, विशाल गाडीची काच खाली करतो आणि दरवाजा उघडून तिला बसायला सांगतो..

" हे काय... नक्की जायचं कुठे आहे..? नाही म्हटलं तुम्ही दिलेल्या पत्त्यावर मि आले आहे... मग अजुन कुठे जायचं आहे..? " शालिनी विचारते..

शालिनी छान तयार होऊन आली होती, लाल कलरचा ड्रेस त्यावर लाल कलरची ओढणी. केस मोकळे सोडलेले, पायात हिल ची सॅंडल. हातातल्या बांगड्या छुन छुन वाजत होत्या..

एक मिनिट तर विशाल तिच्याकडे पाहतच राहतो..

तो गाडी चालु करतो, " छान दिसते आहेस... " विशाल हळूच बोलतो.

" सर पण जायचं कुठे आहे... काहीतरी बोला..? " शालिनी त्याला सारखी प्रश्न करत असते..

" अगं हो हो.. किती ते प्रश्न...? पॅनिक होऊ नकोस मि तुला काही करणार नाही... "विशाल तिला मस्करीत बोलतो..

" सर... " आणि शालिनी हसू लागते..

" आणि हो तुला मि सांगितलं ना, मला ऑफिस बाहेर विशाल आवाज दे सर नको... "विशाल बोलतो.

बऱ्याच वेळा नंतर गाडी एका हॉटेलपाशी येऊन थांबते.. एक मोकळ गार्डन आणि त्यावर डायनिंग होतं..

ती पाहुन गोंधळते, तिला कळेच ना की आपण इथे का...? आणि कशाला आलो आहोत...?"

" सर इथे..? नाही म्हणजे मिटिंग आहे ना आपली..? " शालिनी अडखळत बोलते.

" हो आहे ना,,, पण ह्या मिटिंग ला फक्त तु आणि मि आहोत.. " आणि विशाल त्याचा हात पुढे करतो..

शालिनी त्याच्या हातात हात देते आणि विशाल तो घट्ट धरून ठेवतो..

विशाल तिला त्या डायनिंग पाशी घेऊन जातो, ती आजूबाजूला सर्व पाहत असते पण तिच्या चेहऱ्यावर वेगळेच भाव होते..

तिला हळू हळू कल्पना येतं होती पण खरं की खोटं माहित नाही...

डायनिंग टेबल वर छानस गुलाब होतं, तो दोन्ही हाताने गुडघ्यावर बसुन तो तिला ते गुलाब देतो.

" हे काय.. आहे...? " शालिनी विचारते..

" तुझ्या मनात जो प्रश्न येतो आहे त्याचं हे उत्तर आहे.. लग्न करशील का माझ्याशी.. " विशाल ला कसलंच भान नसतं.

हे ऐकून शालिनीला धक्काचं बसतो, ती एक पाऊल मागे येते..

विशाल उठतो, उठून उभा राहतो, " काय झालं...? माझ्याशी लग्न करशील का...? " विशाल पुन्हा विचारतो..

क्रमश...


🎭 Series Post

View all